शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

सहकाराच्या माध्यमातूनच शेतीचा विकास शक्य

By admin | Updated: January 29, 2016 04:00 IST

भारत सरकारने १९९१ साली स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतातील सहकारी अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाची समजून तिचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय

- प्रा. कृ. ल. फाले(सदस्य, अभ्यास मंडळ, अमरावती विद्यापीठ)भारत सरकारने १९९१ साली स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतातील सहकारी अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाची समजून तिचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांची जी समिती वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली गठित केली, त्या समितीने भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा किंचितही अभ्यास न करता आपल्या शिफारशी लादल्या आणि ग्रामीण भागातील कृषी पतपुरवठ्याचा आत्मा समजल्या जाणाऱ्या प्राथमिक सेवा सहकारी संस्थांची वाट लावण्याचे काम केले.परिणामी सहकारी अर्थव्यवस्थेचे जे विलोभनीय दर्शन ग्रामीण भागातून होत होते ते आता पूर्णपणे नष्ट झाले आहे. शासन आणि शिखर सहकारी संस्था आपल्या संलग्न संस्थांकडे आता लक्ष द्यायलाही तयार नाहीत. राज्य सहकारी बँक, दूध सहकारी महासंघ, राज्य भूविकास बँक यांच्यावर प्रशासक नेमून शासन त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावता येईल याकडेच आता लक्ष देत आहे. शेतकरी कर्जमाफीचे पॅकेज जाहीर करूनही शेतकरी कर्जातून मुक्त होत नाहीत. मात्र जिल्हा बँका, पतसंस्था, सावकार यांना मात्र अशा पॅकेजचा भरपूर फायदा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीच्या नावाखाली आधीच कमकुवत असलेल्या सहकारी संस्था मोडकळीस आणल्या आहेत.भारताच्या एकूण उत्पन्नात शेतीपासूनच्या उत्पन्नाचा वाटा ६५-७० टक्के आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था हा सहकारी चळवळीचा पाया होय. हा पायाच आता नेस्तनाबूत झाला आहे. सहकारी चळवळ ही निष्ठेवर आधारलेली चळवळ आहे. भारतातील ७० हजार खेड्यातून वास्तव्य करीत असलेल्या सामान्यजनांचे प्रगत साधन म्हणून आपण सहकारी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहोत, अशी जाणीव त्यावेळी असल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग तेव्हां संघटित झाला होता. सहकारी अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, ती विविधांगी व्हावी म्हणून हरतऱ्हेचे नवनवीन उपक्रम सुरुवातीच्या काळात हाती घेण्यात येत असत. अशा प्रयत्नातूनच आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. शेतकऱ्याला कारखानदार करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सहकारी चळवळीने चांगलीच उभारी घेतली व त्यातूनच सहकारी क्षेत्रात प्रक्रिया उद्योग उभे राहू शकले. सहकारी उद्योग उभारणीमध्ये वैकुंठभाई मेहता व डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे अथक प्रयत्न होते. त्यापायीच शेती उद्योगाला महत्त्व आले व त्याला कारणीभूत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थाच होत्या. विशेष म्हणजे सन १९४५ च्या सुमारास वैकुंठभाई मेहता शिखर सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असताना प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील यांनी दि. १७ डिसेंबर १९४५च्या प्रथम सभेत डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची अध्यक्षपदी निवड करुन कारखान्याचे अध्यक्षपद स्वत:कडे घेतले. