शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जागतिक ज्येष्ठदिन विशेष: ज्येष्ठांना आर्थिक, आरोग्यसक्षम करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 06:23 IST

ज्येष्ठांचे आर्थिक परावलंबित्व दूर करत, आरोग्यसेवा, उपचार व औषधे मोफत अथवा माफक दरात उपलब्ध व्हायला हवी.

दृष्टिकोन

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनातील १९९२ सालच्या ठरावानुसार, १ आॅक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन म्हणून साजरा करायचा असला, तरी त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही. उतार वयात आरोग्य, त्यावरील खर्चाचा प्रश्न भेडसावतो. आर्थिक परावलंबित्व दूर करत, आरोग्यसेवा, उपचार व औषधे मोफत अथवा माफक दरात उपलब्ध व्हायला हवी. ज्येष्ठांसाठी सरकारी आरोग्य योजना आहे. त्यासाठी पिवळ्या, केशरी शिधापत्रिकेची अट आहे. निकषांच्या कात्रीत आरोग्य योजना अडकल्या आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील ज्येष्ठांची आरोग्य स्थिती हलाखीची आहे. त्यांचा जीवन स्तर कसा उंचावेल, यावर विचार व्हायला हवा. आपल्याकडे एका ज्येष्ठाला ६०० रुपये पेन्शन मिळते. तिच गोवा, केरळमध्ये दोन हजार मिळते. ज्येष्ठांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगितले जाते. जर लोकप्रतिनिधी निवृत्त झाल्यावर त्यांना हजारो रुपये पेन्शन मिळते, तर मग तोच न्याय ज्येष्ठांना का नाही? महापालिका, नगरपालिकाही ज्येष्ठांना मालमत्ता करात सवलत देत नाहीत.

ज्येष्ठांसाठी जिल्हा, तालुका, शहर पातळीवर आरोग्य शिबिरे घ्यायला हवीत. वैद्यकीय समुपदेश व्हावे. वृद्धांना आरोग्यसेवेसाठी रुग्णालयाच्या रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ न देता, त्यांच्यासाठी वेगळा कक्ष हवा. मुंबईच्या नायर रुग्णालयात ज्येष्ठांची वर्तणूक, मानसिक आरोग्याविषयी जसा जेडियाट्रिक हा स्वतंत्र विभाग आहे, तसा तो अन्यत्रही असावा. विविध रुग्णालयांत मानसोपचार केंद्रे असावी. ज्येष्ठांनीही स्वत:च स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी. त्यासाठी पोलिसांना सहकार्य करायला हवे. नोकरचाकरांची माहिती पोलीस ठाण्यात कळवायला हवी. पैशांचे व्यवहार सावधपणे करावे. पोलिसांनीही ज्येष्ठांची नियमित चौकशी करावी. सरकारचा तसा आदेश आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने हेल्पलाइन सुरू आहे, त्याचा वापर करायला हवा. बहुतांश ज्येष्ठांच्या हत्या लुटीच्या उद्देशाने होतात. २०१३ ते २०१५ या वर्षात जवळपास २ हजार ५०० ज्येष्ठांच्या हत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एखाद्या ज्येष्ठांचा छळ समाजकंटक व घरातील नातेवाइकांकडून होत असेल, तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली पाहिजे. हेल्पलाइनला फोन करून मदत मिळवायला हवी. अनेकदा घरातील लोकांशी वैर नको, त्यांच्याकडेच दिवस काढायचे आहेत, आपले किती दिवस राहिले, असे प्रश्न स्वत:ला विचारून छळ होणारे ज्येष्ठ पोलिसांकडे जात नाहीत.ज्येष्ठ नागरिकांसाठी २००७ चा कायदा आहे, पण त्याद्वारे पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. त्याचे ज्ञान नसल्याने फौजदारी गुन्ह्याऐवजी दिवाणी दाव्याचा चुकीचा सल्ला दिला जातो. अनेकदा तक्रार कशाला देता? उतारवयात तुम्हाला तुमच्याच मुलांकडे दिवस काढायचे आहेत. पुन्हा त्यांच्याकडून त्रास होईल, अशी भीती घालून खच्चीकरण केले जाते. ज्येष्ठांसाठी पोलिसांनी नागरी समिती स्थापन करायला हवी, पण कुठे ती कागदावरच आहे, तर काही ठिकाणी समितीचा पत्ताच नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांचे खटले त्वरित निकाली काढले पाहिजेत, पण त्याचीही अंमलबजावणी होत नाही. या साऱ्याचा एकत्र विचार व्हायला हवा. 

टॅग्स :Mumbaiमुंबई