शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई देणार शासकीय शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 13:16 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विशेष लक्ष दिले गेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेतील शिक्षकाचा किमान ५० तासांचा सहभाग हा त्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकसनामध्ये असायला हवा असे अधोरेखित आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईकडून दर्जात्मक प्रशिक्षण कसे देता येईल याचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीकडून हे प्रशिक्षण केवळ सीबीएसई शिक्षकांसाठी मर्यादित न राहता सीबीएसईशी संलग्न शाळांमधील शिक्षकांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलपासून सीबीएसईशी संलग्न असलेल्या शासकीय, शासकीय अनुदानित, सार्वजनिक - खासगी तत्त्वांवरील शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसई मंडळाच्या माहितीनुसार नुकतेच लडाख आणि उत्तर प्रदेश येथील १२४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांना सीबीएसईची संलग्नता प्राप्त झाली आहे. शिवाय मध्य प्रदेशातील १००० शाळांचाही समावेश सीबीएसीच्या अखत्यारीत झाला आहे. त्यामुळे या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित शाळांतील शिक्षकांना त्या  त्या राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधून तेथील शिक्षकांना अत्यावश्यक शिक्षक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सीबीएसई मंडळावर आली आहे. यासाठी सीबीएसईकडून विविध राज्यांतील शिक्षण विभागासाठी, तेथील शिक्षक प्रशिक्षणाकरिता केंद्रीय पद्धतीचे असे एप्रिल ते मार्च शैक्षणिक वेळापत्रक बनविण्यात येणार आहे.

त्यानुसार शासकीय शाळांतील प्रत्येक शिक्षकाला कमीत कमी त्या शिक्षण विभागाकडून, तेथील शिक्षक संस्थांकडून २५ तासांचे शिक्षक प्रशिक्षण आणि उर्वरित २५ तासांचे शिक्षक प्रशासखान संबंधित शाळांकडून देण्यात येईल अशी तयारी करण्यात येणार असल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक राज्याच्या शासकीय, शासकीय अनुदानित, आणि पीपीपी तटावरील शाळांतील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी ही सीबीएसई प्रशिक्षण पोर्टलवर होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

  1. सीबीएसई नियमानुसार, मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणात प्रत्येक शिक्षकाचा  किमान २५ तास सहभाग असणे आवश्यक आहे. याशिवाय शिक्षण मंत्रालयाकडून राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणामध्येही शिक्षकांचा सहभाग असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
  2. सीबीएसईकडून, सीबीएसई संलग्न शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी देशभरात विविध ठिकाणी १६ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे.
  3. हे प्रशिक्षण दोन प्रकारचे असून त्यातील पहिल्या प्रकारांतर्गतचे प्रशिक्षण सामान्य असते तर दुसरे विषयकेंद्री प्रशिक्षण म्हणून ओळखले जाते. एकीकडे सामान्य प्रशिक्षणात किशोरवयीन शिक्षण प्रशिक्षण, कला प्रशिक्षण, सर्व समावेशक शिक्षण, आनंददायी वर्ग, सायबर सुरक्षा अशा विषयांचा समावेश असतो. तर दुसरीकडे विषयकेंद्री प्रशिक्षणात दहावी, बारावीच्या वर्गांशी संबंधित २३ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. 
टॅग्स :Educationशिक्षण