शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलाचा असा वापर दुर्दैवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:51 IST

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत.

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत. प्रश्न पूल कोणी बांधायचा हा नसून सैन्याचा वापर कुठे आणि कधी करावा हा आहे. हा विषय यामुळे ऐरणीवर आला आहे.मुंबईत एलफिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचे बळी गेल्यानंतर तो पूल सैन्यदलाकडून बांधून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. अवघ्या तीन महिन्यांत पूल तयार करण्याचे आश्वासन रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. पूल कोण बांधतो याहीपेक्षा जनतेला तीन महिन्यांत तो तयार करून मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या निर्णयामुळे चुकीचा पायंडा पडला आहे.हा पूल धोकादायक बनला आहे, तो तातडीने नवीन बांधला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षे या पुलावरून जाणारे प्रवासी करत होते. एका प्रवाशाने तर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अनेकदा टष्ट्वीटही केल्याचे समोर आले. त्याचदिवशी प्रभू यांनी या पुलाच्या कामाला कितीतरी आधीच मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासन सुस्त झाल्याचे समोर आले. पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावीत असे तीन वर्षे अधिकाºयांना वाटले नाही. मात्र ज्या दिवशी २३ जणांचे जीव गेले त्याच दिवशी त्या पुलाची निविदा काढल्याचे सांगितले गेले. हे अक्षम्य दुर्लक्ष करणाºया रेल्वेच्या अधिकाºयावर कोणतीही कठोर कारवाई केली गेली नाही. उलट हा पूल सैन्यदलाकडून बांधून घेताना भाजपाने या विषयाचे राजकारण केले.सप्टेंबर महिन्यात पूल पडला. त्याचे काम जर एक महिन्याने सैन्याकडे देण्याचा निर्णय होत असेल तर त्याच एक महिन्यात अन्य यंत्रणांकडूनही हा पूल बांधता आला असता. पण तसे झाले नाही. रेल्वे दुर्घटनेनंतर बुलेट ट्रेनविषयी जनतेत निर्माण झालेला टोकाचा राग, असंतोष कसा घालवायचा याच्या चिंतनातून मिलिटरी कल्पना पुढे आणली गेली. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत हे दाखविण्याचा अतिउत्साही प्रयत्न यातून झाला आहे.आपल्याकडे ‘मिलिटरीला बोलावले’ असे म्हटले की काहीतरी गंभीर घडले असे बोलले जाते. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सैन्यदलाला बोलावण्याची पद्धती आहे. लातूरच्या भूकंपात, गुजरातच्या पुरात सैन्यदल बोलावले गेले. येथे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नव्हती. तर अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष या घटनेला कारण होते. ज्या दिवशी हा पूल पडला होता त्याच्या दुसºयाच दिवशीच सैन्यदलाला बोलावून जर या पुलाचे काम सुरू केले असते तर सरकार या विषयावर खरोखरीच गंभीर आहे असे वाटले असते. पण तसे झाले नाही. महिन्यानंतर विचारपूर्वक केलेली ही राजकीय खेळी आहे.विरोध पूल बांधण्याला नाही, मात्र जर असे मिलिटरीला पूल बांधण्यासाठी बोलावले गेले तर उद्या छोट्या मोठ्या घटनांमध्येही सैन्यदलाला बोलावण्याची मागणी होऊ लागेल. ती नाही पुरवली तर त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप होतील. सैन्यदलाकडे कोणते विषय न्यायचे याचे तारतम्यही राखले गेले पाहिजे. आपल्याकडे अनेक अवघड बांधकामे कमी वेळेत करणाºया यंत्रणा असताना एक रेल्वेचा पूल आम्ही बांधू शकत नाही हे मान्य केल्यासारखे आहे. जो संदेश यातून गेला तो जास्त निराशाजनक आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई