शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Arvind Kejariwal: अरविंद केजरीवालांची ‘जादू’ दिल्लीबाहेर चालेल?; नरेंद्र मोदींविरोधात आव्हानात्मक चेहरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 06:43 IST

AAP Fights Against BJP: पंजाब, गोवा, उत्तराखंड या तीनही राज्यांत केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलबाबत मोठी उत्सुकता आहे. २०२२ पर्यंत ती टिकेल?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे गुजरात मॉडेल चालले. त्या मॉडेलने भाजपला दणक्यात बहुमत मिळवून दिले. त्याच धर्तीवर अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांचे ‘दिल्ली मॉडेल’ सध्या शांतपणे काम करते आहे. मोदी यांच्या करिश्म्याने भाजपला दोनदा बहुमत मिळवून दिले तसे केजरीवाल यांनीही मोदी-अमित शहा जोडीला दोनदा धूळ चारली. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत दिल्लीत केजरीवाल जिंकले. २०१४ मध्ये देशात मोदी लाट असताना २०१५ साली केजरीवाल यांनी भाजपला दिल्लीत जोरदार दणका दिलाच, शिवाय काँग्रेस पक्षही कोपऱ्यात ढकलला गेला. २०२० साली केजरीवाल यांनी केलेली विजयाची पुनरावृत्ती अभूतपूर्व अशी होती. एकेका राज्यात केजरीवाल यांनी भाजपचा वारू रोखला. २०१७ साली नितीशकुमार यांनीही भाजपचा अश्वमेध घोडा बिहारमध्ये रोखला; पण त्यासाठी त्यांना लालूंच्या राजदची मदत घ्यावी लागली. शिवाय अखेरीस नितीशच खुद्द  मोदी-शहा जोडीच्या आणि अरुण जेटलींच्या गळाला लागले.

भारतात नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना आव्हान देणे सोपे नाही हेच त्यामुळे समोर आले. विविध कारणांनी २०१४ पासून काँग्रेस बासनात गुंडाळली गेली आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचेसुद्धा मोदींना आव्हान वाटत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये भरघोस मतांनी निवडून आल्या; पण त्यांना सध्या तरी देशभर अपील नाही. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा प्रभाव मोदींची चिंता वाढविणारा आहे. ‘छोट्या केंद्रशासित प्रदेशाचा नेता’ म्हणून भाजप केजरीवाल यांना हिणवत असला तरी त्यांच्या दिल्ली मॉडेलने देशभर विशेषत: पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात बऱ्यापैकी कुतूहल निर्माण केले हे भाजपही ओळखून आहे. २०२२ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या राज्यात निवडणुका होत आहेत. आयआयटी पदवीधर असलेल्या केजरीवाल यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा २०१४ सालापासून लपून उघड दिसत आलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी ४५० च्या आसपास लोकसभा जागा लढविल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजप  दिल्लीबाहेरचा केजरीवाल यांचा उदय रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिल्लीत मोदींना केवळ त्यांचेच आव्हान आहे.

दिल्ली मॉडेल काय आहे? लोकसभा निवडणुकीत दिल्ली मॉडेल चालते हे वारंवार दिसून आले आहे; परंतु पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यांत केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलबाबत मोठी उत्सुकता  आहे. दिल्ली हे एक कॉस्मोपॉलीटन शहर आहे, देशभरातून लोक नोकऱ्या, व्यापार आणि पर्यटनासाठी या शहरात येतात. इथे स्थिरावतात. दिल्लीत केजरीवाल यांनी नेमके काय बदल घडविले, त्यांचा सामान्य माणसाला कोणता फायदा झाला, याच्या कहाण्या या लोकांमार्फत देशाच्या अन्य भागांत पोहोचतात. गेली सात वर्षे केजरीवाल कमी बोलायला शिकले आहेत. कामावर त्यांचा भर दिसतो.  नागरिकांना एकामागून एक सुविधा देण्यासाठी त्यांचे सरकार झटत  असते. केंद्रीय संस्था, पोलीस, भाजप, नायब राज्यपाल यांनी सारखे अडथळे आणूनही केजरीवाल यांनी आपले काम थांबविलेले नाही. केजरीवाल यांची मोहल्ला क्लिनिक्स, घरपोच सेवा तर जोरात आहेच, शिवाय सर्वांना मोफत पाणी, वीज आणि शिक्षण यामुळेही परिणाम झाला आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यांतील लोक काँग्रेस, भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना कंटाळले असून, त्यांना नवा चेहरा हवा आहे. हे वातावरण २०२२ सालापर्यंत कसे टिकते हे मात्र पाहावे लागेल.

कॅप्टन-भाजप : २०१७ चा गुप्त करार पंजाबात भरपूर फिरून माहिती जमवून भाजपसाठी सर्वेक्षण करणारे निवडणूक तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या हे केव्हाच लक्षात आले आहे की ‘आप’ त्याचे दोन प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि अकाली दलाच्या पुष्कळच पुढे आहे. खरे तर २०१७ सालीच ‘आप’ तेथे सरकार स्थापन करणार होते. अकाली दल भाजपला इन्कम्बन्सी घटक त्रास देत होता. राज्यात काँग्रेस निष्प्रभ होती. या टप्प्यावर केजरीवाल लोकांना भावले. निवडक मतदार संघांत काँग्रेसला काहीही करून साथ द्यायची असे अकाली भाजप युतीने ठरविले तेव्हाच्या  विरोधी मंडळींच्या बैठकीची माहिती प्रस्तुत लेखकाला होती. अरुण जेटली त्यावेळी पंजाबचे प्रभारी होते. झालेल्या समझौत्यात ते सामील होते. विरोधाभासाची गोष्ट म्हणजे जेटली यांना अमरिंदर सिंग यांना पाठिंबा द्यावा लागला होता. तीन वर्षांपूर्वी अमृतसर लोकसभा निवडणुकीत त्यांनी जेटलींना पाडले होते. २०१७ साली भाजपचे ऐतिहासिक नुकसान झाले. ११७ पैकी केवळ तीन जागा मिळाल्या. योजना सफल झाली. केजरीवाल यांची पीछेहाट झाली, कारण त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शेवटपर्यंत दिला नव्हता. इतरांनीही काही चुका केल्या. महत्त्वाच्या सीमावर्ती राज्यातल्या शांततेला आपमुळे धोका आहे, त्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत असे चित्रही रंगविले गेले. अमरिंदर सैन्य दलातले फौजी आहेत.  २०१७ मधले भाजपचे कर्ज फेडण्यासाठी ते उत्सुक असणारच. पुढे ते काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा