शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देवा तुला शोधू कुठे?

By admin | Updated: January 15, 2015 02:52 IST

एखादा प्रश्न जर पुन:पुन्हा पडत असेल तर त्याचं उत्तर पुन:पुन्हा शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. देव आहे की नाही, हा असाच एक सनातन प्रश्न!

प्रल्हाद जाधव - एखादा प्रश्न जर पुन:पुन्हा पडत असेल तर त्याचं उत्तर पुन:पुन्हा शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. देव आहे की नाही, हा असाच एक सनातन प्रश्न! त्याचं उत्तर शोधण्यासाठी जगभर माणसं सतत प्रयत्न करत असतात. कर्मठ धर्ममार्तंडापासून ते मोकळ्या विचारांच्या आध्यात्मिक गुरुंपर्यंत आणि कवी-लेखकांपासून ते चित्रकार-संगीतकारांपर्यंत अनेकजण आपापल्या माध्यमातून सदैव देवाचा शोध घेताना दिसतात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गजही यासंबंधीचं आपलं नवनवं संशोधन अधूनमधून जगासमोर आणण्यात धन्यता मानतात. ज्याला हवा त्याच्यासाठी देव आहे; नको त्याच्यासाठी नाही, असं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. किती छान उत्तर आहे हे! ते स्वत: देव मानायचे की नाही याचं उत्तरही त्यांनी ‘गाभारा’ या कवितेद्वारे दिलेलं आहे. ते म्हणतात, ‘दर्शनासाठी आलात -- या पण गाभाऱ्यात देव नाही. याचा अर्थ देव आहे, पण तो देवळात नसून देवळाच्या बाहेर आहे. देवापेक्षा देवळाचं माहात्म ज्यांना अधिक वाटतं, त्यांना आपल्या औपरोधिक शैलीत चार खडे बोलही कुसुमाग्रजांनी सुनावले आहेत. ते म्हणतात, ‘घ्यायचं असेल त्यांनी गाभाऱ्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही-गाभारा सलामत तो देव पचास’! देव देवळात नाही मग कोठे गेला आहे, तर सकाळी सकाळी एका महारोग्यानं त्याचा धावा केल्यामुळं तो महारोग्यांच्या वस्तीत मदतकार्यासाठी गेला आहे, असंही पुढं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. माणसानं महारोग जरी नियंत्रणात आणला असता तरी अज्ञान, दारिद्र्य आणि माणसाच्या चमत्कारी वर्तनाचे दर्शन घडवणारे अनेक रोग आज आपल्याला भेडसावत आहेत त्याचं काय? देवाची गरज तिकडे अधिक आहे म्हणून तो देवळातून बाहेर पडला आहे.पु. ल. देशपांडे यांनी कधी देव-देव केल्याचं आढळत नाही. नाटकाचा पडदा उघण्यापूर्वी नारळसुद्धा ते कधी स्वत: फोडत नसत. त्यांचा नमस्कार मूर्तीपेक्षा शिल्पकाराच्या प्रतिभेला असायचा. देव आपल्या हृदयातच असताना त्याला बाहेर शोधण्याचा खुळेपणा आपण का करावा, असा प्रश्न विचारणारं मंगेश पाडगावकरांचं गीतही घरोघरी पाठ आहे. देव बालमुखातून बोलतो, पिकांतून डोलतो, कधी भिकारी होऊन अन्नासाठी आपल्या साद घालतो--तो आपल्याला का दिसत नाही असा प्रश्न त्यांनी साऱ्यांनाच केला आहे. असा देव आपल्याला शोधता आला आणि त्याच्या कामात आपण हातभार लावला तर माणसाचं जगणं किती सुंदर होऊन जाईल!