शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा आठवड्यावर; तरी प्रश्नसंच नाही, विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 07:08 IST

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होतील, असे एकमत कुलगुरूंच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा घोळ संपता संपेना आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीही सुरूच आहेत. एलएलएम परीक्षा लांबणीवर पडली आणि त्याचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळाले नाही. अशातच एलएलबीच्या ३ सत्र ४ च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने, १८ मेपासून सुरू होत असताना अद्यापही विद्यार्थ्यांना प्रश्नसंच मिळाले असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून जाहीर होऊनही आणि परीक्षा अवघ्या आठवड्यावर येऊनही अद्याप प्रश्नसंच नसल्याने विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून ते लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी ते करत आहेत.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होतील, असे एकमत कुलगुरूंच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये याकरिता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे जाहीर करत स्पष्टीकरण दिले. त्याप्रमाणे एलएलबी परीक्षा १८ मेपासून ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. एलएलबीच्या या आधीच्या तिन्ही सत्रांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत त्यामुळे हे सत्र ही ऑनलाईन पद्धतीने घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थी करत होते. मात्र परीक्षा नियोजित पद्धतीने होतील हे विद्यापीठाने स्पष्ट केल्यानंतर किमान विद्यापीठाकडून प्रश्नसंच देणे अपेक्षित असल्याचे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. 

परीक्षा विभागाला परिपत्रकाचा विसर     ऑफलाईन परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेत किमान एका दिवसाचा गॅप असावा, विद्यार्थ्यांना या १५ मिनिटे वेळ जास्त दिला जावा तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिले जावेत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत.     त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठानेही परिपत्रक जाहीर केले. मात्र, परीक्षांसाठी प्रश्नसंच देण्यास परीक्षा विभाग विसरला की काय, असा प्रश्न स्टुडंट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनी केला आहे.