शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

आपल्या आई-वडिलांच्या काळात ‘ग्लोबल वॉर्मिंग’कुठे होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 07:20 IST

चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही.

- लोकेश बापट

कालच - रविवारी जैवविविधता दिवस साजरा झाला. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पर्यावरण, इकोसिस्टीम वगैरे शब्दांच्या वापराची  गरज  वाटली नाही, कारण तेव्हा शहरांची महानगरे झाली नव्हती. लोकसंख्या मर्यादित होती. डोंगर व  टेकड्या यांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व होते. नद्या, विहिरी, ओढे  निर्मळ होते. 

जीवनमान बदललेले नसल्याने हवेचे प्रदूषण वगैरे चर्चेत नव्हते.  ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर लोकसंख्या वेगाने वाढू लागली. लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत गेले. गरजा बेसुमार वाढू लागल्या. औद्योगिकरण विकासाचा वेगही प्रचंड वाढला. मानव व पर्यावरणाचा संघर्ष सुरू झाला. लोभ,  स्वार्थ, पैसा,  फायदा, हव्यास व लालसेपोटी या विकासाने वृक्ष, वेली, झाडे, डोंगर, टेकड्या, पाणी, पशु-पक्षी, हवा, माती हे सारे गिळून टाकायला सुरूवात केली. निसर्गातील प्रत्येक परिसंस्थांवरचा ताण  वाढत गेला. यामध्ये अनेक परिसंस्था नष्ट झाल्या. मानवी कृत्यामधून निर्माण झालेला  अतिरिक्त ताण सहनशक्तीच्या पलीकडे गेला तर  परिसंस्था कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे.   भविष्यात मानव जातीच्या अस्तित्वाला हा मोठा धोका ठरू शकतो. 

- दोन वर्षांपूर्वी एका छोट्या विषाणूने हेच जगाला दाखवून दिले. त्याने जगभरातील सर्व लोकांना काही महिने घरात कैद करून ठेवले आणि निसर्गाने त्या छोट्याशा कालावधीत माणसांच्या मदतीशिवाय आपले  काम चोख बजावले.  हवा स्वच्छ झाली, नद्या, ओढे, विहिरी यातील पाणी स्वच्छ झाले, अनेक वर्ष लोप  पावलेली  झाडेझुडपे, पक्षी, प्राणी आशा काही प्रजातींचे पुन्हा दर्शन झाले. हे का घडले?  तर  मानवाची निसर्गातील लुडबूड काही काळापुरती बंद झाली, म्हणून! खरंतर  निसर्गाला  माणसाची  कधीच गरज नव्हती. आपण मात्र  ‘बिनबुलाये मेहमान’सारखे  त्याच्या घरात विनाकारण घुसलो आणि आता ते घर बळकावण्याचा सोस आपल्याला लागला आहे. आज निसर्ग रक्षण जर खरंच करायचं असेल, तर मानवाने भविष्यात निसर्गात कोणताही, कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप न करता त्याला त्याचे काम करू द्यावे. - lokeshbapat@gmail.com