शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘विदर्भवादी’ मुख्यमंत्र्याची कसोटी

By admin | Updated: October 31, 2014 00:16 IST

सगळे दिवस सारखे नसतात. 25-3क् वर्षापूर्वी जनसंघाची माणसे पडण्यासाठीच निवडणुकीला उभी राहात. आज ती माणसे दिल्ली, मुंबईच्या तख्तावर बसत आहेत.

सगळे दिवस सारखे नसतात. 25-3क् वर्षापूर्वी     जनसंघाची माणसे पडण्यासाठीच निवडणुकीला उभी राहात. आज ती माणसे दिल्ली, मुंबईच्या तख्तावर बसत आहेत. राजकारण आमूलाग्र बदलले आहे. सारी मोदीकृपा! विदर्भाने या आधी तीन मुख्यमंत्री राज्याला दिले; पण खास नागपूरचा, नागपुरातून निवडून गेलेला कुणी नेता देवेंद्र यांच्या रूपाने पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाला आहे. विदर्भात  त्या ताकदीचे नेते नव्हते अशातला भाग नाही.  बाळासाहेब तिरपुडे, दत्ता मेघे, रणजित देशमुख, वसंतराव साठे, एनकेपी साळवे आदी एकसे एक दिग्गज  होते;  पण  राजयोग चुकत गेला. मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भाचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही.   सुधाकरराव हे विदर्भातले शेवटचे मुख्यमंत्री. 
2क् वर्षानंतर नागपूरचा म्हणजे विदर्भाचा कुणी पठ्ठा   आणि त्यातही ब्राrाण, मुख्यमंत्रिपदी आला आहे.         नरेंद्र मोदी यांच्या शब्दकोशातले ‘अच्छे दिन’     येवोत तेव्हा येवोत, संघ परिवाराला चांगले दिवस आले आहेत. संघ स्वयंसेवक ही आता जास्तीची पात्रता होणार आहे. ‘हाफ चड्डी’ हा आता चेष्टेचा विषय होणार नाही.   
एक सांगू का! देवेंद्र रेकॉर्डवर ब्राrाण असले, तरी त्यांना मानणा:यांमध्ये मराठय़ांची संख्या मोठी आहे. शक्तिप्रदर्शनाचा प्रसंग आला असता, तर तमाम मराठे धरमपेठेतील बंगल्यावर दिसले असते. सेक्युलर, सर्वाना सोबत घेऊन चालणारा व्हिजनरी ही देवेंद्र यांची ब्युटी आहे. एका पैशाचाही डाग नाही. आज त्यांच्याकडे चालून आलेले मुख्यमंत्रिपद ही त्यांच्या गेल्या 23 वर्षाच्या राजकीय जीवनाची कमाई आहे.  ‘को:या पाटीचा एक तरुण’ मुख्यमंत्री होतोय तेव्हा महाराष्ट्राला मनस्वी आनंद झाला. नागपूरकरांना तर घरातला मुलगा सीएम होतोय एवढे कौतुक आहे. हे होणारच होते. मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच झाल्याने मुहूर्त लांबला. ‘फडणवीस ही नागपूरने महाराष्ट्राला दिलेली देणगी’ या नेमक्या शब्दांत नागपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांची वाहवा केली, त्या दिवशीच मुख्यमंत्री ठरला होता. मोदी सुप्रीमो नसते तर फडणवीस आज कुठे असते? आणि  मुख्यमंत्री कोण असता? आता नितीन गडकरींच्या मनात नेमके काय? हे अजूनही कोडेच आहे. ‘मी शर्यतीत नाही’ असे गडकरींचे म्हणणो मीडिया सिरीयसली घ्यायला का तयार नव्हता? खरोखरच त्यांना महाराष्ट्रात परतायचे नव्हते, तर 4क् आमदारांना त्यांच्या ‘वाडय़ा’समोर कोणी आणले? हे गूढ आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांना न विचारता गडकरींनी मोदींशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला असेल असे वाटत नाही. लहानसहान गोष्टी ते भागवतांना विश्वासात घेऊन करीत आले आहेत.  इथे तर मोदींना अंगावर घेण्याचा विषय होता आणि तोही मोदींचा स्वभाव ठाऊक असताना. या संपूर्ण  कांडात संघाचा हात नसेल, तर मग कोण प्यादे  खेळवत होता? मोदींना मोक्याच्या सर्व जागी ‘यस मॅन’ हवे आहेत. गेल्या सहा महिन्यांतील सा:या नेमणुका मोदींच्या स्वत:च्या पसंतीतल्या आहेत.  मोदींचा हा राजहट्ट असाच पुरवणो चालू राहिले, तर  काही काळाने संघ परिवारासाठीच ती डोकेदुखी  होईल. भागवतांनी मोदींना देशाचा नेता बनवले खरे; पण प्रत्येकबाबतीत मोदी संघाचे ऐकतीलच याची खात्री नाही. भविष्यामध्ये मोदी विरुद्ध संघ असा संघर्ष अटळ आहे. 
