- स्नेहा मोरे
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ‘स्क्रॅपक्रो’ ही कंपनी कचऱ्याची देखभाल करण्याचे काम करते. कचऱ्याची विल्हेवाट, पुनर्वापर अशा संकल्पेतून उद्योगाची उभारणी करून, आता कचऱ्याची सुविधाजनक आणि पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावणारे एक आॅनलाइन व्यासपीठ आहे.‘स्क्रॅपक्रो’चे एक सहसंस्थापक रजत शर्मा म्हणाले, ‘सर्वोत्कृष्ट किमतीत कचऱ्याचे रिसायकलिंग करणारा आणि लोकांच्या थेट दारात उपलब्ध होणारा सर्वात विश्वासू मित्र बनणे हे कंपनीचे लक्ष आहे.’ आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न आहे. या कार्यात वसंधुरेचाही समतोल राखण्यास हातभार लावायचा आहे. ही संकल्पना सर्वांसमोर आल्यानंतर, लगेचच महिन्याभरात पवईतून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ७० विनंत्या प्राप्त झाल्या होत्या.’‘स्क्रॅपक्रो’मध्ये रजत शर्मा यांच्याबरोबरच देवेश वर्मा, इहतीशाम खान आणि प्रणव कुमार यांचाही सहभाग आहे. ‘स्क्रॅपक्रो’ म्हणजे सामान्य माणसाची कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधीची समस्या सोडवण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे. रजत शर्मा सांगतात की, ‘हे व्यासपीठ आपल्या ग्राहकांना आपल्या सोर्ईनुसार कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या विक्रेत्याला बोलावण्याची संधी मिळवून देण्याचे काम करते. ही टीम लवकरच एक मोबाइल अप्लिकेशनदेखील लाँच करणार आहे. ‘स्क्रॅपक्रो’ आपल्या आॅन-बोर्ड डिलर्सद्वारे कचऱ्याचे रिसायकलिंग करण्याचे कामदेखील करते.’ रजत शर्मा सांगतात, ‘मध्यस्तांच्या मोठ्या साखळीला पार करून एकत्रित केलेल्या कचऱ्याला थेट रिसायकलिंग प्लांट आणि डिलरना देतो.’ या कंपनीमार्फत लवकरच कागदापासून ते ई-कचऱ्यापर्यंतच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉपोर्रेट आणि किरकोळ विक्रेत्यांसोबत करार करणार आहे. कंपन्यांसाठी चिंध्या तयार करणे, डेटा सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजनाही आहे. सध्या आमच्याकडे कचऱ्याचे पाच आॅनलाइन डिलर्स आहेत, तर पवई आणि आसपासच्या परिसरात सेवा देण्यासाठी आणखी १० डिलर्सना जोडण्याची त्यांची योजना आहे. रजत शर्मा सांगतात, ‘या डिलर्सनी व्यावसायिक पद्धतीने काम करावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतो. यासाठी आम्ही त्यांना कम्युनिकेशन आणि योग्य व्यवहार कसा करावा, याचे प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षणदेखील देतो. स्क्रॅपक्रोकडे सध्या विद्यार्थी, व्यावसायिक, संस्था आणि किरकोळ विक्रेत्यांकडून बुकिंग होत आहे.’