शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम्य सुखसोहळा

By admin | Updated: June 15, 2017 04:24 IST

पालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे.

- विजय बाविस्करपालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे. दरवर्षी पावसाबरोबरच मराठी मनाला वेध लागतात ते वारीचे. ग्यानबा-तुकोबांच्या गजरात चालणाऱ्या या वारीने भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांसह अनेक संतांनी भागवतधर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संत नामदेवांनी तर पंजाबपर्यंत जाऊन ही पताका रोवली. वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. ही वारीपरंपरा आपल्या सर्व संतांनी तब्बल सात शतकांपासून जतन केली आहे. तिची धुरा आता सामान्य वारकऱ्यांनी खांद्यावर घेतली आहे. इतकी वर्षे अखंडपणे चालणारी वारी हा एक चमत्कारच आहे. ही सामाजिक अभिसरणाची श्रेष्ठ प्रक्रिया आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीने चालणाऱ्या आषाढी एकादशीच्या या वारीत विठ्ठलनामाचा गजर असतो, भक्तिरसाचा अलौकिक बहर असतो. या भावगंगेत संतांनी लिहिलेले अभंग जसे असतात तसे लोकसहभागातून जन्माला आलेली कवने, ओव्याही असतात. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदायाच्या भक्तगणांसाठी आषाढीची वारी म्हणजे विठ्ठलभक्तीचा परमोच्च बिंंदू असतो. लाखो वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरीकडे धाव घेतात. खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांची पाउले पडू लागतात. भागवतधर्माच्या एकात्मतेची पताका खांद्यावर मिरवली जाते. सदाचाराचा संगम होतो. भक्तीची पेठ उभी राहते आणि पंढरीच्या वाळवंटात एकचि टाळी होते. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा, संत तुकोबारायाच्या भक्तिभावाचा, नामदेवरायांच्या आर्ततेचा, एकनाथ, जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतामाळी, बहिणाई, कान्होपात्रा, सेना, नरहरी आदी संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त होतो. वारी हा एक उत्कट अनुभव आहे. वारीत नुसते चालायचे नाही तर नामसाधना आहे, अभ्यास आहे, संवाद आहे, सत्संग आहे. या सगळ्यांची मिळून वारी होते. वारीने समाज एकसंध केला, जगण्याला आत्मबळ दिले. या नव्या सामर्थ्यातून महाराष्ट्र घडला. अठरापगड जातीतील संत भागवतधर्माच्या पताकेखाली एकत्र आले आणि ‘स्व’ला विसरून हरिनामाचा गजर करू लागले. हा वैष्णवांचा मेळा आहे. तो जातीकुलादिकांच्या वृथा अभिमानापलीकडे गेलेला आहे. या साऱ्यांना परमात्म्याची ओढ असते. त्यापुढे त्यांना इतर कसलीही आठवण नसते. परमानंद द्यावा आणि घ्यावा असा त्यांचा शुद्ध भाव असतो. विठ्ठलभक्ती या एकाच श्वासात प्रत्येकजण रंगलेला असतो. संतांनी दिलेले हे विचारबीज वारकऱ्यांच्या मनात रुजलेले आहे. श्रेष्ठता जातीवर नसून प्रामाणिक कर्मभक्तीत आहे, हे संतांनी पटवून दिले. समाजाला डोळस बनविले. कीर्तन-प्रवचनांतून लोकमनात रुजवले. ज्या गावाला जायचे तो परमात्मा आनंदस्वरूप आहे. ज्या वाटेने जायचे आहे त्या वाटेवरही आनंदच पेरलेला आहे. म्हणूनच पंढरीच्या वारीला आनंदसोहळा मानले जाते. त्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी जणू आनंदाची ओवी असतो.‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे॥ असे म्हणणारे तुकोबाराय याला अनुपम्य सुखसोहळा मानतात तर ज्ञानोबा माउली भक्तिवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना अमृततत्त्वाचा स्पर्र्श घडवून जातात. असा हा पालखी सोहळा १६ व १७ जूनला देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा पुन्हा एकदा जमणार आहे. त्यांच्याविषयी तुकोबाराय म्हणतात, गोपीचंदन उटी तुळशीच्यामाळा, हार मिरविती गळा। टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे।।नामाचा गजर करीत जेव्हा वारकरी रस्त्यावरून चालतो तेव्हा प्रसन्नता, सात्त्विकता, भक्तिरसाचा तो मूर्तिमंत आदर्श असतो. वारी आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे. शतकानुशतके चालत आलेली वारी आजच्या पिढीसाठीही कुतूहलाचा विषय आहे. वारीतून मिळणारी आत्मिक ऊर्जा काय असते हे अनुभवावेसे वाटते. त्यामुळे तरुणाईही उत्स्फूर्तपणे वारीशी जोडली जात आहे. दरवर्षी ‘पाउले चालती पंढरीची वाट’ म्हणत टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका यांच्या सहवासात वारकरी भक्तिरसानंदात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. आपणही होऊयात !