महत्त्वाचा प्रश्न आहे. फडणवीस यांचे नाव कुणी सुचवले? संघाने की मोदींनी? मोदींची पसंती आहे तर संघाची मान्यता होती का? असेल तर संघाने वेळीच गडकरींना समजावले का नाही? यापैकी काहीही नसेल, तर भाजपामधल्याच स्वकीयांनी गडकरींविरुद्ध रचलेले हे कटकारस्थान असू शकते.  अशाच एका कटात गडकरींची भाजपा अध्यक्षपदाची दुसरी टर्म हुकली होती. खान्देशचे ज्येष्ठ नेते एकनाथभाऊ खडसे हेही ह्या शर्यतीत होते. त्यांच्या समर्थनासाठी जळगावमध्ये त्यांच्या चाहत्यांनी मोर्चा काढला; पण त्यावरून गहजब झाला नाही. मग गडकरींच्या वाडय़ावर आमदार आले म्हणून कुणाला का झोंबावे? आग नाही तर धूर का निघतो आहे? गडकरी आणि फडणवीस दोघे परस्पर बोलून हा प्रश्न सोडवू शकले असते; पण त्यासाठी दोघांना दिवाळीच्या फराळाचा मुहूर्त लागतो याचा अर्थ भाजपामध्ये सारे काही आलबेल नाही. काँग्रेसमध्ये अशा हाणामा:या झाल्या असत्या तर ते समजू शकले असते. ते काँग्रेस कल्चर आहे; पण भाजपासारख्या सोवळ्या पक्षाने गेला आठवडा ज्या संस्कृतीचे दर्शन घडवले ती स्वदेशी नव्हती. गडकरी-फडणवीस शीतयुद्ध आजचे नाही. गडकरी पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी ‘आपल्यावर अन्याय सुरू आहे’ असे सांगून राजीनाम्याची धमकी दिली होती. त्या वेळी मुंडेंच्या समर्थनार्थ बनवलेल्या पत्रकावर सही करणा:यांमध्ये फडणवीस हे एक होते. गडकरी- फडणवीस बिनसले ते तेव्हापासून. पुढे फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष करून मुंडेंनी गडकरींची त्यांच्याच पिचवर विकेट काढली. गडकरींच्या कानावर घालून ही नेमणूक करता आली असती; पण काँग्रेसप्रमाणो भाजपामध्येही श्रेष्ठींना गटतट हवे असतात. गैरसमज वाढत गेले. तसे पाहिले तर हे दोन्ही नेते ‘अॅसेट’ आहेत, विदर्भाचे काही भले व्हायचे असेल, तर या दोघांच्या नेतृत्वातच होऊ शकते. गडकरींचे काम महाराष्ट्राने पाहिले आहे आणि  फडणवीसांचे ट्रेलर दणक्यात येत आहे. आता या दोघांना एकत्र कोण आणणार? हा मोठा प्रश्न आहे  आणि ते सोपे नाही. या युद्धाला मोदींचाही अँगल आहे. गडकरी अध्यक्ष असताना त्यांनी संजय जोशी यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुका सांभाळण्यासाठी पाठवले होते. हे जोशी आणि मोदी यांच्यात 36 चा आकडा आहे. मोदींनी थेट धमकी दिली. जोशींना घरी बसवत असाल, तर मी पक्षाच्या बैठकांना येईन, असे सांगून मोदींनी खळबळ उडवली. अखेर गडकरींना संजय जोशी यांना परत बोलवावे लागले.  गडकरी-मोदी  ‘मधुर संबंध’ हे तेव्हापासूनचे आहेत. पुढे गडकरींनी मोदींशी जमवून घेतले तरीही काही कमी आहेच. 
नितीन गडकरींच्या मनात काही नसेलही. तरी त्यांनी सुरुवातीला संशयकल्लोळ चालू देऊन तमाम संघकुलोत्पन्न लोकांपुढे संभ्रम निर्माण करून ठेवला आहे. संघवाल्यांपुढे आता प्रश्न आहे.. कुठे जायचे? वाडय़ावर की धरमपेठेतील बंगल्यावर? वाडय़ावर गेले तर बंगला नाराज होतो आणि बंगल्यावर गेले तर वाडा डोळे वटारतो. ‘जाये तो जाये कहाँ’ अशी परिस्थिती कार्यकत्र्याची होणार आहे. ते 4क् आमदार तर मोदींच्या काळ्या यादीत केव्हाच गेले असतील. परवार्पयत गडकरी सबकुछ होते. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडे तोबा गर्दी राहणार हे उघड आहे. वाडय़ामध्ये जाणार कोण? गर्दी नसणो ही पुढा:यासाठी मोठी शिक्षा आहे. सध्यातरी  दोन्ही छावण्यांमध्ये युद्धविरामाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री मिळाला; पण भाजपाची फाळणी करून गेला. यात नागपूरचे नुकसान आहे. या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन घडवून आणण्यासाठी सरसंघचालकांनी आपला रिमोट कंट्रोल बाहेर काढला पाहिजे. 
देवेंद्र अवघ्या 44 वर्षे वयाचे असले, तरी परिपक्वआहेत. सध्या हारतुरे सुरू असले, तरी त्यांचे सिंहासन काटेरी आहे. कापूस, सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी त्यांच्याकडे मोठय़ा आशेने पाहात आहे. ‘विदर्भवादी’ म्हणूनही फडणवीस यांची आता अग्निपरीक्षा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर काही मर्यादा आल्या आहेत; पण विदर्भाचे वेगळे राज्य देण्यासाठी ते मोदींचे मन वळवू शकतात.  अर्थात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांचे मुख्यमंत्री व्हायचे, की संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य गाजवायचे, असा पेच त्यांना पडू शकतो. फडणवीसांमधल्या विदर्भवाद्याची खरी कसोटी आहे. तेही  काँग्रेसवाल्यांसारखे अॅडजस्ट होतात की काय हे काळच सांगेल. 
 
 मोरेश्वर बडगे 
 राजकीय वेिषक