शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे कवित्व सुरूच; १ लाख ६५ हजार जागा अद्याप रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 08:31 IST

शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ४ लाख २० हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि अद्यापही एकूण उपलब्ध जागांपैकी १ लाख ६५ हजार ८२२ जागा अद्याप रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. दरम्यान, अजूनही अनेक विद्यार्थी विभागीय उपसंचालक कार्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची चौकशी करीत आहेत. याच कारणास्तव शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. शिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची अधिकृत घोषणा केली गेली नसल्याने, एकीकडे महाविद्यालयांचे संस्था चालक आणि प्राचार्य याबाबत सातत्याने विचारणा या करीत आहेत.

नागपुरात सर्वाधिक जागा रिक्त अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागांत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. या शिवाय अमरावती विभागात ८४ टक्के, नागपूर विभागात ८७ टक्के, नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. 

अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या चौकशीसाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विशेष काही करता येईल का, याची विचारणा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. - शेषराव बडे, सहायक उपसंचालक मुंबई विभाग.