शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वायू प्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे काळी पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 19:19 IST

मुंबई देतेय हवेची परीक्षा; प्रत्येक श्वास महत्त्वाचा

मुंबई : मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे. मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात. मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का. केवळ बीकेसी नाही तर माझगाव, वरळी, अंधेरीसारखे परिसरही प्रदूषणाने वेढले आहेत का; यामध्ये नवी मुंबईचीही भर पडत आहे का? आणि मुंबईचे वातावरण किती प्रदूषित आहे. मुंबईकर खरेच प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात घेत आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मुंबईत नुकतेच एक नवा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगानुसार, वांद्रे येथील आर.डी. नॅशनल कॉलेजच्या बाहेर पांढऱ्या रंगाची कृत्रिम फुप्फुसे लावण्यात आली. आणि महत्त्वाचे म्हणजे १४ जानेवारी रोजी लावण्यात आलेल्या या फुप्फुसांचा पांढरा रंग आजघडीला प्रदूषणामुळे चक्क काळा झाला आहे.१४ जानेवारी रोजी वातावरण आणि झटका या पर्यावरणावर काम पाहणाºया संस्थांद्वारे, प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे, असे म्हणणारा कृत्रिम पांढºया फुप्फुसांचा हा बिलीबोर्ड व त्यावरील फुप्फुसे वांद्रे येथील आर.डी. नॅशनल कॉलेजच्या बाहेर वर्दळ असलेल्या भागात रस्त्याशेजारी लावण्यात आली, अशी माहिती वातावरण फाऊंडेशनकडून देण्यात आली. आपण कुठल्या गुणवत्तेच्या हवेत श्वास घेतोय? हा प्रश्न जर का आपल्याला पडत असेल तर याचे उत्तरही आपल्याला या प्रयोगाने दिले आहे. कारण वाहनांमुळे व धुळीमुळे होणाºया वायुप्रदूषणाच्या भीषणतेमुळे फुप्फुसांचा रंग बदलला आहे. सुरुवातीला तो पांढरा होता. आता तो काळा झाला आहे. या माध्यमातून मुंबईने  एका अर्थाने हवेची परिक्षाच दिली आहे, असे वातावरण फाऊंडेशनने सांगितले.दोन वर्षांपूर्वी हा बिलीबोर्ड बंगळुरूमध्ये लावण्यात आला होता. तेव्हा लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. फुप्फुसे काळी पडताना बघून लोकांमध्ये एक भीती निर्माण होते. समस्येची गंभीरता लक्षात येऊन त्याविरुद्ध जनजागृती पसरवण्यास मदत होते आहे. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी भयंकर वाढली आहे. म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम राबवून लोकांमध्ये, तसेच सरकारलाही जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे झटका या संस्थेसह वातावरण फाऊंडेशनचे म्हणणे आहे. दरम्यान, बिलीबोर्डवर फुप्फुसांबरोबर एक डिजिटल एअर क्वालिटी मॉनिटरही बसवण्यात आला. या यंत्राद्वारे हवेच्या दर्जावर मिनीट टू मिनीट लक्ष ठेवण्यात आले.

१. पांढरी दिसणारी ही फुप्फुसे बनवण्यासाठी हेपा फिल्टर्स वापरण्यात आले.२. हे फिल्टर्स ऑपरेशनसाठी, मास्क बनवण्यासाठी व धूळ पकडण्यासाठी वापरले जातात.३. या फुप्फुसांच्या मागे पंखे जोडले गेले होते; जे हवा खेचून घेत होते.४. यामुळे संपूर्ण बिलीबोर्ड खऱ्या फुप्फुसाचा आभास तयार करत होते.५. मागील काही दिवसात या फिल्टर्सने हवेतील, वाहनातून निघणारे  धूलिकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात केली.६. त्यामुळे या कृत्रिम फुप्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात झाली.७. प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा होत आहे.