शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ कुठे कमी पडले

By admin | Updated: June 20, 2017 00:37 IST

टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यासह तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले

रविवारी क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात संभाव्य विजेत्या टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यासह तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले. यानंतर क्रिकेटचाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरलीच, त्याचबरोबर कधी नव्हे ते या पराभवामुळे कोहली सेनेवर ‘विराट’ टीकाही झाली. मुळात हे अपयश पाकिस्तानविरुद्ध आल्यानेच हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला. परंतु, दुसरीकडे झालेल्या सकारात्मक गोष्टींकडे मोजक्याच लोकांचे लक्ष गेले. परंतु, त्या आनंदावर क्रिकेटमधील अपयशामुळे पाणी फेरले. एकीकडे, लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध लोटांगण घालत असताना, दुसरीकडे याच शहरात झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ असे लोळवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना सुरू झाल्यानंतर काहीवेळातच, बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतने जपानच्या काझुमासा सकाईला नमवून इंडोनेशिया सुपर सिरिज स्पर्धा जिंकल्याची बातमी आली. आधी बॅडमिंटन आणि नंतर हॉकीमध्ये मिळालेल्या गोड बातमीनंतर भारतीय क्रीडाविश्वाचे लक्ष क्रिकेटकडे लागले होते. मात्र, या दोन्ही खेळाचे दुर्दैव की, मोजके भारतीय सोडले तर करोडो भारतीयांना आस लागली होती ती, क्रिकेटच्या मैदानावरील यशाची.क्रिकेटमधील पराभवावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उशिरा का होईना, पण हॉकी आणि बॅडमिंटनमधील यशाचे कौतुक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून झाले. परंतु, जर का टीम इंडियाने क्रिकेटचे मैदान जिंकले असते, तर सगळीकडे विराट सेनेचे गोडवे गायले असते आणि कदाचित त्या लाटेमध्ये हॉकी टीम आणि श्रीकांतचे यश वाहून गेले असते. हॉकी संघ आणि श्रीकांतचे कौतुक करण्यात झालेली कमतरता पाहता एक प्रश्न खूप सतावतो, ‘ते नक्की कुठे कमी पडले?’