शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

आधुनिक राजकारणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:35 IST

राजकारण ही एक कला आहे आणि ती तीन पायांवर उभी आहे. प्रशासनाचे विज्ञान, प्रशासकीय धोरणांना प्रभावित करणारे विज्ञान आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे विज्ञान.

- डॉ. एस.एस. मंठाराजकारण ही एक कला आहे आणि ती तीन पायांवर उभी आहे. प्रशासनाचे विज्ञान, प्रशासकीय धोरणांना प्रभावित करणारे विज्ञान आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे विज्ञान. जुन्या काळात राजकारण हे धनशक्ती आणि दंडशक्तीत गुंफले होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. विज्ञानाने आपले जीवन इतके प्रभावित केले आहे की, कोणतेही काम जुन्या पद्धतीने होत नाही. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबाची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. पूर्वीचे राजकारण हे घटनांवर आधारलेले होते. आज घटनांची जागा वरवरच्या विषयांनी घेतली आहे. त्यात होणारा विज्ञानाचा वापर हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो.निवडणूक प्रचाराचेच उदाहरण घेऊ. कोणत्या संदर्भात प्रचार करायचा हे अगोदर ठरवावे लागते. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी अंतिम उद्दिष्ट निश्चित करावे लागते. त्यानंतर राजकीय सल्लागारांची निवड करून तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे ठरविले जाते. २०० किंवा २००० वर्षांपूर्वीची राजकारणी व्यक्ती आजच्या युगात अवतरली तर आजही सामाजिक अशांतता हीच महत्त्वाची ठरते हे त्याला दिसून येईल. प्रत्येकालाच सत्तेवर यायचे असते आणि कुणी ना कुणी एकूण परिस्थितीविषयी नाराज असतो. राजकारणी लोक खासगी तसेच सरकारी प्रसार यंत्रणेचा वापर करून सत्ता मिळवायचा आणि मिळालेली सत्ता राखायचा प्रयत्न करीत असतो. त्याला विरोध करणारे वेळ पडते तेव्हा त्याच साधनांचा उपयोग करीत असतात. १५०० साली युरोपात जेव्हा क्रांती होत होती तेव्हा लोकांना माहिती देण्याचे काम छापखाने करीत होते. आज तेच काम टिष्ट्वटर, फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून होत आहे.ई-मेलच्या माध्यमातून जगात कुठेही पटकन संपर्क साधणे सोपे झाले आहे. त्यामुळे जनता आणि नेते हे परस्परांच्या अधिक जवळ आले आहेत. हल्लीच्या राजकारणाचे एकूण सार या प्रकारचे आहे. पण आधुनिक राजकारणात जर विज्ञान- तंत्रज्ञानाचा वापर होत असेल तर तो गणिती पद्धतीने का केला जाऊ नये? तसे केले तर राजकीय पक्षांना विजयी होण्याची खात्री मिळू शकेल. निवडणुकीवर प्रभाव पाडू शकणाºया सर्व घटकांची बेरीज हा निवडणुकीत विजय मिळविण्याचा हेतू असतो. त्यासाठी प्रभाव पाडू शकणाºया घटकांना ओळखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी राजकारणातील विविध घटक कशाप्रकारे काम करीत असतात याची माहिती असणे गरजेचे असते. निवडणूक प्रभावित करू शकणाºया घटकात जनता, मतदारसंघ, राजकारणी, निधी, पक्षाचे धोरण, मतदारसंघाचा हक्कदार आणि त्याला आव्हान देणारा या दोघांचीही माहिती, तंत्रज्ञानाची भूमिका आणि अज्ञात घटकांचा समावेश असतो. पण जेव्हा निवडणुकीस उभी असलेली व्यक्ती प्रभावी असते तेव्हा इतर घटकांची उपयोगिता मागे पडते. अशावेळी तंत्रज्ञानाचा वापरच प्रभावी ठरत असतो.