शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विवेकनिष्ठ विज्ञान

By admin | Updated: May 18, 2017 04:03 IST

विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल.

- विजय बाविस्करविज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल.माणसाच्या उत्क्रांतीपासून विकास आणि विकासातून प्रगती हा सारा प्रवास शक्य झाला आहे तो विज्ञानामुळे. विज्ञानामुळेच आज जग जवळ आलं आहे आणि त्यामुळे जगणंही सोपं झालं आहे. अवघं विश्व आणि आपलं जगणं हे विज्ञानाने व्यापून उरलेलं आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान या तिहेरी स्तरांवर आपले जीवन क्षणाक्षणाला जोडलेले आहे.विज्ञानाचे नवनवीन शोध माणूस लावत गेला ते अर्थातच गरजेतून. अश्मयुगापासून माणसाची जी काही प्रगती होत गेली. ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ हे म्हणतात ते काही उगीच नाही. हजारो वर्षांपासून माणसाने नवनवीन शक्कल लढवल्या. माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्याला माहीत झाल्या. दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींचे शोध लावून त्याने आपलेच जगणे सुसह्य केले. कोट्यवधी वर्षांपासून निसर्गात अस्तित्वात असलेल्या साधनसंपत्तीमधून मानवाने संशोधन केले. काळानुरूप मानवी मेंदू प्रगत होत गेला. त्यातून संशोधनाचे अवकाशही विस्तारत गेले. गरजेच्या परिपूर्तीसह जगणे अधिक सुलभ, सोपे, अत्याधुनिक करता येईल असा त्याचा प्रयत्न राहिला. अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस एडिसन, न्यूटन यांच्यासारख्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान दिले. तिथपासून विज्ञानाचा पैस विस्तारत राहिला. विज्ञानाच्या भरारीला तंत्रज्ञानाचे पंख लाभले आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कवेत येऊ लागल्या. आजमितीला हरेक क्षणाला नवे विज्ञान-तंत्रज्ञान आपले अवकाश व्यापत आहे. भूगर्भापासून ते अवकाशापर्यंत नवनवे शोध लागत आहेत. गंमत म्हणजे इतके असूनही विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आजवर आपल्याला जे काही उलगडले ते एक अंशच आहे. पण जे काही आजवर उलगडलंय तेही भव्य दिव्य असेच आहे. मानवी अवकाश व्यापून उरलेल्या या विज्ञान-तंत्रज्ञानाची एक झलक गेल्या आठवड्यात पुणेकरांना अनुभवायला मिळाली. महाराष्ट्र शासन, विज्ञान भारती व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे पुण्यात आयोजित केलेल्या ‘पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या’ निमित्ताने. विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधन, नव्या प्रतिकृती तसेच भारतीय संरक्षण विभाग, इस्रो तसेच विज्ञानक्षेत्रातील काही संस्थांनी विविध क्षेपणास्त्रे, विविध संशोधने प्रत्यक्ष पाहण्याची, हाताळण्याची संधी सामान्यांना उपलब्ध करून दिली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तीन दिवस फर्ग्युसनचे महाविद्यालय फुलून गेले होते. त्यातही लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती हे विशेष. या निमित्ताने आपली विज्ञानातील झेप तर कळलीच; पण अनेकांच्या मनात या क्षेत्राविषयी कुतूहलही निर्माण झाले. या संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय विज्ञान संमेलनाच्या धर्तीवर येत्या काळात महाराष्ट्र विज्ञान संमेलन सुरू करावेत. तसेच ही संमेलने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होण्याची गरज असल्याचे नमूद केले. यासाठी राज्य सरकार नियोजनाची जबाबदारी घेईल अशी ग्वाहीही दिली. भविष्यातील पिढी विज्ञाननिष्ठ होणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून असे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. भारतीय प्राचीन विज्ञानानेही विविध संशोधन शाखांमध्ये अनेक मूलभूत गोष्टींचा विकास केला होता. आधुनिक विज्ञानाची मुळं आपल्या पारंपरिक विज्ञानात सापडतात. पारंपरिक विज्ञानाचा शोध घेऊन आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास करून बनविलेली क्षेपणास्त्रे दिमाखात उभी आहेत. भारत चांद्रयान, मंगळ ग्रहावरील मोहीम आखत आहे. तसेच सॅटलाइट क्षेत्रातही इस्त्रोने अभूतपूर्व यश संपादित केले आहे, तर दुसरीकडे अंधश्रद्धेपोटी अजूनही अंधश्रद्धेची मुळे ठिकठिकाणी रुतलेली आहेत. त्याचवेळी विज्ञानाचा दुरूपयोगही होताना आपण पाहतो. हे चित्र बदलायचे असेल तर विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल यात शंका नाही.