शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

‘इंडियन पॉवर लीग’चे शहरी आणि ग्रामीण अवतार

By admin | Updated: July 9, 2015 22:22 IST

देशात रात्रंदिवस चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असल्या तरी मोठ्यातल्या मोठ्या घोटाळ्यांचा जीवसुद्धा तिथे क्षणभंगुरच ठरतो.

राजदीप सरदेसाई  (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)देशात रात्रंदिवस चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असल्या तरी मोठ्यातल्या मोठ्या घोटाळ्यांचा जीवसुद्धा तिथे क्षणभंगुरच ठरतो. संपूर्ण जून महिना या वाहिन्यांवर ललित मोदी यांच्या गैरव्यवहारांचा पगडा होता. तर जुलै महिना ‘व्यापमं’च्या घोटाळ्याने भारावून टाकला. तसेही, एकीकडे लंडनला जाऊन आश्रय घेतलेला एक साधा व्यापारी आणि त्याला मदत करणारे भारतातील वजनदार लोक तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील दूरवरच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले व्यापमंचे खुनी प्रकरण या दोहोंना एकाच वेळी सांभाळून घेणे वाहिन्यांच्या दृष्टीनेही कठीणच होते. या दोहोत एक गोष्ट सामायिक होती व ती म्हणजे देशातील सत्ताकारण्यांनी व्यक्तिगत लाभासाठी व्यवस्थेला पद्धतशीर मुरड घालणे. ललित मोदी प्रकरणात जे सत्ताकारणी साह्यभूत आहेत, ते सगळे चेहरे दिल्लीच्या सत्तावर्तुळात सतत दिसणारे. त्यात राजकारण्यांपासून जागतिक कीर्तीचे उद्योगपती, राजकारणी आणि क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील सारेच. थोडक्यात देशाच्या ‘मलईस्तरा’तील लोक. जोवर ललित मोदींवर गैरव्यवहाराचा ठपका आला नव्हता, तोवर तेदेखील या ‘इंडियन पॉवर लीग’चे (आयपीएल) एक घटकच होते. देशाच्या ग्रामीण भागातही अशीच एक आयपीएल आहे. तिथे झगमगाटी वातावरणातले लोक नसतात. त्यावर पकड असते ती आमदार, मध्यम स्तरातील नोकरशहा, पोलीस आणि अन्य सरकारी अंमलदारांची. हे सारे मिळून अमाप संपत्तीचा संचय करीत असतात. ललित मोदी स्वत:च्या आलीशान जहाजात फिरत असेल, पण हे लोक झाबुआ किंवा सागरसारख्या छोट्या गावांमधून आपली सूत्रे हलवीत असतात. म्हणजे त्या भागातले हेही व्हीव्हीआयपीच! हे दादा लोक त्या परिसरातील संपत्तीवर आपला हक्क सांगत असतात. व्यापमं प्रकरणातील हेच खरे आयपीएल. व्यापमं म्हणजे आहे तरी काय? शिक्षणक्रमांतील प्रवेश आणि व्यावसायिक नोकऱ्या प्रदान करणारे मंडळ. नोकरीसाठी अधीर झालेल्या लोकांच्या अधिरतेचा घेतला गेलेला गैरफायदा म्हणजे व्यापमं प्रकरण. या प्रकरणात ज्या तब्बल २५०० लोकांवरती आरोप आहे, ते कोणी परकीय चलनाचा गुन्हा करणारे मोठे गुन्हेगार नव्हेत. उलट हे आरोपी निम्न मध्यवर्गातील तरूण स्त्री आणि पुरूष आहेत. ललित मोदीचे वर्णन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला असे करायचे झाल्यास व्यापमंमध्ये अडकलेल्या लोकांच्या घरात तुम्हाला साधे काटे चमचे सुद्धा पाहायला मिळणार नाहीत. याचा अर्थ ललित मोदी हा जागतिक स्तरावरील आयपीएलच्या जाळ्याचा लाभार्थी तर