शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
3
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
4
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
5
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
6
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
7
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
8
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
9
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
10
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
11
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
12
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
13
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
14
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
15
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
16
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
19
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

सहानुभूती जिंकली, दहशत हरली

By admin | Updated: April 15, 2015 23:39 IST

पोटनिवडणुकांच्या निकालाचे फार श्लेष काढायचे नसतात आणि या निकालांच्या आधारे भविष्यकालीन आडाखेही मांडायचे नसतात. त्यातच जेव्हा पोटनिवडणूक एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत घेणे भाग पडलेले असते

पोटनिवडणुकांच्या निकालाचे फार श्लेष काढायचे नसतात आणि या निकालांच्या आधारे भविष्यकालीन आडाखेही मांडायचे नसतात. त्यातच जेव्हा पोटनिवडणूक एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत घेणे भाग पडलेले असते व या अपवादात्मक परिस्थितीला दु:खाची किनार असते, त्यावेळी तर स्थितीच पूर्णांशाने भिन्न असते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील आणि मुंबईतील वान्द्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या तृप्ती सावंत या उभय महिला उमेदवार विजयी झाल्या नसत्या तरच राजकीय आडाखे बांधायला वाव मिळाला असता. भारतीय मतदार सामान्यत: भावनाशील असतो, हे याआधीही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार रा.रा.पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या अकस्मात निधनामुळे पोटनिवडणूक अनिवार्य ठरल्यावर व दोहोेंच्या भार्यांनाच त्या मतदारसंघातून संबंधित पक्षांनी उमेदवारी बहाल केल्यानंतर दोघींच्या वाट्याला मतदारांची सहानुभूती येणे सहजस्वाभाविक होते. खरे तर या दोन्ही निवडणुका अविरोध पार पाडल्या जाव्यात असाच काहींचा आग्रह वा मानस होता. तो काहींना मानवला नाही व निवडणूक अनिवार्य ठरली. अर्थात साऱ्या देशाने लोकशाहीचा सहर्ष स्वीकार केलेला असल्याने यात फार काही गैर झाले असेही नाही. त्यातल्या त्यात कवठेमहांकाळची निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्वच पक्षांनी सहकार्याची भूमिका स्वीकारलेली असताना, तिथे अन्य काही उमेदवारांच्या जोडीने भाजपाच्या एका बंडखोरानेही निवडणूक लढविली. त्याला भाजपाने दूर सारले असले तरी तो चुकून विजयी झालाच असता तर भाजपाची भूमिका कदाचित वेगळीही राहिली असती. पण ते होणे नव्हते. वांद्र्याची निवडणूक मात्र अटीतटीची झाली. तूर्तास शिवसेनेशी सत्तेतली भागीदारी असल्याने भाजपाने तिथे आपला उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेसने मात्र आपला मोठा मोहरा नारायण राणे यांच्या माध्यमातून इरेला पाडला. राणे प्रारंभी ही निवडणूक लढवायला फारसे उत्सुक नव्हते असे म्हणतात. पण पक्ष कोणताही असला तरी प्रत्येक राजकारणी ‘अगं अगं म्हशी’ करीत असल्याने राणे त्याला अपवाद कसे ठरावेत? त्यातून त्यांच्या इच्छेविरुद्ध कुणी त्यांना काही करण्यास भाग पाडेल वा दस्तुरखुद्द राणे स्वत:चे मन मोडून काही करतील हे कालत्रयी होणे नाही. त्यांनी निवडणूक लढविली आणि त्यांच्याकडील साऱ्या आयुधांसकट लढविली. त्यांच्या पुढ्यात शिवसेना आणि सेनेच्या पुढ्यात राणे म्हटल्यानंतर अटीतटी ओघानेच आली. त्यातून याच मतदारसंघात शिवसेनेचे मातोश्री हे मुख्यालय आणि देवालयदेखील. परिणामी दोहोंच्या प्रतिष्ठा पणास लागणेही आलेच. तरीही सामना राणे विरुद्ध शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्यापुरता सीमित न राहता तिथे मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या ओवेसी बंधूंच्या पक्षानेही आपली उमेदवारी पुढे सारली. सदर पक्षाचे तेलंगणातील आमदार असलेले अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम मतदारांना आकृष्ट करून घेण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या लकबीनुसार आगखाऊ वक्तव्ये केली. ओवेसींचा पक्ष आणि नारायण राणे (राणे यांचा पक्ष असे येथे अभिप्रेत नाही) या दोहोंचे लक्ष्य एकच आणि ते म्हणजे शिवसेना. साहजिकच सेना एकाचवेळी दोहोंचाही मुकाबला करीत होती. यातील गंमतीशीर योगायोग म्हणजे ज्या तीन शक्तींमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने रस्सीखेच होत होती, त्यांच्यात एक बाब मात्र सामाईक होती आणि ती म्हणजे तिघांना शुचितेचे, सोज्वळतेचे आणि किमान शिष्टाचाराचे असलेले वावडे. परिणामी राणे यांच्या उभय पुत्रांच्या जोडीने सेनेच्या आमदारासकट काही सैनिकांना ऐन मतदानाच्या दिवशी काही काळापुरते का होईना जेरबंद करणे पोलिसांना भाग पडले होते. ओवेसी यांच्या वक्तव्यांवरून गदारोळ सुरूच आहे व कदाचित त्याला यानंतर अधिक जोर चढू शकतो. पण मजलिसने खेचून घेतलेली मते नगण्य मात्र म्हणता येत नाहीत. मुंबईत तसाही त्यांचा एक आमदार आहेच आणि तोदेखील सेनेच्या तथाकथित गडामधूनच निवडून गेलेला आहे. त्यामुळे मजलिसला माध्यमांनीच अकारण हवा देण्याचे प्रयत्न केले, असे म्हणण्यात मतलब नाही. निवडणूक आणि मतदारांची मानसिकता याबाबत अनेकदा जी ठोकळेबाज मांडणी केली जाते, ती लक्षात घेता, मजलिसने मुसलमानांची मते स्वत:कडे आकृष्ट करून घेतली व त्यापायी काँग्रेसच्या खात्यातील तितकी मते कमी झाली आणि राणेंना अल्पावधीत दुसऱ्या पाडावाला सामोरे जावे लागले. झालेल्या मतदानाच्या संदर्भातल्या अशाच ठोकताळ्याचा विचार करता, अल्प मतदान स्थितीस्थापकत्वाच्या म्हणजे ‘जैसे थे’च्या बाजूने झुकणारे असते असे म्हटले जाते व तसेच घडल्याचे उभय ठिकाणी आढळून येते. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांच्या बाजूने नि:संशय सहानुभूती हा घटक समान होता. पण वान्द्रे पोटनिवडणुकीत एक जास्तीचा घटक होता आणि तो मतदारांच्या मनातील सहानुभूतीला छेद देऊ पाहत होता. हा घटक होता, दहशतीचा, अरेरावीचा आणि विधिनिषेधशून्यतेचा. पण मतदारांनी यापैकी कशाचीच डाळ शिजू दिली नाही आणि म्हणूनच म्हणायचे, सहानुभूती जिंकली, तर दहशत हरली!