शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बच्चू कडूंचे काय चुकले?

By admin | Updated: April 4, 2016 22:00 IST

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई.

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई. गावातले आरोग्य केंद्र नावापुरते. डॉक्टर व नर्स दोघांचेही सोबतच अप-डाऊन. गावातले रुग्ण कोंडवाड्यातल्या गाईबैलांसारखे. गावातलाच बेरोजगार तरुण सकाळी दवाखाना उघडतो; झाडलोट करतो; रुग्णांना औषध-पाणी मलमपट्टी तोच करतो. काही दिवसानंतर लोक त्यालाच डॉक्टर म्हणून हाक मारतात व मनातला राग गिळून टाकतात. समस्या कायम आहेत. पूर्वीच्या पिढीने भोगले तेच आपल्या वाट्याला आले आहे. सरकारी बाबूंचे पोट शेण खाल्ल्याशिवाय भरत नाही. तहसील कार्यालय ते मंत्रालय असा हा खाबूगिरीचा उद्वेगजनक प्रवास पण आपली तक्रार नाही की खळखळ नाही.अशातच मग एखादा बच्चू कडू भ्रष्ट बाबूच्या कानफटात मारतो. बाबूचे सगेसोयरे झुंडीने येतात, काम बंद करतात. बच्चू कडूंना अटक होते. तरीही आपण शांत आणि षंढ. ज्याने पैसे खाण्यासाठी काम अडवून ठेवलेले असते, त्या बाबूवर सरकार कारवाई करीत नाही. उलट ज्या अपंग कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी बच्चू कडू धावून जातात, त्यालाच निलंबित केले जाते. हा कुठला न्याय, असा साधा जाबही विचारण्याचे धारिष्ट्यही आपल्यात राहात नाही. समाज म्हणून आपला आत्मा हरवत चाललाय आणि नागरिक म्हणून आपल्याला आपल्याच कर्तव्यांचा विसर पडला आहे. कामे होत नाहीत म्हणून आपण लोकप्रतिनिधींना शिव्या घालतो. पण याच कामांची फाईल दाबून ठेवलेल्या सरकारी बाबूंची आपण कधी कानउघाडणी करीत नाही. टेबलाखालून पैसे सरकवायचे व आपले काम काढून घ्यायचे हेच आपले नागरिकत्व. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही व ते घेतल्याशिवाय काम करायचे नाही हा भ्रष्ट आचार समाजाच्या आणि व्यवस्थेच्या कधीचाच अंगवळणी पडला आहे. ही भ्रष्ट व्यवस्था नामशेष करू पाहणारा बच्चू कडूंसारखा लोकप्रतिनिधी मात्र अशा वर्तमानात गुन्हेगार ठरतो.बच्चू कडूंनी केलेल्या मारहाणीचे इथे अजिबात समर्थन करायचे नाही. पण जनतेच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असलेल्या या आमदाराला असे आक्रमक पाऊल का उचलावे लागले, या प्रश्नाचा विचार सरकारने, चॅनेलवर मोफत सल्ले देणाऱ्या नवविचारवंतांनी करू नये का? कायदे मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य कायदा हातात घेतो तेव्हा त्याची हतबलता या भ्रष्ट व्यवस्थेतील तकलादूपण अधोरेखित करीत नाही का? बच्चू कडू हे गुंड नाहीत, ते वाळूमाफियाही नाहीत. अंध, अपंगांना मदत आणि गरीब रुग्णांची सेवा हाच त्यांच्या आयुष्याचा स्थायीभाव आहे. दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत वेदनांनी विव्हळत असलेल्या कॅन्सरग्रस्तांसोबत रात्रभर जागणारा हा कार्यकर्ता आहे. कधी काळी बहिरमची यात्रा वेश्याव्यवसायासाठी बदनाम होती. हा देहविक्रय बंद करून आज तिथे महिलांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. या चमत्काराचे सारे श्रेय गाडगेबाबांच्या या वारसदाराला जाते. आपल्या लग्नात अवाजवी खर्च टाळून अपंगांना मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला एखाद्या अडल्या-नडल्याच्या न्यायासाठी बाबूंच्या विनवण्या कराव्या लागत असतील तर त्यांनी शेवटी करावे तरी काय? बच्चू कडूंच्या विरोधात मंत्रालयातील सारे अधिकारी, कर्मचारी एकवटतात. लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अशी एकजूट कधी दिसत नाही. मुख्यमंत्रीदेखील ‘अधिकारी माझे ऐकत नाही, काय करू?’ अशी व्यथा जाहीरपणे व्यक्त करतात. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, हा माज त्यांच्यात आला आहे. याच लालफितीने त्रस्त होऊन माधव कदम हा मराठवाड्यातला गरीब शेतकरी मंत्रालयासमोर आत्महत्त्या करतो. तरी या कोडग्यांना त्याचे काहीच वाटत नाही. बच्चू कडूंनी केलेली मारहाण हे लोकक्षोभाचे प्रातिनिधिक रूप आहे. सरकारी बाबू सुधारले नाहीत तर हा वणवा मंत्रालयातून थेट तहसील कार्यालयांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. - गजानन जानभोर