शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात आतापर्यंत घालण्यात आलेल्या पुस्तकबंदीचा एक 75 वर्षीय महिला करतेय अनोख्या पध्दतीनं निषेध. ग्रीकमध्ये ती साकारतेय पुस्तक बंदीचं स्मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 13:51 IST

जगभरात पुस्तकांवरील या बंदीचा निषेध करण्यासाठी एक 74 वर्षीय महिला पुढे सरसावली आहे. बंदी घातलेल्या पुस्तकांच्या सहाय्यानं एक भव्य स्मारक ती साकारतेय.

 

- सारिका पूरकर-गुजराथी

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचं, ते व्यक्त करण्याचं सर्वात सुंदर माध्यम म्हणजे कला. मग ती कोणतीही असो. कोणी छान चित्रं काढत असेल किंवा कोणी कविता करत असेल, कोणी अभिनय तर कोणी लेखन. कलेतून आपला आनंद, दु:ख, संघर्ष, निषेध, पाठिंबा, विरोध सर्वकाही सहज व्यक्त करता येतं. शिवाय ते इतरांपर्यंत सहज पोहोचतं देखील. कोणताही कलाकार त्याच्या कलेतून नेहमीच समाजमनाचा, स्वमनाचा आरसा दाखवत असतो.

परंतु, या कलेतून असं प्रामाणिक व्यक्त होणं काहीवेळेस खूप महागात पडतं. कधी या कलाकारांच्या कलाकृतींवर थेट बंदीच घातली जाते. एम.एफ.हुसेन हे अलीकडच्या काळातील खूप समर्पक उदाहरण आहे त्याचं. आपल्या पेटिंग्जमधून त्यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केला आहे असा आरोप करीत त्यांच्या या कलाकृतींच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. पुस्तकांच्या दुनियेतही ही बंदी अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांच्या वाट्याला आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स आॅफ हिंदूइझम, जेम्स लेन यांचे शिवाजी, जसवंत सिंग यांचे जिना,जोसेफ लेलिवेल्ड यांचे द ग्रेट सोल महात्मा गांधी, स्टॅनले वोलपर्ट यांचे नाईन अवर्स टू रामा, आनंद यादव यांचे संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या आणि जगभरातील इतर कितीतरी पुस्तकांवर बंदी घालण्यात आली होती.त्यामागे राजकीय, धार्मिक अशी अनेक कारणं दिली गेली. परखड भाष्य, सडेतोड लेखन यामुळे या पुस्तकांच्या लेखकांना अनेकांचा रोष पत्कारावा लागला होता.

अशाच जगभरात पुस्तकांवरील या बंदीचा निषेध करण्यासाठी एक 74 वर्षीय महिला पुढे सरसावली आहे. बंदी घातलेल्या पुस्तकांच्या सहाय्यानं एक भव्य स्मारक ती साकारतेय. हॅरी पॉटरपासून आनंद यादव काय आणि जेम्स लेन काय? साहित्यावरील ही बंदी ती मान्य करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून या बंदीकडे पाहताना साहित्य हे या कोत्या विचारांपेक्षा कितीतरी पटीनं महान असतं, श्रेष्ठ असतं हेच ती हे स्मारक उभारुन सांगू पाहतेय. अर्जेंटिनाची मार्टा मिनुजिन हीच ती महिला.. ग्रीकमधील पार्थेनॉन या प्राचीन मंदिराची ही प्रतिकृती मार्टा मिनुजिन ही जगभरात बंदी घातलेल्या सुमारे एक लाखांहून अधिक पुस्तकांचा वापर करुन साकारतेय.

या प्रतिकृतीकडे पुस्तकांवरील बंदीचा निषेध, बंदी घालणाऱ्या शक्तीस केलेला प्रतिकार म्हणून ती पाहतेय. ही प्रतिकृती साकारण्यासाठी तिनं बंदी घातलेली पुस्तके दान करण्याच्ं ही आवाहन केलं आहे. जर्मनीतील कासेल येथे सुरु असलेल्या १४ व्या डॉक्युमेंटा आर्ट फेस्टिव्हलमध्ये ही प्रतिकृती ती साकारतेय. ही प्रतिकृती साकारताना मार्टानं प्रतिकृती कशाची आणि कोठे बनवायची ? याचीही निवड अगदी समर्पक केली आहे. कासेलमधील फेड्ररिचप्लात्झ येथे नाझिज ( जर्मनमधील राष्ट्रीय कामगार पक्षाचे सदस्य) यांनी सुमारे 2000 पुस्तकं जाळली होती. अन-जर्मन स्पिरीट विरोध मोहीम म्हणून ही जाळपोळ करण्यात आली होती. तसेच 1941 मध्ये फ्रिडिरिसिअनम ( जर्मनीतील कासेल येथील एक प्रसिद्ध संग्रहालय ) वर देखील बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता ( असा दावा करण्यात येतो ), यात सुमारे 35 लाख पुस्तकं जळून खाक झाली होती. या घटना एक पुस्तकप्रेमी, साहित्यिक, लेखक यांच्यासाठी अत्यंत दु:खदायी होत्या. म्हणूनच या घटना जेथे घडल्या तेच ठिकाण या घटनांचा निषेध कण्यासाठी मार्टानं ही प्रतिकृती साकारण्यासाठी निवडलंय.

 

पार्थोनॉन मंदिर साकारण्यामागेही एक पार्श्वभूमी आहे. ती अशी, हे मूलत: अथेन्समधील एक्रोपोलिस येथे, देवी देवीचंमंदिर होतं. ते जगातील प्रथम लोकशाहीचं राजकीय आदर्श होतं. विशेष म्हणजे ग्रीक सरकारच्या मदतीनं या मंदिराचं र्च आणि मशीद यांत रूपांतर झालं. आज मात्र या वास्तूची नासधूस झाली आहे. या वास्तूचा सन्मान म्हणूनच ही प्रतिकृती मार्टा पुस्तकरुपात साकारतेय. बंदी घालण्यात आलेली पुस्तकं प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून मग ती प्रतिकृती साकारण्यासाठी ती वापरते.

पुस्तकबंदी तसेच लेखकांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत मार्टानं पहिल्यांदाच ही प्रतिकृती साकारली नाहीये तर 1993मध्येही तिने हीच प्रतिकृती 2500पुस्तकांचा वापर करुन साकारली होती. ही पुस्तकं तेव्हा अर्जेंटिनाचं लष्कर जुंटाने ब्युनोज एरीस या शहरात या 25000 पुस्तकांवर बंदी आणली होती, त्याच्या निषेधार्थ मार्टानं हा अत्यंत संयमी आणि लोकशाही पद्धतीनं वरोध दर्शविला होता. थोडक्यात साहित्य, संस्कृतीचा हा वारसा, ही ज्ञानसंपदा, हा बहुमल्य ठेवा मार्टा अनोख्या रितीनं जपतेय. पुस्तकांचं महत्त्वं ती जगभरात पोहोचवतेय.