शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शहरांच्या गळ्याभोवती अनधिकृत होर्डिंग्जचा फास!

By किरण अग्रवाल | Updated: May 19, 2024 11:15 IST

Unauthorized hoardings : घाटकोपर प्रकरणानंतर जागी झालेली यंत्रणा आतापर्यंत झोपली होती काय?

- किरण अग्रवाल

शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले होर्डिंग्जचे लोण पाहता त्याच्या मजबुतीकडे लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. सध्याचे वादळी वारा, पावसाचे दिवस पाहता अनधिकृत होर्डिंग्जचा निकाल लावताना अधिकृत असलेल्या होर्डिंग्जचेही 'स्ट्रक्चरल ऑडिट' व्हायला हवे.

दुर्घटना घडत नाही तोपर्यंत यंत्रणा जागच्या हालत नाहीत, हेच खरे; त्यामुळे जिल्ह्यापासून ते तालुकास्तरापर्यंतच्या शहरांना अनधिकृत होर्डिंग्जचा फास बसला असला तरी तेथील स्थानिक प्रशासन घाटकोपरसारखी जीवघेणी घटना घडण्याची वाट पाहत बसल्याचेच दिसून यावे हे केवळ बेफिकीरपणाचेच नव्हे, तर संतापजनकही म्हणता यावे.

घाटकोपरमधील होर्डिंग्ज कोसळून त्याखाली १४ जणांचा जीव गेल्याची व काही जण जखमी झाल्याची दुर्घटना नुकतीच घडल्यावर आता जागोजागचे स्थानिक प्रशासन झोपेतून जागे झाले आहे. आपापल्या शहरात किती होर्डिंग्ज अधिकृत व किती अनधिकृत, याचा शोध घेऊन आता संबंधितांना नोटीसही बजावल्या जात आहेत व स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. खरे तर मागेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशा अनधिकृत होर्डिंग्ज व पोस्टर्स संदर्भात निर्देश दिले होते. तेव्हा काही ठिकाणी जुजबी, तोंडदेखली कार्यवाही केलीही गेली; परंतु पुढे सारे सपाट झाले आणि आता घाटकोपरमध्ये काही जीव गेल्यावर पुन्हा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तेव्हा मुळात हा उशीर करणाऱ्या यंत्रणांमधील संबंधितांवरच दप्तर दिरंगाईच्या कारवाया केल्या जावयास हव्या.

लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये हल्ली होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे, इतकेच नव्हे तर गाव खेड्यातही बसस्थानकांवर व हॉटेल्स आणि पान टपऱ्यांवर मोठमोठे पोस्टर्स उभारलेले दिसून येऊ लागले आहेत. स्वस्तात होणारी ही 'डिजिटल चमकोगिरी' जीवघेणी ठरणारी आहे, याचा संबंधितांकडून विचारच केला जात नाही. सध्या तर पाणी पावसाचे, वादळाचे दिवस आहेत. अवकाळी पावसासोबत जो वादळ वारा येतो, तो अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडवून नेतो. अशात अधिकतर तकलादू स्वरूपात असलेले होर्डिंग्ज कोसळून पडले तर ते जीवघेणेच ठरते, पण 'या भावात' चमकणाऱ्यांना व त्यासाठी जागा उपलब्ध करून पैसे कमावू पाहणाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही.

घाटकोपरमध्ये घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे जागे झालेल्या प्रशासनाला आपापल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. अकोला, बुलढाणा व वाशिमसारख्या जिल्हा शहरांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. तेथील कोणतेही रस्ते व चौक उरले नाहीत, जेथे होर्डिंग्ज नाहीत. काही चौक तर असे आहेत, की जेथे थांबल्यावर झकपक करणाऱ्या डिजिटल वॉल्समुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित झाल्याखेरीज राहत नाही. काही वाणिज्य संकुल व मुख्य रस्त्यालगतच्या खासगी इमारतधारकांनी प्रशासनाची परवानगी न घेताच आपापल्या इमारतींवरही मोठमोठे होर्डिंग्ज उभारले आहेत. असे करताना त्यांनी आपल्या सदनिकाधारकांच्या हवा पाण्याची सोय तर हिरावून घेतली आहेच, पण इतरांच्या जिवासाठी धोकाही निर्माण करून ठेवला आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाकडून १० होर्डिंग्जवर पोस्टर चिपकवण्याची परवानगी घेऊन पन्नास ठिकाणी पोस्टर्स लावणाऱ्यांवर काही एक कारवाई केली जाताना दिसून येत नाही. यातून प्रशासनाचा महसूल बुडतो, आणि अनधिकृत होर्डिंग्जबाजांचे खिसे गरम होतात. पण, मुद्दा तोही नाही, या अनधिकृत होर्डिंग्जची भक्कमता व त्याच्याशी संबंधित सुरक्षिततेची तपासणी तरी कुणी करणार आहे की नाही? तेच होत नाही हे दुर्दैव आहे. शिवाय, अधिकृत म्हणजे नोंदणीकृत होर्डिंग्ज तरी भक्कमच असतील याची खात्री कोण देणार? कमकुवत पायावर उभे असलेले हेच होर्डिंग्ज वादळी वाऱ्यात जीवघेणे ठरतात. घाटकोपरच्या घटनेने यासंदर्भातील धडा अधोरेखित करून दिला आहे.

सारांशात, धोकादायक होर्डिंग्जचा अनधिकृत बाजार रोखायचा असेल तर स्थानिक प्रशासनाने खंबीरपणे संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची मजबुतीही तपासली जाणे गरजेचे आहे. दुर्घटना घडून कोणाचे जीव जाण्यापूर्वी हे व्हायला हवे.