शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

धार्मिक विद्वेषासाठी अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा वापर धोकादायक

By admin | Updated: July 14, 2017 23:56 IST

अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.

- सुरेश भटेवराअमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेच्या सुरक्षेसाठी सैन्यदल, सीआरपीएफ व बीएसएफसारखी केंद्रीय निमलष्करी दले, जम्मू काश्मीर राज्याचे पोलीस असे लाखाहून अधिक जवान तैनात आहेत. यात्रा मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हेलिकॉप्टर्सची देखरेख आहे, जोडीला ड्रोनचा वापर प्रथमच करण्यात येत आहे. तरीही अनंतनाग जिल्ह्याच्या बानतेंगू भागात, अंधाराचा फायदा घेत गुजरातहून आलेल्या भक्तांच्या बसला बेछूट गोळीबार करीत दहशतवाद्यांनी घेरले. अंदाधुंद गोळीबार केला. बसमधे ५८ प्रवासी होते. त्यातल्या ७ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले व १२ जण गंभीररीत्या जखमी झाले. महाराष्ट्रातील दोन यात्रेकरूंचाही त्यात समावेश आहे.माणसांच्या गर्दीवर चढवलेल्या हल्ल्यात प्राणहानी जितकी अधिक, तितकी बातमी मोठी. जगाचे लक्ष वेधण्यासाठी अशा बातम्या उपयुक्त ठरतात, अशी पक्की धारणा असलेले दहशतवादी धर्मस्थळांच्या यात्रांवर नियोजनपूर्वक हल्ले चढवतात. १७ वर्षांपूर्वी, २००० साली पहलगामच्या बेस कॅम्पवर असाच हल्ला चढवून अमरनाथ यात्रेकरूंना दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवले होते. किमान ३० ते ४० भाविक त्यात ठार झाले होते. या गंभीर घटनेनंतर तब्बल ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रतिवर्षी प्रचंड सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तरीही सोमवारी हल्ला झालाच. यात्रेकरूंची बस बलसाडची होती. शेख सलिम पटेल बसचा ड्रायव्हर. गोळीबार सुरू होताच प्रसंगावधान राखून त्याने ७०/८० च्या वेगाने बस तब्बल २ किलोमीटर पुढे दामटली. बसमधल्या अनेकांचे प्राण त्यामुळे वाचले. रस्त्यात सैन्यदलाचा कॅम्प लागताच सलिमने बस थांबवली आणि पोलिसांना फोन केला. सलिमच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तर त्याचे नाव शौर्य पदकासाठी सुचवण्याची इच्छा बोलून दाखवली. तथापि घटनेचे जे तपशील हाती आले आहेत त्यानुसार सुरक्षेच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून सायंकाळी ७ वाजेनंतर ही बस अंधारात धावत होती. अमरनाथ यात्रेच्या नियमावलीनुसार यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बसची नोंदणी आवश्यक असते. बलसाडच्या ज्या बसवर गोळीबार झाला, त्या बसची नोंदणी झाली होती की नाही, याबाबत दोन मते व्यक्त होत आहेत. ड्रायव्हर सलिमच्या म्हणण्यानुसार ‘बसची रीतसर नोंदणी नसती तर यात्रेकरूंना दर्शन घेताच आले नसते. या बसबरोबर अन्य बसेसही होत्या. त्या पुढे निघून गेल्या. माझी बस पंक्चर झाल्याने दुरुस्तीत तीन तास गेले. प्रवासाला त्यामुळे उशीर झाला’ असे सलिमचे म्हणणे आहे. दुसरीकडे अमरनाथ श्राईन बोर्डाच्या रजिस्टरमध्ये बसची नोंदणीच नाही. काही प्रमुख वाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या बातमीनुसार, २ जुलैच्या दर्शनानंतर बसमधले यात्रेकरू पर्यटन करीत होते. सुरक्षेचे सहा नाके बसने पार केले. कुणीही त्यांना अडवले नाही. असे कसे घडले? श्रीनगरहून सायंकाळी उशिरा कुणाच्या परवानगीने बसला जाऊ दिले? नियमांचे उल्लंघन करीत बसचा प्रवास यात्रेकरूंच्या आग्रहामुळे सुरू होता काय? सुरक्षा व्यवस्थेत इतका ढिलेपणा कुणी दाखवला? याची उत्तरे सखोल चौकशीअंतीच मिळणार आहेत.तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यात अर्थ नाही.