शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातल्या संध्याकाळी आफ्रिकन प्रिंटसची फॅशन

By admin | Updated: April 28, 2017 17:18 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जर बीचवर वगैरे फिरायला जाणार असाल तर आफ्रिकन वॅक्स प्रिंट्सची रंगसंगती छान दिसते.

 

मोहिनी घारपुरे-देशमुख

 

उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंग वापरण्यास अनेकजणी फारशा उत्सुक नसतात. याचं कारण बाहेर कडकडीत ऊन आणि त्यात आपणही जर का भडक कपडे घातले तर डोळ्यांना त्याचा त्रासच जास्त होऊ शकतो. मात्र असं असलं तरीही संध्याकाळच्या वेळी मात्र रंगीबेरंगी कपडे आणि प्लेन रंग असं कॉम्बिनेशन घालायला हरकत नाही. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात जर बीचवर वगैरे फिरायला जाणार असाल तर अशी रंगसंगती छान दिसते. अशा रंगीबेरंगी कपड्यांमध्ये सध्या आफ्रिकन वॅक्स प्रिंट्सची चलती आहे. या प्रकारच्या प्रिंट्स आफ्रिकना स्त्रिया नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग म्हणून वापरतात. शहरं, तिथल्या इमारती किंवा काही नामांकीत व्यक्तींची चित्रं या प्रिंट्समध्ये विशेषकरून आढळतात. बाटीक प्रिंटच्याच प्रकारातील ही वॅक्स प्रिंट असते. आजघडीला फॅशन जगतात या प्रिंट्सला जगभरातील अनेक फॅशन डिझायनर्सनी पसंती दिली आहे. आपल्याकडेदेखील या प्रिंट्स अनेकींच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच आढळतील. परंतु या प्रिंट्सचे कपडे वापरताना एस्थेटीक सेन्स ध्यानात ठेऊनच मग ते वापरायला हवेत अन्यथा एकदम बटबटीत, गॉडी लुक येऊ शकतो  .

 

 

आफ्रिकन प्रिंटस कॅरी कशी कराल?

*आफ्रिकन प्रिंट्सचे स्कर्ट आणि त्यावर एखादा सोबर टॉप नेहमीच चांगला दिसतो.

* पार्टीवेअर ड्रेसमध्येही आफ्रिकन प्रिंट वापरू शकता परंतु पार्टीच्या लोकेशनवरच या प्रिंटची निवड करायची की नाही ते ठरवावं. बीच पार्टी, जंगल पार्टी, शेकोटीचे प्रोग्राम वगैरे असेल तर या प्रिंट्सचे कपडे वापरायला हरकत नाही.

* या कपड्यांबरोबर हाय हिल्स, पेन्सिल हील्स चालतात तसेच अगदी फंकी चप्पल्स, सँडल्सही घातल्या तरीही चांगलं दिसतं. *एकंदरीतच बटबटीत असलेले या प्रिंटचे कपडे सोबर रंगाच्या कपड्यांबरोबर मॅच करूनच वापरावेत तसेच या कपड्यांवर मेकअपदेखील खूप गॉडी करू नये.