आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द गाजवणा:या सचिनसाठी एका पुस्तकात एकाच वेळी सारे मुद्दे समाविष्ट करणो कठीण असेल, पण त्याच्या पुस्तकात कुठेही वाचक किंवा सचिनचा चाहता याचा विचार करून लिखाण झाल्याचे दिसत नाही. सचिनच्या पहिल्या न्यूझीलंड दौ:याबाबत लोकांना वाचायला नक्की आवडेल.
ज्या मुद्दय़ांवरून सचिनचे हे पुस्तक गाजले, त्या ग्रेग चॅपल व त्यांचा बंधू इयान यांनी त्याला चिंतेत टाकले होते. याचा उल्लेख करायला सचिन विसरला नाही. सामन्याची तयारी वा प्रत्यक्ष सामना अन् त्यानंतर होणा:या टीकेमुळे सचिनला विचार करण्यास भाग पाडले होते. खराब कामगिरीमुळे चॅपल बंधूंनी मला आरशात पाहायला सांगितले होते. आज मी ही उंची गाठून त्यांना आरसा दाखविला आहे. असेही म्हटले जाते की, सचिनच्या पुस्तकात बरंच काही वाचण्यासारखे आहे.
आपल्या लाइफपार्टनरसोबतची इनिंग त्याने ‘द बेस्ट वन’ अशी उल्लेखली आहे. सचिनची ही पार्टनरशिप वाचनीय तर आहेच, शिवाय भावनिकही आहे. दौ:यांवर असतानाच्या खोडय़ा, मस्ती आणि किस्से याची रेलचेल या पुस्तकात आहे. शिवाय ज्यांच्यासोबत सचिन खेळला, ज्यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला त्यांच्याविषयी सचिनने लिहिले आहे. पण हे लिखाण सरळमार्गी आहे. खुमासदार आणि वाचकांना खिळवून ठेवायला लावणारी शैली या पुस्तकात नाही.
यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी आत्मकथन केले आहे. नुकतेच प्रसिद्ध झालेले केवीन पीटरसनचे ‘केपी’ हे आत्मचरित्र त्याच्या कारकिर्दीसारखेच वादग्रस्त ठरले. युवराजचे ‘द टेस्ट ऑफ माय लाइफ’ हे आत्मचरित्र त्याच्या क्रिकेट ते कॅन्सर अशा जीवनप्रवासाचे वर्णन करणारे आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचे ‘अॅट क्लोज ऑफ प्ले’ हे आत्मचरित्र त्याच्या बालपणापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द गाजवण्याच्या काळार्पयतचा लेखाजोखा मांडणारे आहे. या सर्वानी त्यांच्या आत्मचरित्रत क्रिकेटशिवाय इतरही गोष्टींना उजाळा दिला आहे. त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास असो किंवा क्रिकेटमधील किस्से, अशा सगळय़ाच गोष्टी मांडल्या आहेत. सचिनने मात्र क्रिकेट हेच जीवन, एवढेच मर्यादित ठेवल्याचे दिसते. कुणाला आवडो वा न आवडो सचिनच्या चाहत्यांप्रमाणो त्याच्या आत्मचरित्रचा वाचकही मोठय़ा प्रमाणात आहे.
सचिनच्या आत्मचरित्रबद्दल अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. काहींनी त्याचे परीक्षणही केले आहे. काहींच्या मते सचिनने बरंच काही व्यक्त होणं टाळलंय. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले स्पॉट फिक्सिंग प्रकरण असो अथवा इतर काही वादग्रस्त मुद्दे याबद्दल त्याच्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता सा:यांनाच होती. सचिनने मात्र नेहमीप्रमाणो आपल्या अबोल व्यक्तिमत्त्वाला जागून असे वादग्रस्त मुद्दे आत्मचरित्रत टाळल्याचे दिसते.
- विनय नायडू