शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

काय चाललंय राव.. हा कोणता टॅक्स अन् कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 07:52 IST

अतिरिक्त कर मिळविण्यासाठी ‘टीसीएस’ची नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांचा प्रवास आता आणखी महागणार आहे.

- पवन देशपांडे, सहायक संपादक, लोकमत

आपण रोज कोणता ना कोणता टॅक्स देत असतो, याची आपल्यालाही कल्पना नसते. कारण कोणतीही वस्तू, कोणतीही सेवा घेताना आपण दिलेल्या एकूण रकमेत काही वाटा हा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या टॅक्सचा असतोच असतो. आता गेल्या काही दिवसांपासून एका नव्या प्रकारच्या टॅक्सची चर्चा आहे. ‘टीसीएस’ असे त्याचे नाव आहे. प्रत्यक्षात भारतात राहणाऱ्यांसाठी हा टॅक्स नाही; पण विदेशात जाणाऱ्यांची या टॅक्सने झोप उडविली आहे. गेल्या आठवड्यात विदेशात क्रेडिट कार्डद्वारे खर्च करण्यावर २० टक्के कर संकलित केला जाईल, असे सरकारने जाहीर केले आणि त्यामुळे अनेक श्रीमंतांची झोप उडाली. आता आपल्या सगळ्या खर्चावर २० टक्के पैसे अधिक करावे लागणार, याची चिंता सगळ्यांना लागली होती. 

प्रथम हे पाहावे लागेल की, ‘टीसीएस’ अर्थात ‘टॅक्स कलेक्टेड ॲक्ट सोर्स’ म्हणजे काय? - म्हणजे एखादी वस्तू, सेवा घेतानाच तुमच्याकडून टॅक्स घेतला जाणार आणि त्याची रक्कम विक्रेता थेट सरकारकडे जमा करणार. समजा, तुम्ही विदेश दौऱ्यावर निघाला आहात आणि त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे बुकिंग किंवा तिथे गेल्यावर खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यावर २० टक्के कर संकलित केला जाईल. म्हणजे १० लाख रुपये एकूण खर्च केला तर त्यावर तुम्हाला २ लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच परदेशवारीचा खर्च १० लाख रुपये येणार असेल तर तो १२ लाखांवर गेला. विशेष म्हणजे ही रक्कम नंतर आपण इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करताना क्लेम करू शकतो. म्हणजे ही रक्कम आपण परतही मिळवू शकतो. बराच विरोध झाल्यानंतर सरकारने ‘टीसीएस’ कट न करण्याची मर्यादा ७ लाखांवर आणली आहे. म्हणजे वर्षभरात जर विदेश वारीवरील खर्च ७ लाखांपर्यंत मर्यादित राहिला तर त्यावर ‘टीसीएस’ कर गोळा केला जाणार नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या या मर्यादित स्वरूपाच्या खर्चासाठी केंद्र सरकारने ही स्पष्टता आणली आहे.

वर्षातून एखादी विदेशी ट्रीप करणाऱ्यांसाठी जरी हा दिलासा असला, तरी इतर अनेकांसाठी या मर्यादेने फारसा फरक पडणार नाही. कारण वार्षिक ७ लाख खर्च ही मर्यादा गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी अगदीच तोकडी आहे. विदेशातील खर्च, त्याचे बुकिंग हे अनेकदा याहीपेक्षा अधिक रकमेचे असते. त्यामुळे अनेक जणांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार आहे. दुसरा अर्थ असा की, आपण विदेश वारीवर किती खर्च करतोय, यावर कर यंत्रणांची बारीक नजर आहे. यापुढेही राहणार आहे. विरोध झाल्याने सरकारने ७ लाखांच्या मर्यादेपर्यंत ‘टीसीएस’ कर संकलित न करण्याचा निर्णय तूर्त घेतला असला, तरी भविष्यात तो लागणार नाही, याची कोणतीही शाश्वती नाही. आता २० टक्के टीसीएस केल्याने विरोधाचा सूर होता, तो हळूहळू मावळेल तेव्हा १०-१२ टक्के अशा स्वरूपात पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टीसीएस आकारून सरकार आणखी एक गोष्ट साध्य करीत आहे, ती म्हणजे सरकारच्या तिजोरीत पैसा राहील. समजा तुम्ही २ लाखांचा टीसीएस भरला तर तो क्लेम करण्यासाठी इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करण्याची वाट बघावी लागेल. म्हणजे तोवर ही रक्कम सरकारकडे राहील. ती वापरताही येईल. शिवाय तुम्हाला ती क्लेम करताना विविध पुरावे द्यावे लागण्याची शक्यता आहे, तरच तुमची रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक. अन्यथा, ही रक्कम सरकार दरबारी जमा होईल आणि सरकारचे एकूण करसंकलन वाढेल. 

कर मिळविण्याची ही नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांवर याचा भार पडणार आहे. शिवाय उद्योगांना याचा काहीसा फटका बसणार आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना याचा फायदा होईल. कारण त्यांच्यावर याचा बोजा पडणार नाही. तूर्त हेच चांगले म्हणावे.pavan.deshpande@lokmat.com

टॅग्स :Taxकर