शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यात तापसरीने दोघांचे बळी

By admin | Updated: March 13, 2017 23:32 IST

परिसरात घबराट; आणखी दोन रुग्ण आढळले; रुग्णांची संख्या ४८ वर

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायसध्याच्या जीवनात योग फारच लोकप्रिय झाले आहे. देश-विदेशात योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आसनाला, कोणी प्राणायामला, तर कोणी ध्यानाला योग समजतात. जेव्हा आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा आम्हाला समजते की योग ही एक अशी मोठी वैज्ञानिक साधना आहे की, ती शरीर, मन आणि चेतना ह्या तिघांना शुद्ध करून परम चेतनेशी जोडते.योग शब्द संस्कृतमधील युज् धातूपासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. सर्वात प्रथम आम्ही आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडतो. त्यानंतर व्यक्तीला व्यक्तीशी जोडतो. त्यानंतर मनुष्याला निसर्गाशी जोडतो आणि सर्वात शेवटी आम्ही मनुष्याला त्याच्या मूळ रूपाशी जोडून त्याला परमानंदाशी जोडतो. ही योगाची संकल्पना पूर्णत: भारतीय संस्कृतीची देन आहे. भारतीय विचारवंतांनी योगाची एक विशाल आणि वैज्ञानिक रचना तयार केलेली आहे. महर्षी पतंजली यांनी आपल्या योगशास्त्रात सर्वात प्रथम याची फारच विस्तृत आणि तर्कसंगत व्याख्या केलेली आहे. परंतु महर्षी पतंजली यांच्या अगोदरसुद्धा अनेक भारतीय ग्रंथात योग शब्दाचा वापर झालेला आहे. श्रीमद्भगवतगीतेत ‘समत्वं योग उच्चते’ आणि ‘योग: कर्मसु कौशलम्’ अशा दोन प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. पहिल्या व्याख्येनुसार जेव्हा आमच्या विचारात संतुलन येते, तेव्हा आम्हाला योग प्राप्त होतो. योगी सुख-दु:ख, मान- अपमान, नफा-तोटा इत्यादिमध्ये ना तो उत्साहित होतो, ना विचलित होतो. तो सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहतो. दुसऱ्या व्याख्येनुसार माणूस जेव्हा आसक्तीरहित कर्म करण्यात पारंगत होतो, तेव्हा त्याला योग प्राप्त होतो. आसक्तीरहित कर्म केल्यामुळे मनुष्यसुद्धा विचलित होत नसून त्याला समानता प्राप्त होते. महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णत: निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो. महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाचे आठ अंग सांगितलेले आहेत. यम सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे. नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे अनुष्ठान आहे. प्राणायाम मनाच्या शांतीचे साधन आहे. प्रत्याहार मनाला भोगांपासून परावृत्त करतो. धारणा एकाग्रताचे नाव आहे. एकाग्रताचे स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी. योग ही भारतीय संस्कृतीचे विश्व संस्कृतीला दिलेली एक अमोल देणगी आहे.