शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी परीक्षेचा फॉर्म १७ लवकर भरा; ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2023 09:07 IST

दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ भरून खासगीरीत्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे १० ऑगस्ट आणि दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे १४ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस बसण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतात.

वेळापत्रक बारावी - दहावी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरणे : १० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर, १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे : १२ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर : १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोच पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे : १५ सप्टेंबर

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घेऊन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या, परंतु किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना दहावीच्या परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे ओक यांनी सांगितले.