शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे? 

By किरण अग्रवाल | Updated: December 8, 2024 14:35 IST

सारांश : कौटुंबिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे सामाजिक चष्म्यातूनही बघण्याची गरज 

किरण अग्रवाल

नातेसंबंधातीलच गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढीस लागल्याने कुटुंब व समाज स्वास्थ्यावर ओरखडे उमटू पहात आहेत. कायद्याच्या धाकाबरोबरच सामाजिक भय देखील ओसरत चालल्याचाच तर हा परिपाक नाही ना, याचा विचार यानिमित्ताने होणे आवश्यक ठरावे. 

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एकीकडे जग मुठीत आल्याचे दिसत असताना, दुसरीकडे घरातलीच माणसे घरातल्यांपासून किंवा आप्त स्वकीयांपासून मात्र दुरावत चालल्याचे दर्शवून देणारी उदाहरणे कमी नाहीत. अश्यात हा दुरावा किंवा वितुष्ट गुन्हेगारीच्या पातळीवर पोहोचताना दिसतो तेव्हा भयचकित होणे स्वाभाविक ठरते. नातेसंबंधांना पणास लावणाऱ्या अशा घटना वाढीस लागल्या आहेत हे चिंताजनकच म्हणायला हवे. 

अपवाद हे कुठे वा कशात नसतात?, पण अपवादात्मक ठरणाऱ्या बाबीही जेव्हा मोठ्या संख्येने घडून येताना दिसतात तेव्हा काळजीचे ढग दाटून आल्याखेरीज राहत नाहीत, कारण समाजशास्त्र व मानसशास्त्र अशा दोन्ही अंगाने अशा घटनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. व्यक्तिगत कारणातून या अशा घटना घडत असल्या तरी समाज स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत असतो, आणि म्हणूनच केवळ अपवाद म्हणून त्याकडे न पाहता किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता कौटुंबिक व सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याच्या संदर्भाने बघितले जाणे गरजेचे ठरावे. 

अनैतिक संबंधातून होणारे खून खराबे हा काही नवीन विषय नाही. दोनच दिवसांपूर्वी अंमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथेही असाच एक प्रकार घडून पत्नीसह प्रियकराला अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथेही प्रेम प्रकरणातून प्रेयसीनेच प्रियकराचा खून केल्याची घटना समोर आली. 

अशा काही घटनांमध्ये लहान मुलांचेही हकनाक बळी जात असल्याचे लपून राहिलेले नाही. प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याच्या प्रकारातून एरंडोल तालुक्यातील विखरणच्या एका प्रियकराला अलीकडेच जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. इतरही अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. तात्पर्य इतकेच की, कायदा कायद्याचे काम करीत आहे; संबंधितांना शिक्षाही होत आहे परंतु कुटुंब व्यवस्था व समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत का? सामाजिक भय व संस्कारांची वीण कुठे उसवत चालली आहे का? याचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. 

विशेष म्हणजे, जराशा अपयशातून किंवा मनाविरुद्ध घडलेल्या घटनेतून विचलित होऊन स्वतःच्याच जीवाचे बरेवाईट करून घेण्याचे आत्मघाती प्रकारही वाढीस लागले आहेत. कमजोर मने त्यात लवकर बळी पडतात. गेल्या महिन्याच्या अखेरीस जळगावच्या व्यंकटेशनगरात कुटुंबीय एका अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले असता एका भगिनीने आपल्या अवघ्या आठ वर्षीय मुलीसह गळफास घेत स्वतःलाही संपविल्याची घटना उघडकीस आली, तर पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना धुळ्याच्या देवपूरमध्ये नोंदविली गेली. विभक्त राहणाऱ्या पत्नीवर संतापातून धारदार शस्त्राने वार करणाऱ्या व भांडण सोडवण्यास आलेल्या मुलाला जखमी करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील सूनसगावच्या एका व्यक्तीवरही अलिडेच गुन्हा गुदरला गेला आहे. अशाही घटनांची यादी मोठी आहे. तेव्हा कुटुंबात व समाजात वडीलकीच्या नात्याने आणि अधिकाराने धीर, आधार देणारी किंवा समजूत घालणारी व्यवस्था लयास चालली आहे का? याचा यानिमित्ताने विचार व्हायला हवा. 

वैषम्य याचे, की पद, पैसा व प्रतिष्ठा याच्यामागे इतके काही लागले जाते की विवेक बाजूला पडतो. कुणी भंगाराच्या पाईप चोरीत अडकतो, तर कुणी निवडणुकीत सहानुभूतीसाठी स्वतःच स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणताना तपासात निष्पन्न होतो. काय चालले आहे हे? भुसावळमधील एका घरफोडीच्या प्रकरणात एक जावईच निघाला आरोपी. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तर वाढतच आहेत. पोलीस दप्तरी न नोंदविली जाणारी अशी प्रकरणे मोठ्या संख्येत आहेत. 'कुंपणानेच शेत खाल्ल्या'ची प्रकरणेही कमी नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी 'फेमीसाईड इन 2023' असा एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी जगभरात प्रतिदिनी 140 महिलांची कुटुंबीयांकडूनच हत्या केली गेल्याचे म्हटले आहे. हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असावा,  कारण अनेक देशांनी यासंबंधीची माहितीच पुरविलेली नव्हती. डोके चक्रावणारी ही माहिती आहे. त्यामुळेच या साऱ्या प्रकारांकडे केवळ गुन्हेगारीच्या नव्हे, तर सामाजिक चष्म्यातून बघण्याची व नैतिक दायित्व निभावण्याची खरी गरज आहे. 

सारांशात, नातेसंबंधांतील विश्वासाचे व परस्परांबद्दलच्या आदराचे बंध कमकुवत होत चालल्यामुळे की काय, कौटुंबिक हिंसेच्या घटना वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे अति 'सोशल' झाल्याच्या गमजा मारणाऱ्या समाजधुरीणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवायला हवे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप