शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

भटकंतीला पूर्णविराम देताना...

By admin | Updated: February 16, 2017 23:50 IST

अवघ्या १० महिन्याच्या आणि चार वर्षांच्या आपल्याच पोटच्या गोळ्यांचा गळा घोटण्याचे धाडस आईमध्ये कुठून येते? आधी गळा घोटून जीव घ्यायचा,

अवघ्या १० महिन्याच्या आणि चार वर्षांच्या आपल्याच पोटच्या गोळ्यांचा गळा घोटण्याचे धाडस आईमध्ये कुठून येते? आधी गळा घोटून जीव घ्यायचा, पुन्हा त्या प्रेत बनलेल्या जिवांना स्वत:च जाळायचा प्रयत्न करायचा आणि नंतर स्वत:ही गळफास घेऊन संपून जायचे... सामाजिक मन बेचैन आणि अस्वस्थ बनवणारी अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात मुंढेवाडी येथे घडली. अशाच घटना नगर जिल्ह्यातील लोणी व औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे घडल्या. लोणीच्या घटनेत बापानेच दोन मुलींना कुऱ्हाडीने वार करून व मुलाला गळा घोटून मारले. स्वत:च्या लेकरांच्या बाबतीत क्रौर्य करण्याचे धाडस माता-पित्यात कसे आणि का निर्माण होते, हा खरा चिंताग्रस्त बनविणारा प्रश्न आहे. याच प्रश्नाची कृतिशील उकल करण्याचा प्रयत्न समाजात सुरू आहे. आर्थिक विवंचनेमुळे बालकांच्या जीवनाची घडी विस्कटतेय हे वास्तव आहे. विस्कटत चाललेली ही घडी नीट बसविण्याऐवजी आई-वडील मुलांनाच शिकार बनवितात हे दुर्दैव आहे.उपरोक्त घटनांमध्ये विस्कटलेल्या घडीतील माता-पित्यांनी क्रौर्याला मिठी मारून आपल्या लेकरांनाच संपविले. असे माता-पिता अन्य मार्गांचाही अवलंब करतात. मुलांना भीक मागायला लावणे आणि मिळेल ती मोलमजुरी करायला भाग पाडून आपल्या संसाराला हातभार मिळेल असे करणे. आजचा दिवस पुढे ढकलणे एवढ्याच एका उद्देशाने त्या बालकाचे भविष्य उद्ध्वस्त होते याची थोडीही खंत त्यांना वाटत नाही. हे चक्र गरिबी आणि दारिद्र्याच्या वहिवाटीतून चाललेल्या प्रत्येक कुटुंबाच्या नशिबी आहे. हेच चक्र नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक तरुण करताना दिसतात. अशाच एका तरुणाचे उदाहरण म्हणून महेश मानव याचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील महेश मानव (निंबाळकर) याने २००६ पासून असा प्रयत्न सुरू केला. पोटासाठी भटकंती करणाऱ्या कुटुंबांतील मुलांची नेहमीच हेळसांड होते. शिक्षणापासून ते कोसो दूर राहतात. या वास्तवावर मात करण्यासाठी महेशने अजित फाउण्डेशन नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. जे समाज उदरनिर्वाहासाठी सतत भटकत राहतात त्या समाजातील मुलांसाठी भटक्यांची शाळा सुरू करण्याचा त्याने निर्धार केला. भटक्यांच्या अनेक वस्त्यांवर पायपीट केली. त्यातूनच भटक्यांची शाळा सुरू करण्यात त्याला यश आले. डवरी-गोसावी व परप्रांतीय बावरी समाजाच्या वस्त्यांवर जाऊन त्या कुटुंबांना आपली मुले शाळेत धाडण्यासाठी प्रबोधन केले. गेली १० वर्षे हे प्रयत्न सातत्याने चालू ठेवले. त्यातूनच आपली मुलेही शिकून मोठी होऊ शकतात ही भावना त्या भटक्या कुटुंबांमध्ये निर्माण झाली. या शाळेमध्ये १५० मुले शिकू लागली. त्यापैकी ६० मुले आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. जे पीडित आहेत त्यांना मदत करणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून महेश मानव आणि त्याची टीम सतत प्रयत्नशील असते. त्याच प्रयत्नातून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे या शहरामध्ये पोटासाठी स्थलांतरित होत असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी त्यांनी पुणे येथे ग्रीन सिग्नल स्कूल ही अनौपचारिक शाळा सुरू केली. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे अशाच स्थलांतरित झालेल्या ५३० भटक्या कुटुंबांतील मुलांसाठी ‘तोतो चान’ हा अक्षर ओळख संस्कार घडविणारा उपक्रम राबविला. शहरातील अनेक सिग्नल्सवर भटकी मुले भीक मागतात, कचरा गोळा करण्याचे काम करतात अशा मुलांना एकत्र आणून त्याने तब्बल ३० मुलांना आपल्या ग्रीन सिग्नल शाळेचे सदस्य बनविले. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना समाजाविषयी प्रेम असते. त्या प्रेमातून उतराई होण्याची इच्छाही असते, परंतु आपल्या कुवतीनुसार मदत करण्यासाठी मार्ग मात्र सापडत नसतो. महेश मानव याने नव्या जगाचे अविभाज्य अंग बनलेल्या सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने उपयोग केला. ‘सृजन व्हिलेज’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप तयार केला आणि राज्यभरातील अनेक मान्यवरांना या ग्रुपवर सदस्य करून वंचित आणि पीडितांना मदतीचे आवाहन केले. कॅन्सरग्रस्तापासून गरजू विद्यार्थ्यांपर्यंतच्या अनेकांना याच ग्रुपच्या माध्यमातून त्याने दहा लाख रुपयांची मदत पोहोच केली. आता त्याचा संकल्प आहे तो वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा बार्शी तालुक्यातील कोरफळे या गावात ‘स्नेहग्राम’ उभा करण्याचाच ! - राजा माने