या सर्व गोष्टींचा विचार केला तर राजकारणात करिअर करणारे आवश्यक असतात की राजकारणी तयार करता येतात? पूर्वीच्या काळी मूल्ये महत्त्वाची होती. ते दिवस आता संपले आहेत. उलट अचानक राजकारणात प्रवेश करणारी व्यक्तीच निवडली जाते. यासंदर्भात समांतर आदर्श चित्रपट सृष्टीतून मिळू शकतील. पूर्वी मध्यम वयाच्या अभिनेत्री आणि अभिनेतेही दर्शकांना आकर्षित करायचे. तरुण हिरो हिरॉईन हवेत हाच आजच्या चित्रपटांचा आणि टीव्ही सिरियल्सचा मंत्र आहे. त्यामुळे अभिनयाचे प्रशिक्षण देणाºया अनेक संस्था अस्तित्वात आल्या आहेत. राजकारणातही असा बदल घडून येऊ शकेल का? त्यासाठी उमदे व्यक्तिमत्त्व, लोकांशी संवाद साधण्याची कला, वक्तृत्व कला, तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता, चालू घडामोडींचे व इतिहासाचे ज्ञान आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यांची आवश्यकता राहील.माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती आणि आकडेवारी मिळवून मते मिळविण्यासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी तयार करता येते. समाजातील कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करायचे हे समजून घेण्याची राजकीय पक्षाला गरज असते. हे काम मूलतत्त्व शोधकांच्या मार्फत करण्यात येते. त्यानंतर प्रचाराची प्रक्रिया निश्चित करण्यात येते. तसेच प्रत्येक मतदारसंघातील मतदारांच्या स्वरूपावर तेथील प्रचाराची दिशा ठरविण्यात येते. निवडणूक प्रचारात ई-मेलचा आणि ब्लॉगचा वापर अत्यावश्यक झाला आहे. प्रचारासाठी राजकीय पक्ष हे सोशल मीडियावर अवलंबून राहू लागले आहेत. निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात साधनांची आवश्यकता असते. राजकीय पक्षांची प्रतिमा तयार करण्याचे काम मीडिया करीत असते. एकूणच निवडणुकीचे स्वरूप हे जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करीत असते. मोबाईलद्वारा केलेले अ‍ॅनालिसिस हेही महत्त्वाची भूमिका बजावीत असते. यात बदल घडवून आणणे हे प्रचाराने, राजकीय नेत्यामुळेच केवळ शक्य होत असते.तरुण राजकारण्यांना प्रचार मोहिमेचे बाळकडू देण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटसारखी एखादी संस्था असणे आवश्यक झाले आहे. त्यात अभिनय, भावनोत्कटता, नाट्य आणि वक्तृत्वाची शिकवण दिली जावी. त्यात तरुणांना वयाच्या १५ व्या वर्षी प्रवेश देण्यात यावा म्हणजे मतदार होण्याचे १८ वर्षे हे वय पूर्ण होईपर्यंत तो चांगला उमेदवार बनू शकेल. त्यांची कल चाचणी घेण्यात आली तर कचरा बाजूला सारणे शक्य होईल. निवृत्त प्रशासकीय अधिकाºयांकडून त्यांना प्रशासनाचे धडे देण्यात यावेत. त्यानंतर त्याला पक्षाचे तत्त्वज्ञान आणि पक्षाचे धोरण यांचे ज्ञान देण्याचे काम पक्षाला करावे लागेल. अभिनेते हे राजकारणात उतरल्याची आणि राजकारण्यांनी चित्रपटात कामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा अभिनय, वक्तृत्व आणि भावनोत्कटता हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचे आहेत. ज्या राजकीय नेत्यांच्या भाषणांना लोक गर्दी करतात त्यांनी जर प्रवेश फी ठेवली तर त्यांना पक्षासाठी निधी गोळा करता येईल आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतही भर पडेल. टाईम्स फाऊन्डेशनने प्रशिक्षण घेऊन राजकारणात उतरणाºयांना क्रमवारी दिली तर ती प्राप्त करण्यासाठी राजकीय प्रशिक्षण देणाºया अनेक शाळा निर्माण होतील.सध्या तरी क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण यांना बरे दिवस आले आहेत. त्यांच्या शाळा सुरू झाल्या तर प्रशिक्षकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्या शाळांना जोडून अनेक सहयोगी संस्था उभ्या होतील. त्यातूनच मॅनेजमेंट स्कूल्सचीही निर्मिती होईल. सरतेशेवटी राजकारण ही सुद्धा एक कला आहे आणि ती कुणालाही साध्य होण्यासारखी आहे. एकूणच राजकारण, नाट्य आणि तंत्रज्ञान यांची सध्या अतूट मैत्री झाली आहे हे मात्र खरे!(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)