शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

कशाला हव्यात सुट्या?

By admin | Updated: April 28, 2017 23:32 IST

सुटी म्हणजे आराम, मौजमजा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ मिळालेला विसावा. थकल्या-भागल्या जिवाला सुटी मिळायलाच हवी.

सुटी म्हणजे आराम, मौजमजा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ मिळालेला विसावा. थकल्या-भागल्या जिवाला सुटी मिळायलाच हवी. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ! आपल्या देशात सार्वजनिक सुट्यांच्या नावाने हाच अतिरेक बोकाळत चालला आहे. भारतात जेवढ्या सार्वजनिक सुट्या असतील तेवढ्या जगात इतरत्र कुठेही आढळणार नाहीत. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या या देशाने सुट्यांबाबत असा काही समभाव जोपासला आहे की, ‘काम कमी आणि सुट्या जास्त’ असेच काहीसे प्रगतीला खीळ घालणारे चित्र पाहायला मिळत आहे. काम न करताही त्या दिवसाचा मोबदला मिळणाऱ्या या सुट्यांमुळे सरकारी तिजोरी मात्र रिती होत चालली आहे. नेमका हाच धागा पकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या नावे असलेल्या सुट्या यापुढे बंद करण्याची घोषणा केली आहे. महापुरुषांबाबत देशवासीयांना अभिमान असायलाच हवा, कृतज्ञता व्यक्त केली गेलीच पाहिजे; पण ती सुटी दिली तरच व्यक्त होईल, असे कुणी सांगितले? उलट या दिवशी महापुरुषांचे स्मरण करून नेहमीपेक्षा थोडे अधिक काम केले तरच तो दिवस खऱ्या अर्थी सार्थकी लागेल. त्यामुळे एकाअर्थी त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. जपानमधील हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्यानंतर ही शहरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. मात्र, ध्येय, चिकाटी, जबरदस्त इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीमुळेच राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जपानने अल्पावधीतच सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रगतीची उत्तुंग झेप घेत सर्व जगासमोर आदर्श ठेवला. मात्र, त्यासाठी जपानचे कौतुक करणारे आपण कौतुकापेक्षा अनुकरण करणे गरजेचे आहे, हे सोयीस्करपणे विसरतो. असे म्हणतात की, जपानमध्ये सुट्या फक्त दहा दिवस असतात आणि तरीसुद्धा लोक वर्षातून फक्त पाच दिवसच सुटी घेतात आणि हेच जपानच्या प्रगतीमागचे खरे रहस्य आहे. महापुरुषांच्या नावे सुटी देण्यापेक्षा त्या दिवशी कार्यालयांमधून, शाळा-शाळांमधून सर्वच थोर महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला तर ते जास्त समर्पक ठरेल. यामुळे आपल्या भावी पिढीपुढे चांगला आदर्श ठेवता येईल. स्वहितापेक्षा देशहित, श्रमदान किती महत्त्वाचे असते, याचा धडा त्यांना चांगल्या प्रकारे गिरवता येईल. शिवाय सार्वजनिक सुट्या काही सर्वांनाच मिळत नाहीत. त्या सरकारी कार्यालयांपुरत्याच मर्यादित असतात. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यानेही जर सर्व सणावाराला सुटी घ्यायची ठरवले तर शेतीप्रधान असलेल्या या देशाच्या शेतीचे काय..? म्हणूनच सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या देशात सर्वच देशवासीयांना समान नियम लावणेही तितकेच गरजेचे आहे. भरपगारी सुटी मिळत असल्याने सुटीच्या नावे मौजमजा करण्याची, आळसात दिवस घालवण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची चुकीची सवय मोडून काम करण्याची सवय त्यांना लावणे ही काळाची गरज आहे. असे झाले तरच नाहक सुटी न घेता सर्वांनी मिळून केलेल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करणे आपल्याला सहज शक्य होईल. म्हणूनच आपल्या देशातील भरमसाठ सरकारी सुट्या रद्द करण्याबाबत केंद्र सरकारनेही गांभीर्याने विचार करायलाच हवा.