अमरनाथची यात्रा भलेही हिंदूंची तीर्थयात्रा आहे मात्र काश्मीरचे मुस्लीम बांधव वर्षानुवर्षे त्याचा आदराने सन्मान करीत आले आहेत. ५०० वर्षांपूर्वी अमरनाथ गुहा शोधून काढण्याचे श्रेय देखील बूटा मलिक नावाच्या एका मुस्लीम गुराख्याचे आहे. जम्मू काश्मीर विधानसभेत अमरनाथ यात्रेसंबंधी जे विधेयक मंजूर झाले, त्यातही मलिकच्या कुटुंबाचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. अमरनाथमध्ये सध्या काश्मिरी पंडित, बूटा मलिकांचे वंशज आणि महंत अशा तीन प्रकारच्या लोकांचे वास्तव्य आहे. यात्रेतील छडी मुबारकची पारंपरिक पूजा हे तिन्ही समुदायच एकत्र येऊन पूर्णत्वाला नेतात. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर उठसूठ मुस्लीम समुदायाला बदनाम करणाऱ्या तथाकथित भक्तांना याची कल्पनाही नसावी. यात्रेवरील हल्ल्यात निरपराध यात्रेकरूंचे बळी जाणे ही नि:संशय दुर्दैवी बाब आहे. साऱ्या देशाने अमरनाथ घटनेची निर्भर्त्सना केली. सोशल मीडिया आणि टिष्ट्वटरवर काही उत्साही वीरांनी, सांप्रदायिक उन्माद भडकवण्याचा उपद्व्याप सुरू केला तेव्हा अतिशय संयत शब्दात त्याचे थेट उत्तर देताना गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, ‘सारे काश्मिरी काही दहशतवादी नाहीत. देशाच्या प्रत्येक भागात शांतता आणि सद्भाव राखणे, सर्वांच्या सुरक्षेची चिंता करणे, त्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करणे हे माझे काम आहे.’ राजकारणाची पर्वा न करता आपल्या घटनात्मक जबाबदारीचे भान ज्याप्रकारे गृहमंत्र्यांनी दाखवले, ते नि:संशय गौरवास पात्र आहे. ओमर अब्दुल्लांनीही राजनाथसिंगाच्या शालीन उद्गारांची प्रशंसा केली. या साऱ्या गोष्टी घडत असताना, मात्र घटनेनंतर अवघ्या २० मिनिटात सोशल मीडियावर काही उत्साही वीरांच्या तिखट प्रतिक्रियांचा भडिमार सुरू झाला. या प्रतिक्रियावादी मोहिमेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहरावही सामील झाले. टिष्ट्वटरवर अत्यंत बेजबाबदार विधान करीत पीव्हीएल नरसिंहराव म्हणाले, ‘अमरनाथ यात्रेत हिंदू यात्रेकरू ठार झाले आहेत. आता या घटनेचे ‘नॉट इन माय नेम’ गँग विरोध करणार आहे काय? की या गँगचा विरोध शिवभक्तांसाठी नव्हे फक्त अखलाक, जुनैद आणि पहलूखान यांच्या पुरता मर्यादित आहे,’ आपली तथाकथित निष्ठा आणि राष्ट्रवाद सिध्द करण्याच्या उन्मादात, नरसिंहराव यांना बेफाम विधाने करण्याचा छंद आहे, यापूर्वीही अनेकदा हे घडले आहे. आपली जळजळ व्यक्त करण्यापूर्वी त्यांनी अमरनाथच्या घटनेबाबत राजनाथसिंग यांचे टिष्ट्वटरवरील भाष्य वाचले असते तर ते अधिक उचित ठरले असते. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी, दिल्लीत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींवरील गौरव ग्रंथाचे मावळंकर सभागृहात प्रकाशन केले. सुलभ इंटरनॅशनलचे संचालक बिंदेश्वरी पाठक यांनी हा गौरव ग्रंथ लिहिला आहे. प्रकाशनाच्या शानदार सोहळ्यात बोलतांना भागवतांनी मोदी आणि पाठक यांच्यावर भरपूर स्तुतिसुमने उधळली. मात्र अमरनाथ यात्रेच्या हल्ल्यावर भाष्य तर सोडाच या घटनेचा साधा उल्लेखही केला नाही. ते काहीच का बोलले नाहीत? हा प्रश्न भागवतांना विचारण्याची हिंमत नरसिंहराव कधीच दाखवू शकणार नाहीत.काश्मीरबाबत केंद्र सरकारचे धोरण तीन वर्षांपासून अस्थिर व मोघम स्वरूपाचे आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जम्मू काश्मीर सरकारला वारंवार अपयश आले आहे. याबाबत सरकार आणि सत्ताधाऱ्यांची सातत्याने पाठराखण करणारे नेट योध्दे, नरसिंहरावांसारखे बोलघेवडे प्रवक्ते यांना कोणताही प्रश्न विचारावासा वाटत नाही. निषेधच करायचा तर सर्वप्रथम या मुद्यांचा करायला हवा. तथापि केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांमधे भाजप सहभागी असल्याने तथाकथित राष्ट्रभक्त दुसऱ्यांवर या जबाबदारीचे खापर फोडून मोकळे होणार यापेक्षा दुर्दैव कोणते?(राजकीय संपादक, लोकमत)