शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:35 IST

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला.

- नंदकिशोर पाटीलत्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे आणि त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात!दोन वर्षांपूर्वी भागवतांनी चिंतन शिबिरात सांगितलेलं हे ‘त्रिपुरा पौर्णिमा’ महात्म्य तेव्हा काही स्वयंसेवकांच्या डोक्यावरून गेलं होतं. कोण हा त्रिपुरासुर? कुठे आहे त्याचे ते नगर? चिंतनाचा विषय तर ‘पूर्वांचल की ओर’ असा असताना अचानक हे त्रिपुरारी पुराण का? एक ना अनेक अशा अनुत्तरित प्रश्नांना मागे सोडून ती बैठक पार पडली...भागवतांच्या बौद्धिकाचे हेच तर वैशिष्ट्य. ते जेव्हा डावीकडे बघा, असे म्हणतात तेव्हा ऐकणा-यांना वाटतं, ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत असावेत. पण स्वयंसेवकाला हा इशारा पुरेसा असतो. लागलीच ते आपली शबनम काखेत अडकवून पश्चिम बंगाल अथवा केरळकडे कूच करतात. तेव्हाही असेच घडले. ‘दक्षिणायन’ शिबिरात भागवतांनी स्कंद पुराणातील त्रिपुरारी पौर्णिमेचं महात्म्य सांगताच देवधर आदी स्वयंसेवकांनी आपला मुक्काम आगरतळाकडे हलविला होता. गेली दोन दशकं त्रिपुरात माणिकांचं सरकार होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी या न्यायानं चालणारं. जातीय दंगली आणि भ्रष्टाचाराचा मागमूस नसल्याने वरकरणी ही लढाई सोपी नव्हती. कूटनीतीचा कस लागणार होता. देव आणि दैत्याचे द्वंद्वं उभं केल्याखेरीस जनतेला भाविक बनविता येणार नाहीे, हे भागवतांना ठाऊक होतं. कर्मसिध्दांताची पाठराखण आणि लेनिनवादावर ठाम विश्वास असलेल्या इथल्या कर्मठ ‘सरकार’चा तर देवाशीच उभा दावा...अखेर भागवतांना लढाईचे सूत्र गवसले. त्रिपुरातील ‘माणिक’मोती टिपायचे असतील तर ही कामगिरी एखाद्या देवावर सोपवायला हवी! देवधर होतेच. देवाचा शोध सुरू झाला. अन् दैवयोग असा की, कधीकाळी व्यायामशाळेत (जिम) प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) असलेले विप्लव कुमार देव नावाचे कार्यकर्ते संघातच होते! त्रिपुराच्या लढाईचा नायक ठरला. आता संहिता बाकी होती. नवमतदारांना पुराणातील वांगी दाखवून आकर्षित करता येणार नव्हते. भविष्य आणि भुकेच्या चिंतेतून त्यांना मुक्ती हवी होती.अच्छेदिनाचे स्वप्न दाखवून भूक तात्पुरती का होईना शमविता येते, हा पूर्वानुभव असल्याने ‘माणिक नही हिरा चाहिए’! अशी आकर्षक घोषणा तयार झाली. संघाकडे प्रचारकांची वानवा नव्हती. बघता-बघता घरोघरी ही घोषणा पोहोचली. कालपरवापर्यंत माणिकांच्या नावाचा जप करणारी पिढी स्वप्नातील या हि-यास (हायवे, इंटरनेट, रोडवे अन् एअरवेज) भुलली अन् सरकारबरोबर ‘लेनिन’ही धारातीर्थी पडले!