शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीएल’ प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ; अकरावीची पहिली यादी ३ ऑगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2022 06:47 IST

अकरावी अर्जाची अंतिम मुदतवाढ संपली असून, येत्या ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन-क्रिमीलेअर-एनसीएल) काही तांत्रिक बाबींमुळे विद्यार्थी सादर करू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे; तसेच विद्यार्थ्यांना एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एनसीएल प्रमाणपत्र मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अकरावी अर्जाची अंतिम मुदतवाढ संपली असून, येत्या ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा शिक्षण संचालनालय आणि उपसंचालक कार्यालयांकडून ही माहिती देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) उपलब्ध असल्यास विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील. परंतु, अर्ज भरतेवेळी हे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली.

एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी असेल?दहावीमध्ये एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरीनंतर स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेऱ्यांनंतर अर्जाचा भाग एक भरणे तसेच विकल्प (अर्जाचा भाग दोन) भरण्याची सुविधा देण्यात येईल.

कोणती कागदपत्रे सादर करावीत?  सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला अद्याप मिळाला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरता येईल. ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  व्हीजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे ‘नॉन-क्रिमीलेअर’ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने एनसीएल प्रमाणपत्र मिळणारच नसेल अशा विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरणे योग्य आहे.