शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल'

By अतुल कुलकर्णी | Updated: September 26, 2021 06:27 IST

एकच रंगसंगती, आधुनिक साधने व खासगी शाळांशी स्पर्धा.

ठळक मुद्देएकच रंगसंगती, आधुनिक साधने व खासगी शाळांशी स्पर्धा

अतुल कुलकर्णीमुंबई : प्रगत राष्ट्रातील सरकारी शाळांच्या संकल्पनेवर आधारित ‘मुंबई पब्लिक स्कूल’चा विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या ताब्यातील १८२८ शाळांचे रंग-रूप बदलण्याच्या कामाला गती आली आहे. आतापर्यंत जवळपास १५० शाळांनी कात टाकली आहे. प्रत्येक वॉर्डात एक तरी सीबीएसईची शाळा सुरू करण्याचेही नियोजन आहे.

मंत्री आदित्य ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, महापालिकेच्या शाळांनी स्पर्धेत नावाजलेल्या खासगी शाळांच्याही पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी जे जे करावे लागेल, ते आम्ही मिशन मोडवर करणार आहोत. दर्जेदार शाळा म्हणजे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ अशी ओळख राज्यभर झालेली पाहायची आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी या संकल्पनेची माहिती दिली. ते म्हणाले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच मराठी माध्यमासह प्रादेशिक भाषेतील अन्य सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी व महापालिकेच्या शाळांचा दर्जा एकसारखा राहावा, यासाठी सगळ्या शाळांचे नामकरण ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात येत आहे. त्या नावापुढे ती शाळा ज्या भागातील आहे, त्या भागाचे नाव जोडले जात आहे. या नावाचा समावेश असलेले विशेष सांकेतिक बोधचिन्ह तयार करून ते वापरण्यासही सुरुवात झाली आहे. सर्व शालेय इमारतींचे आकर्षक प्रवेशद्वार व त्यावर बोधचिन्हासह ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाचा आकर्षक नामफलक करण्याचे कामही सुरू झाले आहे.

प्रादेशिक भाषेतील शिक्षकांच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. प्रथम भाषेसाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे दोन विषय ठेवून बहुतांश शाळा द्विभाषिक करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या शाळांचा पसारा

  • मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलगू, तामिळ व कन्नड अशा आठ माध्यमाच्या ९६३ प्राथमिक शाळांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
  • २२४ माध्यमिक शाळांमधून जवळपास ४१ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.विशेष मुलांसाठी १७ शाळा. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ८१४ शाळा.
  • ३९९ खासगी अनुदानित शाळांमधून पहिली ते चौथीच्या जवळपास १ लाख मुलांना शिक्षण.
  • ११ सीबीएसईच्या व १ आयसीएसई अशा १२ शाळांमधून अंदाजे ४५०० विद्यार्थी. 

असे असतील बदल

  • सर्व शाळांची रंगसंगती एकच असेल. बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गांमध्ये आकर्षक शैक्षणिक चित्रांची रंगरंगोटी.
  • डिजिटल वर्ग, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, लघू विज्ञान केंद्र, व्हर्च्युअल क्लासरुम, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन, पिण्याचे शुद्ध पाणी, आरटीई नियमानुसार सुविधा.
  • खेळाच्या मैदानात सुधारणा, स्वतंत्र कला कक्ष, मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रत्येक विभागात एक विज्ञान कुतूहल भवन, आधुनिक सभागृह.
टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाAditya Thackreyआदित्य ठाकरे