शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अस्वस्थ अमेरिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:26 IST

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन लोक अतिशय अस्वस्थ आहेत. कुठे ना कुठे होणा-या गोळीबाराच्या घटना, लहानसहान दहशतवादी कारवाया हे त्यांचे कारण आहे. शांत जीवन जगणा-या अमेरिकन लोकांना पहिला धक्का बसला ११ सप्टेंबर २00१ साली झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यांमुळे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन लोक अतिशय अस्वस्थ आहेत. कुठे ना कुठे होणा-या गोळीबाराच्या घटना, लहानसहान दहशतवादी कारवाया हे त्यांचे कारण आहे. शांत जीवन जगणा-या अमेरिकन लोकांना पहिला धक्का बसला ११ सप्टेंबर २00१ साली झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यांमुळे. अल-कायदा संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगच हादरले. त्यानंतर तसे भयानक हल्ले अमेरिकेत झाले नाहीत. जे हल्ले झाले ते भारतासह आशियाई, युरोपियन आणि आफ्रिकन देशांमध्येच. पण त्या हल्ल्यापासून अमेरिकनांच्या मनातील भीती गेलेली नाही. त्यामुळे कुठे खुट्ट झाले तरी अमेरिकन घाबरून जातात. दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क परिसरात एका इसमाने रस्यावरून चालणाºया लोकांवर ट्रक घातला आणि त्यात आठ जण मरण पावले. हा दहशतवादी हल्लाच होता आणि हल्लेखोराला जिवंत पकडण्यात पोलिसांना यशही आले. तो उझबेकिस्तानचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर दुसºयाच दिवशी कोलोरॅडो राज्यातील वॉलमार्टमध्ये एका इसमाने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात तीन जण मरण पावले. गोळीबार करणाºयाला अटक झाली नसली तरी तो दहशतवादी नाही, हे पोलिसांनीच म्हटले आहे. अशा वेळी लोक घाबरले असले तरी सरकार आणि प्रशासन यांनी घाबरून प्रतिक्रिया देण्याचे कारण नसते. पण न्यूयॉर्कमधील हल्ल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाईने जी प्रतिक्रिया दिली आहे, ते पाहता, तेच हबकून गेले आहेत की काय, अशी शंका यावी. त्या दहशतवाद्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. सामान्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. पण देशात न्यायव्यवस्था आहे, त्यांच्यापुढे खटला चालतो आणि मग निकाल दिला जातो, हे माहीत असताना राष्ट्राध्यक्षांनी घाईघाईने आणि अस्वस्थ होऊ न असे विधान करणे अयोग्य आहे. त्याही पुढे जात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ग्रीन कार्ड लॉटरीच बंद करण्याची भाषा सुरू केली. ग्रीन कार्ड हा अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठीचा व्हिसा आहे आणि न्यूयॉर्कमध्ये हल्ला करणाºया दहशतवाद्याकडे ग्रीन कार्ड होते. केवळ या कारणास्तव सरसकट ग्रीन कार्ड लॉटरी बंद करण्याची भाषा म्हणजे जगभरातून नोकरी, व्यवसायासाठी जाणाºयांना कायम अमेरिकेत राहण्याची बंदी करण्याचाच आदेश. अमेरिकेत जगभरातील अनेक देशांचे लोक वर्षानुवर्षे राहत आले आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. आशियाई आणि भारतीयांचे प्रमाणही प्रचंड आहे. त्यांच्यापैकी कैक लोकांकडे ग्रीन कार्ड आहे आणि कित्येक भारतीयांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. असे असताना ग्रीन कार्ड लॉटरी बंद करणे म्हणजे अशा सर्वांवर अन्यायच आहे. मुळात ट्रम्प यांचे जगभरात उद्योग असले तरी त्यांना आपल्या देशात अन्य देशांच्या नागरिकांनी येऊ न नोकºया करू नये, त्यांच्यामुळे अमेरिकन बेरोजगार आहेत, असे त्यांना वाटते. त्यातच बाहेरून येणारा प्रत्येक जण दहशतवादी आहे, असे समजून त्यांनी हे विधान केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करायला हवा. त्याऐवजी ते अधिक अस्वस्थता निर्माण करू पाहत आहेत. हा हल्लेखोर उझबेकिस्तानातील आहे आणि आशियाई नाही, हे नशीबच. अन्यथा सरसकट आशियाई देशांतील लोकांवर दहशतवादाचा आरोप करून, त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा विचार त्यांनी केला असता. सुदैवाने तेथील सुजाण आणि सहिष्णू लोक तसेच लोकप्रतिनिधी मात्र ट्रम्प यांच्याप्रमाणे विचार करणार नाहीत. ट्रम्प यांच्या कृतीला ते आक्षेप घेतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Americaअमेरिका