शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

अधिवेशनाने काय दिले?

By admin | Updated: April 13, 2015 03:18 IST

फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. ताळमेळ नसणारे विस्कळीत विरोधक आणि आपण काहीही करू शकतो असा निर्माण झालेला सत्ताधाऱ्यांचा गैरसमज

 अतुल कुलकर्णी -

फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. ताळमेळ नसणारे विस्कळीत विरोधक आणि आपण काहीही करू शकतो असा निर्माण झालेला सत्ताधाऱ्यांचा गैरसमज यातच हे अधिवेशन संपले. चार महिन्यांत निर्माण झालेले प्रश्न मांडण्यात विरोधक अपयशी आणि महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले.१० टक्के टोलमाफी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २००० हजार कोटींच्या मदतीची आणि अनधिकृत घरांना अधिकृत करण्याच्या घोषणेव्यतिरिक्त फार काही हाती लागले नाही. विरोधकांनी अनेक विषयांना स्वत:हून बगल दिली. साखरेच्या प्रश्नावर विरोधक एकत्र आले. ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे असे सांगत स्वत:च्या कारखान्यांची कैफीयत मांडून टाकली. सरतेशेवटी सरकारने इथेनॉलवरील बंदी उठवण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला खरा, पण त्याचा आदेश अद्याप निघालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांतल्या प्रत्येक अधिवेशनात त्यावेळी विरोधात असणाऱ्या भाजपा-शिवसेनेने गृहखात्यावर चर्चा केली नाही, असे एकही अधिवेशन नाही. यावेळी विरोधात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने ही परंपरा मोडीत काढली. राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देत विरोधकांनी विधानसभेत गृहखात्यावर चर्चाच केली नाही. गृह खात्यावरील मागण्यांचा विषय होता त्यावेळी सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे त्यादिवशी चर्चा झाली नाही. सरकारला गृहखात्यावर चर्चा करायची नव्हती म्हणून सरकारने गोंधळ घडवून आणला असा आरोप विरोधकांनी केला. मात्र अंतिम आठवडा प्रस्ताव हे विरोधकांचे हत्त्यार असताना, त्यातदेखील गृह खात्यावरील चर्चा मागण्याची हिंमत विरोधकांनी केली नाही. मुख्यमंत्री गृह खात्याचे प्रमुख आहेत. त्यांना या विषयावर चर्चा नको होती आणि विरोधकांनी त्यांची इच्छा मान्य केल्याची चर्चा विधानभवनात रंगली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले तेव्हा ते म्हणाले, कोणी काय बोलावे यावर आपण काय बोलणार? मात्र, तुम्ही गृह खात्यावर चर्चा का मागितली नाही या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विधानसभेत चर्चा झाली नाही हे खरे... एवढीच त्यांची प्रतिक्रिया होती. या सगळ्या प्रकारामुळे गोविंद पानसरेंचे खुनी कोण, त्यांचे पुढे काय झाले, दाभोलकरांच्या हत्त्येचा तपास नेमका कोठे अडकला आहे, नागपूरच्या कारागृहातून पाच कैदी पळून कसे गेले, भरदिवसा नागपुरात खून का पडू लागले, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी कोणी विचारणार नाही.नाही म्हणता विधान परिषदेत मात्र संख्येने जास्त असणाऱ्या विरोधकांनी जोरदार बॅटिंग केली. नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेचा विषय असो किंवा अधिवेशन चालू असताना सरकारने काढलेला अध्यादेश असो, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी अनेक विषय लावून धरले. सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहातील कामकाजाच्या दर्जाविषयी आपण समाधानी नाही, असे जाहीरपणे सांगून व्यक्त केलेली नाराजी चिंता निर्माण करणारी आहे. केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करताना सदस्यांनी अहवाल कचऱ्याच्या पेटीत टाका, तो थुंकण्याच्या लायकीचा नाही अशी विधाने करून या चिंतेत भर टाकण्याचेच काम केले. केळकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या सोबत ज्यांनी काम केले ती सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रातली अभ्यासू आणि वैचारिक पाया भक्कम असणारी आहेत. अहवालावर टीका करण्याचा अधिकार सदस्यांना नक्कीच आहे. मात्र, एखादी चूक दाखवताना तिथे बरोबर काय पाहिजे हेदेखील त्यांना सांगता आले पाहिजे. पण त्यासाठी जी भाषा वापरली गेली त्यातून भविष्यात पुन्हा विचार करणारी मंडळी सरकारला सल्ले देण्याच्या फंदात पडणार नाहीत आणि पर्यायाने राज्याचेच नुकसान होईल, एवढे तरी लक्षात ठेवून वागायला हवे की नको हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न...