शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आरोग्यास उपयुक्त किचन गार्डन; फुले, झाडे... सगळीकडे हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:12 IST

आपले घर... त्यापुढे छोटसा बगिचा... फुले, झाडे... सगळीकडे हिरवळ... असे वातावरण कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आपल्या घराभोवती हिरवीगार झाडे, बगिचा असावा, असे वाटते. मात्र, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये हे शक्य नाही आणि कल्पनेपलीकडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही आपली आवड, आपले स्वप्न सत्यात उतरू शकते.

अंजली भुजबळज्यांचे रो-हाउस किंवा तळमजल्यावर घर आहे, त्यांच्यासाठी कीचन गार्डन करणे सहज शक्य आहे, तेही आगदी छोट्याशा जागेत. घराभोवती जर मोकळी जागा असेल तर ती रिकामी राहून तेथे कचरा किंवा किडे, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो, हेही यामधून टाळता येऊ शकते आणि छोटेखानी बगिचा तुम्ही बनवू शकता. तसेच फ्लॅटमध्ये राहत असाल तर घराच्या बाल्कनीत तुम्ही गार्डन तयार करू शकता.अशा प्रकारे झाडे लावण्याचे अनेक कारण आहे. हिरवळ घरात, घराभोवती असेल तर हवा शुद्ध राहण्यास मदत तर होतचे शिवाय मन प्रसन्न राहून घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते, यामुळे तुमचे दैनंदिन जीवन निश्चितच आनंदी राहण्यास मदत होते.रसायनमुक्त भाज्या :तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये कुं डीत भाज्या लावू शकता. यामध्ये वांगे, बटाटे, पालक, मेथी, कोथिंबीर, लाल माठ अशा पालेभाज्याही सहज आणि रसायनमुक्त म्हणजे कोणत्याही खत आणि औषध फवारणीशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवता येऊ शकतात. यामुळे घरातील टाकाऊ कचरा म्हणजे भाज्या निवडल्यानंतर जे देठ, खराब भाज्या, फळ आपण फे कू न देतो, त्याचा खत म्हणून उपयोग के ला जाऊ शकतो. यामुळे वेगळी मेहनत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तेव्हा कुं डीत भाजी लावण्याचा प्रयोग करायला काही हरकत नाही. याचा निश्चितच चांगला फायदा तुमच्या आरोग्याला होईल. कारण ताज्या आणि सेंद्रिय भाजीचे काय फायदे आहेत, हे आपण जाणतो.औषधी वनस्पती :तुम्ही छोट्याशा कुं डीतही तुळस, कढीपत्ता, पुदिना या सारख्या औषधी वनस्पती लावू शकता आणि जेव्हा गरज भासेल, तेव्हा ताज्या औषधी वनस्पती तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतात. यात गवती चहा जर लावला तर तो रोज चहात वापरता येऊ शकतो आणि हर्बल टीही बनवता येऊ शकतो. अद्रकही कुं डीत लावता येणे शक्य आहे. अशा औषधी वनस्पती जर घरीच उपलब्ध झाल्या तर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.तुळशीचा काढा ताप, सर्दी, खोकल्या सारख्या आजारावर उपयुक्त आहे, तर कढिपत्ता हा अ‍ॅन्टीआॅक्सिडेंट आहे. कढिपत्त्याचा नियमित वापर के ला तर आरोग्य चांगले राहते; यामुळे आजारी पडण्याची शक्यता अगदीच कमी होते.तणावातून मुक्ती :दैनंदिन कामे आणि आॅफिसमधील ताण-तणावामुळे घरी आल्यावर उत्साह राहत नाही. मात्र, घराच्या बाल्कनीत किंवा शेजारी गार्डन, झाडे किंवा थोडी हिरवळ असेल तर मन प्रसन्न होते. यामुळे तुमचा तणाव काही प्रमाणात नक्कीच कमी होतो. त्यामुळे किचन गार्डन असणे हे सर्व दृष्टीने उपयुक्त आहे. जर येथे विविध रंगी फु ले असतील तर आणखी प्रसन्नवाटते, यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन तणाव कमी होतो.