- मृण्मयी पगारे. ‘ब्लॅक हेडस’. सौंदर्यातला प्रमुख अडथळा. चेहेऱ्याच्या अगदी दर्शनी भागात हे येतात.कितीही लोशन आणि क्रीम्स लावा ते काही जाण्याचं नाव घेत नाही. मृत त्वचा आणि तेल यामुळे निर्माण होणारा छोटा काळा डाग म्हणजे ब्लॅक हेडस. हे ब्लॅक हेडस नाकाच्या भोवती तर कधी गालावर दिसतात. कधी पाठ, मान आणि हातावरही दिसतात. ब्लॅकहेडसवर उपचार करणं अवघड वाटत असलं तरी त्यावरचे उपचार अगदीच सोपे आणि सहज आहे. त्यासाठी कुठे दुकानात नाही तर आपल्या स्वयंपाकघरात जाण्याची गरज आहे. स्वयंपाकघरातले आठ घटक ब्लॅक हेडसना कायमचं निकालात काढू शकतात. 1.बेकिंग सोडा.बेकिंग सोडा हा फक्त बेकच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा किंवा स्वच्छतेसाठी उपयुक्त घटक आहे असं नाही. सौंदर्य उपचारातही बेकिंग सोड्याला खूप महत्त्व आहे. अॅण्टिसेप्टिक गुणधर्मामुळे बेकिंग सोडा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा त्वचेसाठी वापरल्यास त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात. त्वचा मऊसूत होते. बेकिंग सोडयानं ब्लॅकहेडसही निघून जावू शकतात. त्वचेचा पी एच बेकिंग सोड्यानं वाढतो. त्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल निर्माण होत नाही.आणि त्यामुळे ब्लॅकहेडसही निर्माण होत नाही. यासाठी एका चिनी मातीच्या वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घेवून त्यात थोडं पाणी मिसळावं. बेकिंग सोड्याची पेस्ट तयार होइल इतकं पाणी घालावं. ही पेस्ट त्वचेवर जिथे ब्लॅक हेडस आहे तिथे लावावी. दहा मीनिटं सुकू द्यावी आणि मग कोमट पाण्यानं लेप धुवून टाकावा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपचार करावा.
4. लिंबाचा रसलिंबाच्या रसात त्वचेला उपयुक्त असणारे अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, सायट्रिक अॅसिड असतं. जे अॅस्ट्रीजण्ट म्हणून काम ंकरतं. आणि म्हणूनच लिंबाचा रस त्वचेला लावल्यास मृतत्वचा निघून जाते. लिंबाच्या रसात असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे आणि अॅण्टिआॅक्सिडंट गुणमधर्मामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचेवरील डाग निघून जातात. ब्लॅकहेडसाठी लिंबाचा रस वापरताना एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. त्यात कापसाचा बोळा बुडवून तो बोळा ब्लॅकहेडस असलेल्या ठिकाणी लावावा. दहा मीनिटं हा रस त्वचेवर सुकू द्यावा. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवून काढावा. दिवसातून एकदा तरी लिंबाचा रस चेहेऱ्याला लावला तर उत्तम फायदा मिळतो.
6. मधमधात जीवाणूविरोधी घटक असतात तसेच मधात अॅण्टिसेप्टिक घटकही असतात. त्वचेवरचे किटणू, घाण ही मधाच्या वापरानं निघून जाते. मधामुळे चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते. सुरकुत्या पडत नाही. तसेच चेहेऱ्यातला ओलावाही वाढतो. काहींना मात्र मधाची अॅलर्जी असू शकते. त्यांनी आधी आपल्याला अॅलर्जी तर नाही ना हे बघून मध वापरावं. ब्लॅकहेडसाठी मध वापरताना एक चमचा शुध्द मध गरम करावं. किंवा मध एका वाटीत घेवून ती वाटी गरम पाण्यात ठेवावी. नंतर हे मध ब्लॅकहेडस असलेल्या ठिकाणी लावावं. ते दहा मीनिटं तसंच ठेवावं. नंतर कोमट पाण्यात कापूस बुडवून चेहेरा स्वच्छ करावा.
8. सैंधव मीठ सैंधव मीठाच्या वापरामुळे मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल निघून जातं. एक चमचा सैंधव मीठ घ्यावं. ते अर्धा कप गरम पाण्यात मिसळावं. त्यात चार थेंब आयोडिन घालावं. ते मिश्रण मीठ विरघळेपर्यंत हलवत राहावं. नंतर हे मिश्रण जरा कोमट होवू द्यावं. कोमट झाल्यावर जिथे जिथे ब्लॅकहेडस आहे तिथे ते चोळावं. ते चेहेऱ्यावर सुकू द्यावं. आणि नंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. आणि सुती कापडानं चेहेरा टिपून काढावा.