शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसवर ट्रम्प एकाकी

By admin | Updated: July 15, 2017 00:01 IST

अमेरिका वगळता इतर सर्व सहभागी देशांनी पर्यावरणासंबंधीच्या पॅरिस कराराला सहमती दर्शविल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मुद्यावर एकाकी पडले

जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये पार पडलेल्या ‘जी २०’ परिषदेत अमेरिका वगळता इतर सर्व सहभागी देशांनी पर्यावरणासंबंधीच्या पॅरिस कराराला सहमती दर्शविल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मुद्यावर एकाकी पडले आहेत. जागतिक हवामान बदलाचे परिणाम रोखण्याकरिता २०१५ साली जगातील १९५ देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. जगाचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या स्तरापेक्षा दोन अंश खाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट यात निश्चित झाले होते. परंतु ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होताच पॅरिस करारातून बाहेर पडण्याचे जाहीर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. अमेरिकेनेच माघार घेतल्यामुळे आता या कराराचे भविष्य काय असणार? अशी चिंता वर्तविली जात होती. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीसुद्धा अलीकडेच ट्रम्प यांच्या या निर्णयावर सडकून टीका केली. अमेरिकेच्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे पृथ्वीचे तापमान शुक्र ग्रहाएवढे वाढेल आणि येथील जीवन नष्ट होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारे नुकसान भरून निघणारे नाही. यावर नियंत्रण न आणल्यास पृथ्वीचे तापमान २५० अंश सेल्सिअस होईल आणि येथे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडेल, असे हॉकिंग यांचे म्हणणे आहे. हॉकिंग यांनी दिलेला इशारा प्रत्येक देशानेच गांभीर्याने घ्यायला हवा. कारण हवामान बदल हे आज साऱ्या जगापुढील सर्वात मोठे संकट आहे. पॅरिस कराराने वातावरणातील कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वचनबद्धतेनुसार अमेरिकेला २६ ते २८ टक्के उत्सर्जन कमी करायचे आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. परंतु ट्रम्प यांना हे मान्य नाही. हा करार अमेरिकेच्या हिताचा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात यामागील त्यांचा राजकीय स्वार्थ सर्वांच्याच लक्षात आला आहे. पर्यावरण रक्षणासाठीच्या जागतिक एकजुटीला ट्रम्प यांच्या हेकेखोर वृत्तीने निश्चितच तडा गेला आहे. परंतु हा करार मान्य करणारे देश यातील धोरणाचा पाठपुरावा करून तापमान विरोधातील चळवळ तडीस नेतील, अशी अपेक्षा आहे.