शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामात कृत्रिम वाळूचा उपयोग करणे अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:30 IST

इमारती, पूल, रस्ते इत्यादी बांधकामांसाठी वाळूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. काँक्रिटमध्ये तर वाळू हा मुख्य घटक असतो. सध्या ...

इमारती, पूल, रस्ते इत्यादी बांधकामांसाठी वाळूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. काँक्रिटमध्ये तर वाळू हा मुख्य घटक असतो. सध्या विकासाच्या कामांतर्गत काँक्रिटचे रस्ते बांधण्याचे मोठे प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. याचे उदाहरण म्हणजे नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे. हा महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून ८ पदरी काँक्रिटचा नियोजित महामार्ग आहे. काँक्रिटच्या रस्त्यांचे आयुष्य डांबरी रस्त्यांपेक्षा जास्त असते व त्याला लागणारा देखभालीचा खर्च कमी असतो.

दिवसेंदिवस काँक्रिटच्या व इतर बांधकामात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नैसर्गिक (नदीनाल्यातील) वाळूचा तुडवडा पडतो, ती महागडी होते किंवा कधी कधी तर नैसर्गिक वाळूअभावी बांधकामे बंद पडतात. त्यामुळे नैसर्गिक वाळूची मागणी प्रचंड वाढते. परिणामी वाळूचे बेकायदा व प्रचंड उत्खनन वाढते. त्याचा अनिष्ट परिणाम नदीनाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर पडतो. यामुळे नदीचा तळ सुरक्षित राहत नाही, आजूबाजूच्या परिसरात पाणी झिरपत ठेवणे आणि जलस्तर उंचावणे मंदाविते. जलचरांच्या जीवनचक्रावर परिणाम होतो व पर्यावरणाचा ºहास होतो. म्हणूनच केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सन २०१६ मध्ये केलेल्या कायद्यातील तरतुदींनुसार वाळूच्या उत्खननावरही बंधने आणली. बरेचदा वाळूघाट बंद असताना अवैधरीत्या वाळूउपसा सुरू असतो, परिणामी शासनाचा महसूल बुडतो. वाळूची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचतो. त्यामुळे बांधकामाचे अंदाजपत्रकही कोलमडते.

कधी कधी अवैधरीत्या वाळू पुरविणारे ठेकेदार पकडले गेल्यास ते संबंधित शासकीय यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले चढवितात. या प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात. त्यामुळे नैसर्गिक वाळूला उत्तम पर्याय म्हणजे फक्त कृत्रिम वाळू हा आहे. कृत्रिम वाळूला औद्योगिक भाषेत मॅन्युफॅक्चर्ड सँड किंवा एम सँड असे म्हणतात. नैसर्गिक वाळू म्हणजे नदी, नाल्यांच्या पात्रातून उपसण्यात आलेली वाळू होय. नदी, नाल्यांच्या प्रवाहातील दगडांचे पाण्यातील प्रवासात आपसात घर्षण होऊन बारीक वाळूत रूपांतर होते. यालाच आपण नैसर्गिक वाळू म्हणतो. या प्रक्रियेसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. कृत्रिम वाळू म्हणजे चांगल्या प्रतीचा खाणीचा दगड भरडून उत्पादित केलेली किंवा पाडकाम केलेल्या काँक्रिट, विटा, मॉर्टर अथवा अन्य सामग्रीतून निर्माण केलेली वाळू होय. कृत्रिम वाळू नेहमीच्या क्रशरमध्ये तयार न करता, अत्याधुनिक अशा व्हीएसआय (व्हर्टिकल शाफ्ट इम्पॅक्टर) मशीनने तयार केली जाते. यात नैसर्गिक वाळूसाठी आवश्यक असणारे सगळे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतात. तीकारखान्यात तयार होत असल्याने मातीविरहित असते.

कृत्रिम वाळूपासून तयार होणारे काँक्रिट आणि मॉर्टर नैसर्गिक वाळूपासून तयार झालेल्या किंबहुना काही परिस्थितीत त्याहीपेक्षा जास्त मजबुती देणारे असते. नैसर्गिक वाळू गोलाकार तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. यामुळे बांधकामात घट्टपणा येतो. ती अधिक मजबुतीने चिकटली जाते. त्यामुळे नैसर्गिक वाळूचा बांधकामातील उपयोग कमी करून त्याऐवजी कृत्रिम वाळूचा वापर वाढवणे आवश्यक ठरते. कृत्रिम वाळूचा उपयोग काँक्रिटिंग, प्लास्टरिंग, विटाची जुडाई, फ्लोरिंग इत्यादी सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी केला जाऊ शकतो. कृत्रिम वाळू सहजतेने आणि मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध आहे. बरेचदा ती नैसर्गिक वाळूपेक्षा स्वस्त असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात येणारे रस्ते, पूल, इमारती यांच्या बांधकामासाठी लागणाºया एकूण परिमाणाऐवजी २० टक्के कृत्रिम वाळूचा उपयोग करणे अनिवार्य केले आहे. कृत्रिम वाळू चांगल्या गुणवत्तेची असण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करून घेणे आवश्यक ठरते.

सर्वसामान्य नागरिकांनी बांधकामासाठी नदीच्या वाळूबाबतचा आग्रह सोडून पर्यायी कृत्रिम वाळूचा उपयोग केल्यास आपण निसर्गाचे जतन करू शकतो आणि वाळूटंचाईवर मात करू शकतो. यामुळे जनसामन्यातकृत्रिम वाळूचा बांधकामात उपयोग करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. ती काळाची गरज आहे. याकरिता संबंधित शासकीय बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांसारख्या विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांमध्ये कृत्रिम वाळूचा उपयोग करणे बंधनकारक करून त्याची अंमलबजावणी करणे अतिशय अत्यावश्यक आहे.

- प्रा.डॉ. संदीप ताटेवार, अभियांत्रिकी प्राध्यापक