व्यापमंचे लाभार्थी म्हणजे जिथे गुंतवणुकीला आणि औद्योगिकीरकणाला वावच नाही अशा ‘बिमारू’ राज्यातील मध्यप्रदेशचे रहिवाशी. तब्बल लाखभर मुलामुलींनी केवळ सरकारी नोकरीच्या आशेने व्यापमंच्या परीक्षा दिल्या आणि त्यांच्याच द्वारे जिल्हा स्तरावरील आयपीएलने धनसंचयाची संधी साधली. अगदी अलीकडे बिहारातील सामूहिक कॉपी प्रकरणाची आणि ती सुरु असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांची चित्रे आपण पाहिली. राष्ट्रीय, ग्रामीण आरोग्य योजनेमधील पैसा उत्तरप्रदेशातील राजकारणी आणि नोकरशहांनी कसा हडप केला, हेही आपण पाहिले. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांस जेलमध्ये जावे लागलेले हरयाणातील शिक्षकभरती प्रकरण आपण पाहिले. बिहारातील लालू प्रसाद यांचा चारा घोटाळा तर सगळ्यानाच ठाऊक आहे. या सर्व प्रकरणांमध्ये ज्या रकमेची वा ज्या गैर रकमेची उलाढाल झाली ती उलाढाल टू-जी किंवा कोळसा घोटाळ्यापेक्षा कमी किंवा नगण्य जरी वाटली तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती रक्कम अवाढव्यच म्हणावी लागेल. सरकारी नोकरी मिळवून देणे किंवा अपेक्षित जागी नियुक्ती वा बदली मिळवून देणे हा एक फार मोठा लाभदायक व्यवसाय ठरल्याचे आता काही गुपित राहिले नाही. पण अशा कारस्थांनाची पाळेमुळे किती खोलवर रूजलेली आहेत, हेच व्यापमंच्या घोटाळ्यानी प्रकर्षाने दाखवून दिले आहे. भाजपा नेते सांगतात त्याप्रमाणे कॉँग्रेसच्या राजवटीतही सरकारी नोकऱ्या अशाच पद्धतीने दिल्या आणि विकल्या जात असतीलही कदाचित पण, भाजपाच्या सत्ताकाळात ज्या अत्यंत सुनियोजित पद्धतीने व्यापमंचा घोटाळा केला गेला तो अद्वितीयच म्हणावा लागेल. व्यापमंच्या घोटाळ्या’ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान वा त्यांचे नातलग दोषी आहेत वा नाही, हा मुद्दाच वेगळा. पण त्यांना या घोटाळ्याशी काहीच सुगावा लागला नसावा, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि अनेक सरकारी नोकर कारागृहात बंद झाल्यानंतर आपल्या सरकारच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांचा दावा किती फोल होता, हे स्पष्ट दिसून येते. या घोटाळ्याला मध्यप्रदेशातील रास्व संघाच्या स्थानिक नेतृत्त्वाचा केवळ पाठिंबाच होता असे नव्हे तर त्यांचा प्रत्यक्ष सहभागही होता. याचा अर्थ सत्तेचा वापर आत्मविकासाठी कसा करून घ्यायचा याचे तंत्र या लोकानी कॉँग्रेसकडून अल्पकाळात आत्मसात केलेले दिसते.ता.क.: व्यापमंच्या घोटाळ्यात जे अनेक गूढ मृत्यू घडून आले त्यात एका पत्रकाराचा समावेश असल्याने वृत्तवाहिन्यांच्या महत्त्वाच्या वेळेत या बातमीबरोबरच व्यापमं घोटाळ्यावर नव्याने प्रकाश टाकला गेला. टीआरपीच्या मागे लागलेल्या वृत्तवाहिन्यांना ललित मोदी प्रकरणात प्रचंड रूची होती, हे देशाने पाहिले. पण, व्यापमं हे ज्या व्यावसायिक परीक्षा मंडळाचे लघुरूप आहे, त्या हिंदीतील लघुरूपात वृत्तवाहिन्यांना फार काही स्वारस्य असल्याचे मात्र जाणवले नाही.ही आजच्या माध्यमांवरील एक टिप्पणीच म्हणायची.