शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

उद्याचे माउली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:24 IST

विठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली.

- डॉ. गोविंद काळेविठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली. हे तर आणखी सोपे झाले. माउलीच्या रूपाने चैतन्य साक्षात साकारले. वारकरी तर देहभान विसरून माउली! माउली! एवढाच जयजयकार करूलागले. माउलीचा ध्वनी ब्रह्मांड भेदून पार पैलाड गेला. मराठमोळ््या संस्कृतीने विश्वाला माउली दिली आणि वेडे केले बघा. विठू अंतर्धान पावला म्हणून काय झाले. विठूची जागा ज्ञानेश्वरांनी घेतली आणि भक्तांना त्रैलोक्य तोकडे झाले. माउलीचा जयजयकार करीत वारकºयांनी चेतनाचिंतामणीचे गांव गाठले. अमृतकण नव्हे तर अमृतीचा सागर त्यांना गवसला.परवा गावाकडच्या मंदिरात काकड आरतीसाठी उपस्थित राहाण्याचा योग आला. सारे दर्शनार्थी एकमेकांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करीत होते. सोबत असलेल्या नातीला म्हणालो अगं! त्या आजोबांना नमस्कार कर म्हणताक्षणी नातीने नमस्कार केला. त्याबरोबर त्या वयस्क आजोबांनी तिच्या पायावर डोके टेकविले नि म्हटले माउली नमस्कार. नात गांगरली. तसे ते म्हणाले आम्हा वारकरी संप्रदायाची ही शिकवण. ‘‘जे जे भेटिजे भूत। ते ते मानिजे भगवंत’’. अनाकलनीय कविता लिहिणाºया आणि मराठी साहित्यात नवकवी म्हणूून अजरामर झालेल्या मर्ढेकरांच्या कवितेत माउली भेटली.‘‘पोरसवदा होतीस कालपरवा पावेतोथांब उद्याचे माउली तीर्थ पायीचे घेतो.कुमारिकेमध्ये त्यांना उद्याचे मातृत्व दिसत होते. माउलीचा साक्षात्कार झाला. हा मर्ढेकर नावाचा नवकवी माउलीचे दर्शन घेऊनच थांबला नाही तर तिच्या पायीचे तीर्थ घेण्यासाठी पुढे सरसावला. माउलीचा परम अर्थ मर्ढेकरांच्या कवितेत गवसला. आपल्या संस्कृतीमधील ‘कुमारिका पूजन’ अर्थ कळला. नारायण अथर्वशीर्ष वाचताना‘‘नारायणाद् ब्रह्मा जायते। नारायणाद् विष्णुर्जायतेनारायणात् प्रवर्तंते । नारायणे प्रलीयन्ते’’अशा नारायणाला हात जोडले तेव्हा समोर माउली उभी राहिली. नारायणाचे स्वरूप म्हणजे माउली. सान्ताला कवेत घेणारी अन्नरूपी माउली. माउली या तीन अक्षरांचा परिचय ज्याला झाला त्याला परमार्थ सोपान सुलभ झाला. 

टॅग्स :Pandharpurपंढरपूरnewsबातम्या