शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

असहिष्णुतेवरील परम असहिष्णु चर्चा

By admin | Updated: December 2, 2015 03:42 IST

गेल्या काही महिन्यांपासून देश पातळीवरील सारे महत्वाचे विषय बाजूला पडून ज्या केवळ एकाच विषयाची सार्वत्रिक आणि सार्वजनिक चर्चा होते आहे, त्या समाजातील वाढत्या

गेल्या काही महिन्यांपासून देश पातळीवरील सारे महत्वाचे विषय बाजूला पडून ज्या केवळ एकाच विषयाची सार्वत्रिक आणि सार्वजनिक चर्चा होते आहे, त्या समाजातील वाढत्या असहिष्णु वृत्तीवरील संसदेत खास घडवून आणलेली चर्चादेखील असहिष्णुतेच्याच मार्गाने आणि त्याच पातळीवर जावी हे देशाचे आणि संसदेचे दुर्दैवच म्हणायचे. देशात नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि खरे तर स्वबळावरील भाजपाचे सरकार स्थापन झाले तेव्हां देशभरातील समस्त समाजाची या सरकारकडून काही विशिष्ट अपेक्षा होती. ती तशी असण्याला प्रामुख्याने मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारकाळात जी भाषणे केली ती कारणीभूत होती. मोदींनी केवळ विकासाच्या एकमात्र कार्यक्रमावर जनतेकडून मते मागितली आणि त्यांच्या त्या वक्तव्यावर पूर्ण विश्वास ठेऊन लोकानी भाजपाला भरभरुन मते दिली. ही मते भले पक्ष म्हणून भाजपाच्या पारड्यात पडली असतील परंतु खरे तर ती सारी मते मोदींच्या त्या काळातील वक्तव्यांची पावती म्हणूनच लोकानी दिली होती. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पाठोपाठच ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या (एकमात्र दिल्ली विधानसभेचा अपवाद) त्या निवडणुकांमध्येही लोकानी भाजपावरच आपला विश्वास टाकला. परंतु कदाचित खुद्द नरेन्द्र मोदी नसतीलही त्यात, पण भाजपाच्या बव्हंशी नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेने मोदींवर टाकलेला विश्वास म्हणजे आपल्याला अनिर्बन्ध वर्तन करण्याची सनद असल्याचा पूर्णपणे चुकीचा अर्थ त्यामधून काढला. बेताल वक्तव्ये, धर्मा-धर्मात आणि समूहा-समूहात कलह निर्माण होईल अशी सर्रास आणि बेलगाम विधाने आणि तितकेच नव्हे तर आहार विहारावरुनदेखील समाजात दुहीचे वातावरण निर्माण होईल अशी कृत्ये होऊ लागली. परंतु त्याना कोणीही आवर घालेनासे झाले. परिणामी बोलभांड मंडळी अधिकच चेकाळल्यागत होत गेली. ते कमी होते म्हणून की काय, समाजातील विवेकी विचार नष्ट करण्यासाठी उघडउघड व दिवसाढवळ्या हत्त्यादेखील होऊ लागल्या. अशा परिस्थितीत समाजातील पापभीरु, विवेकवादी, संयमशील आणि सहिष्णु वर्ग भयभीत होत गेला. हा वर्ग जशास तसे उत्तर देण्याच्या प्रवृत्तीचा नसल्याने त्याने अत्यंत शांतपणे त्याच्या मनातील क्षोभ व्यक्त करण्याचा मार्ग अनुसरण्यास प्रारंभ केला. देशातील असहिष्णुतेचे वातावरण रोखण्यासाठी सरकार नावाची संस्था काहीही करताना दिसत नाही म्हणून मग त्यांनी त्याच सरकार नावाच्या संस्थेने बहाल केलेले पुरस्कार, पदव्या आणि पारितोषिके परत करण्यास सुरुवात केली. येथे सरकार या पक्षाचे की त्या पक्षाचे हा प्रश्नच नव्हता. कारण कोणतेही सरकार जेव्हां सत्ताधीश झालेले असते तेव्हां त्याचा संबंध आणि त्याचे उत्तरदायित्व केवळ आणि केवळ जनतेच्याच प्रती असते किंवा असले पाहिजे. सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून मग संसदेतील विरोधी पक्षांनीदेखील देशातील वृद्धिंगत होत चाललेल्या असहिष्णुतेच्या विरोधात संसद सभागृहात सरकारला कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून झाले काय तर संसदेचे कामकाजच ठप्प पडले. दरम्यानच्या काळात देशातील परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. त्यातूनही महत्वाचे म्हणजे बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा आणि तोच न्याय लावायचा तर मोदींचा अत्यंत दारुण पराभव झाला. या पराभवाचा असेल वा एकूणच देशातील वातावरणाचा परिणाम असेल, सरकार संसदेत साऱ्याच विषयांवर चर्चा करायला तयार झाले. त्यासाठी अग्रक्रमाने निवडला गेला तो देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा. देशातील असहिष्णुता वाढीस लागली आहे असा साऱ्याच खासदारांचा (त्यात खुद्द भाजपामधीलही काही असू शकतात) मुद्दा असल्याने किमान असहिष्णुतेवरील चर्चा तरी परम सहिष्णुता दाखवून केली जाईल अशी अपेक्षा बाळगणे अस्थानी ठरले नसते. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. संसदेत कोणताही मुद्दा दोषारोपाशिवाय मांडायचाच नाही असा काहीसा दंडकच रुजू झाल्यासारखी स्थिती असल्याने सोमवारी संसदेत झालेली बहुतेक चर्चा त्याच वळणाने गेली. पण सर्वाधिक गोंधळ झाला तो माकपाचे खासदार मुहम्मद सलीम यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नावावर कोणे एकेकाळी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमधील एका कथित आणि वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला तेव्हां. तब्बल आठ शतकांनंतर देशाला एक हिन्दू शासक मिळाला असल्याचे विधान म्हणे राजनाथ यांनी सदर मुलाखतीत केले होते. वस्तुत: कोणत्याही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बाबी एरवी संसदेच्या पटलावर येऊ दिल्या जात नाहीत. पण ही बाब येऊ दिली गेली. राजनाथ यांनी सदर विधानाचा स्वच्छ इन्कार केला. त्यावर सलीम यांनी आपला आरोप मागे घ्यावा अथवा सदनाची माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली. सलीम यांनी ती नाकारली तेव्हां लोकसभा अध्यक्षांनी त्यांनी केलेला आरोपच कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकला. आता संबंधित नियतकालिकाने ते विधान राजनाथसिंह यांनी नव्हे तर विहिंपचे अशोक सिंघल यांनी केले होेते असा खुलासा करुन ते विधान समाविष्ट असलेली मुलाखतच मायाजालातून कायमची काढून घेतली आहे.