शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची शोकांतिका

By admin | Updated: January 29, 2015 06:46 IST

सत्ताकारण की समाजकारण, हा सनातन प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो. परंतु, खरोखरच राजकारण करताना किती तडजोडी कराव्या लागतात,

 विजय बाविस्कर -

सत्ताकारण की समाजकारण, हा सनातन प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो. परंतु, खरोखरच राजकारण करताना किती तडजोडी कराव्या लागतात, हे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला समजले असेल. अन्यथा, कायदेशीरदृष्ट्या उसाला वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे बंधनकारक असताना आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली नसती. दोन-तीन वर्षांपासून कारखान्यांच्या धुराड्यांबरोबर रस्त्यांवर टायर पेटवून आंदोलन करणारे राजू शेट्टी इतके मवाळ झाले नसते. ते आणि त्यांच्याबरोबरच्या इतर शेतकरी संघटना ऊसाला तीन-साडेतीन हजार रुपये भाव देण्याची मागणी दोन-तीन वर्षांपासून करीत होते. आता किमान ‘एफआरपी’ द्या, असे त्यांना म्हणावे लागत आहे. मुख्यमंत्रीही साखर कारखानदारांना एफआरपी द्यायलाच लावू, असे आश्वासन देऊन समजूत काढत आहेत. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असा खेळ चाललाय आणि त्यात ऊस उत्पादक भरडला जातोय. साखरेचे भाव पडल्याने कारखान्यांना एफआरपी देणे शक्य नाही, हेदेखील फारसे पटत नाही. राज्यातील ज्या २६ कारखान्यांनी एफआरपी दिली, त्यांना कसे परवडले? येथे कारखान्यातील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा डोळ्याआड करून चालणार नाही.टोल जावो... ‘घंटा’ वाजोबेळगाव नाट्य संमेलनाचे बिगुल वाजत आहे. कर्नाटक शासनाकडून आकारला जाणारा अवाजवी टोलचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गाडीसाठी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत कितीही टोल आकारला जातो. त्यामुळे मराठी नाटक कंपन्यांना कर्नाटकात दौरा काढणेच परवडत नाही. या आर्थिक मुद्द्यामुळे बेळगाव आणि सीमा भागात अनेक वर्षांपासून मराठी नाटक पोहोचलेले नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. आठ दिवसांचे संमेलन होईल. यानिमित्ताने सीमा भागातील मराठी बांधवांना नाट्य चळवळीची माहिती होईलच; पण त्याचबरोबर टोलबाबत काही ठोस निर्णय झाला, तर सीमा भागातील रसिकांची मराठी नाटकांची भूक भागेल. टोल जावो... ‘घंटा’ वाजो हीच सीमावासीयांची भावना आहे.प्रतिसाद की प्रमाद?पुणे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘मिस्टर अ‍ॅँड मिसेस’ नाट्य प्रयोगाच्या वेळी अश्लील शेरेबाजीच्या कथित प्रकरणामुळे सांस्कृतिक क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या नाटकातील कलावंत चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांनी फेसबुकवरून खंत मांडताना सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतता यांचा संबंध नसतो, असे म्हटले आहे. बार असोसिएशनने याचा इन्कार केला आहे. उत्सवी वातावरणात असा प्रकार झाला, असे गृहीत धरले, तरी कोणा एका कंपूमुळे समस्त पुणेकरांना वेठीस धरणे किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे कितपत योग्य आहे, याचा विचारही होण्याची गरज आहे. या प्रकाराचे कोणतेही समर्थन करता येणार नाहीच; पण शेरेबाजीचे आरोप हे स्थल-कालसापेक्ष असतात. ‘पब्लिसिटी स्टंट’साठी ते झाले असावेत, असा बार असोसिएशनने केलेला आरोपही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. माध्यमांनी ज्या पद्धतीने या प्रकाराला ‘हवा’ दिली आणि अतिरंजित वृत्तांत दिले, त्यावरदेखील विचार व्हायला हवा. अशी ‘मीडिया ट्रायल’ एखाद्या संघटनेच्या आजवरच्या कामालाच बट्टा लावू शकते आणि प्रेक्षक-कलावंतांतील नात्यात दुरावा निर्माण करू शकते. मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रेक्षकांचा प्रतिसाद, हाच कलाकारांचा प्राणवायू आहे. मात्र, अशा प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रेक्षकांचा प्रतिसादही ‘सेन्सॉर’ होऊ नये आणि रसिकांच्या अतिउत्साही प्रतिसाद तथा प्रमादामुळे कलाकारांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये.