शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

योगाची व्याख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 23:34 IST

सध्याच्या जीवनात योग फारच लोकप्रिय झाले आहे. देश-विदेशात योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आसनाला, कोणी प्राणायामला, तर कोणी ध्यानाला योग समजतात.

डॉ. भूषणकुमार उपाध्यायसध्याच्या जीवनात योग फारच लोकप्रिय झाले आहे. देश-विदेशात योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आसनाला, कोणी प्राणायामला, तर कोणी ध्यानाला योग समजतात. जेव्हा आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा आम्हाला समजते की योग ही एक अशी मोठी वैज्ञानिक साधना आहे की, ती शरीर, मन आणि चेतना ह्या तिघांना शुद्ध करून परम चेतनेशी जोडते.योग शब्द संस्कृतमधील युज् धातूपासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. सर्वात प्रथम आम्ही आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडतो. त्यानंतर व्यक्तीला व्यक्तीशी जोडतो. त्यानंतर मनुष्याला निसर्गाशी जोडतो आणि सर्वात शेवटी आम्ही मनुष्याला त्याच्या मूळ रूपाशी जोडून त्याला परमानंदाशी जोडतो. ही योगाची संकल्पना पूर्णत: भारतीय संस्कृतीची देन आहे. भारतीय विचारवंतांनी योगाची एक विशाल आणि वैज्ञानिक रचना तयार केलेली आहे. महर्षी पतंजली यांनी आपल्या योगशास्त्रात सर्वात प्रथम याची फारच विस्तृत आणि तर्कसंगत व्याख्या केलेली आहे. परंतु महर्षी पतंजली यांच्या अगोदरसुद्धा अनेक भारतीय ग्रंथात योग शब्दाचा वापर झालेला आहे. श्रीमद्भगवतगीतेत ‘समत्वं योग उच्चते’ आणि ‘योग: कर्मसु कौशलम्’ अशा दोन प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. पहिल्या व्याख्येनुसार जेव्हा आमच्या विचारात संतुलन येते, तेव्हा आम्हाला योग प्राप्त होतो. योगी सुख-दु:ख, मान- अपमान, नफा-तोटा इत्यादिमध्ये ना तो उत्साहित होतो, ना विचलित होतो. तो सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहतो. दुसऱ्या व्याख्येनुसार माणूस जेव्हा आसक्तीरहित कर्म करण्यात पारंगत होतो, तेव्हा त्याला योग प्राप्त होतो. आसक्तीरहित कर्म केल्यामुळे मनुष्यसुद्धा विचलित होत नसून त्याला समानता प्राप्त होते. महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णत: निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो. महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाचे आठ अंग सांगितलेले आहेत. यम सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे. नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे अनुष्ठान आहे. प्राणायाम मनाच्या शांतीचे साधन आहे. प्रत्याहार मनाला भोगांपासून परावृत्त करतो. धारणा एकाग्रताचे नाव आहे. एकाग्रताचे स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी. योग ही भारतीय संस्कृतीचे विश्व संस्कृतीला दिलेली एक अमोल देणगी आहे.