शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यातच पारदर्शकतेचे अजीर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:39 IST

निवड करण्यामध्ये निवड न करणे हा भागही असतोच. त्यामुळे एखाद्याची निवड का केली व एखाद्याची का केली नाही याची संक्षिप्त कारणमीमांसाही प्रसिद्ध होऊ लागली.

निवड करण्यामध्ये निवड न करणे हा भागही असतोच. त्यामुळे एखाद्याची निवड का केली व एखाद्याची का केली नाही याची संक्षिप्त कारणमीमांसाही प्रसिद्ध होऊ लागली.गेली २५ वर्षे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांवरील शेकडो न्यायाधीशांची निवड, नखशिखांत गोपनीयतेच्या पडद्याआड राहून, ‘हम करे सो कायदा’ अशा पद्धतीने करणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियमची अवस्था दोन घासातच अजीर्ण झाल्यासारखी झाली आहे. कॉलेजियमची ही पडदानशीन पद्धत मोडित काढून न्यायाधीशांच्या नेमणुका खुलेपणाने व वस्तुनिष्ठ निकषांवर करण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक आयोग स्थापन करण्याचा कायदा व घटनादुरुस्ती सरकारने केली. परंतु हा न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द करून ‘कॉलेजियम’ कायम ठेवले. मात्र तो निकाल देतानाही न्यायाधीशांना कॉलेजियमची अपारदर्शकता खवखवली व म्हणून त्यांनी ही पद्धत पारदर्शी करण्याची गरज प्रतिपादित केली. सरन्यायाधीशांसह कॉलेजियममधील पाचही न्यायाधीशांनी न्यायाधीश निवडीसंबंधीचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय आॅक्टोबरमध्ये घेतला. यानुसार कॉलेजियमच्या १५ बैठकींमधील निर्णय प्रसिद्धही झाले. परंतु ही पारदर्शकता पुरती अंगी मुरण्याआधीच कॉलेजियममधील अस्वस्थता समोर आली. न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ व न्या. रंजन गोगोई या कॉलेजियममधील पाचपैकी तीन न्यायाधीशांनी या पारदर्शकतेला मुरड घालण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली. निवडप्रक्रियेत ज्यांची नावे नाकारली जातात असे कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश किंवा वकील यांना नाकारल्याची माहिती त्याच्या कारणांसह प्रसिद्ध केली तर त्यांच्या प्रतिष्ठेस बट्टा लागेल. कॉलेजियमची पारदर्शकता अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे कुणाच्याही अप्रतिष्ठेचे कारण होऊ नये, असे या तीन न्यायाधीशांचे म्हणणे. परंतु पारदर्शकतेच्या निर्णयाचा मूळ ठराव पाहिला तर तो पाचही न्यायाधीशांनी एकमताने घेतल्याचे दिसते व त्यावर पाचही जणांच्या स्वाक्षºया होत्या. आता दोन महिन्यांनी पाचपैकी तीन न्यायाधीशांनी असा वेगळा सूर लावल्याने कॉलेजियमची विश्वासार्हता वाढण्याऐवजी तिच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. न्यायाधीशांनी केवळ न्यायासनावर बसल्यावरच नव्हे तर प्रशासकीय कामातही न्यायिक चौकसदृष्टी ठेवणे अपेक्षित असते; शिवाय ज्यांची निवड झाली नाही त्यांची माहिती प्रसिद्ध न करणे हेच पूर्णपणे असमर्थनीय आहे. अंतिमत: कॉलेजियमच्या पातळीवर ज्यांची नावे मंजूर केली जात नाहीत त्यांची नावे मुळात संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आलेली असतात. ज्यांची नावे पाठविली जातात त्यांची त्यासाठी संमती घेतली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या पदासाठी आपल्या नावाचा विचार करण्यास संमती देते तेव्हा आपले नाव नामंजूरही होऊ शकते याचीही त्या व्यक्तीस पूर्ण जाणीव असते. त्यामुळे एखाद्याचे नाव अमूक कारणासाठी नामंजूर झाले हे जगाला कळल्याने त्या व्यक्तीची बदनामी होण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या देशात न्यायदान करण्यासाठी कुणाची निवड का केली जाते हे जाणण्याचा जनतेला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार कुणाची निवड का केली गेली नाही, हे जाणण्याचाही अधिकार आहे. आता तीन न्यायाधीश जो मुद्दा मांडत आहेत तोच मुद्दा एखाद्या प्रकरणात त्यांच्यापुढे युक्तिवादात मांडला गेला तर ते तो नक्कीच फेटाळतील.- अजित गोगटे