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा पाया मजबूत का आहे, याचा प्रत्यय या उदाहरणावरून येतो. कालागणिक सहकारी चळवळीचा प्रवाह सर्वस्पर्शी होण्याऐवजी अवरुद्ध होत गेला. त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवनवीन प्रश्नांना साहजिकच सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे सहकारी संघटनेविषयी ज्यांना आस्था आहे, त्यांचे कर्तव्य आहे. शासन, शिखर सहकारी संस्था, सहकारविषयक नियुक्त केलेल्या विविध समित्या यांची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या प्रामाणिक, अभ्यासू, निष्ठावान युवकांनी घेतली पाहिजे. सहकारी चळवळीचा विकास होण्यासाठी नवरक्त, नवा विचार, नवसंशोधन याची नित्य भर पडावयास हवी. जेणेकरून या चळवळीला नवी दिशा मिळेल. ही गोष्ट सातत्याने घडावयास हवी. कोणतीही चळवळ अशा प्रयत्नामुळेच वर्धिष्णु होत असते. दुर्दैवाने दिशा देण्याचे काम आज थांबलेले आहे. कुंठित मतीच्या मर्यादित कुवतीच्या स्वार्थांध नेतृत्वाच्या हाती आता ही चळवळ गेली आहे. त्यामुळेच आता स्वच्छ प्रतिमा असलेल्या नवतरुण युवकांनी त्यांची जागा घेणे क्रमप्राप्त आहे. सहकारी समाजरचनेत देशातील श्रमजीवी व शेतकरी हा देशाच्या औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत मालक व्हावा ही जी मूळ धारणा आहे ती प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे. पण त्यासाठी विधायक व नैष्ठिक कार्यकर्त्यांची संघटना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान लहान शेतकरी सभासदांनी हौसेने संघटना बांधून पदरचे पैसे घालून सहकारी चळवळ कार्यान्वित ठेवली आहे. परंतु आताचे सत्ताधिकारी, पदाधिकारी सभासदांना पिळू लागले आहेत आणि आपल्या व्यतिरिक्त अन्य सक्षम सहकारी कार्यकर्ता तयार होऊ द्यावयाचा नाही, अशा कारवाया करण्यात मश्गुल आहेत. विधायक कार्याने अधिकारपद मिळविण्याचा जर कोणी प्रयत्न करू लागला तर त्याला खच्ची करायचे अशी प्रवृत्ती आज महाराष्ट्रात सर्व सहकारी संस्थांमध्ये वाढीस लागली आहे.शासनाने याला पायबंद घालायला हवा. पूर्वी प्राथमिक सेवा सहकारी संस्थांकडूनच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला माफी मिळत असे. त्यानंतर नागरी सहकारी पतसंस्थांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जालाही माफी मिळू लागली. १९५४ साली नियुक्त केलेल्या गोरवाला समितीने आपल्या अहवालात धंदेवाईक सावकार आणि शेतकी सावकार यांचेकडून शेतकरी अनुक्रमे ४४ टक्के व २४ टक्के कर्ज घेत होता तर सहकारी संस्थेकडून केवळ तो तीन टक्केच कर्ज शेतीसाठी घेत होता, असा निष्कर्ष काढला. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी १९०४ चा सहकारी कायदा करण्यात आला. आता मात्र, सावकारांनाही शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा खुला परवाना मिळाला असून त्यांनी दिलेल्या कर्जालाही माफी मिळू शकेल असा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही उलट तो कर्जबाजारी होत जाईल आणि त्याचा फायदा मात्र सावकार आणि अन्य संस्था यांना मिळेल. खरे तर, शासनाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांची कर्जातून कशी सोडवणूक करावी, हे असावयास हवे. उलट त्यांचेवर कर्जाचा डोंगर कसा उभा राहील असा प्रयत्न होताना दिसत आहे.भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेची सांगड आंतरराष्ट्रीय किंवा जागतिकीकरणाशी घालू नये. शेती हे असे क्षेत्र आहे की ती केवळ सहकाराचा अंगिकार करूनच पुष्ट करता येते. वंशपरंपरागत शेती ही सामुदायिकरीत्याच केली जात असे आणि आजही ती केली जाते. या ठिकाणी सामुदायिक या शब्दाचा अर्थ घरातील सर्व कुटुंब शेतीवर राबत असते. शेतीचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न म्हणून धरले जाते. मग शेतकऱ्यांची दुरवस्था का? कारण शेतकऱ्याचे मूळ दुखणे होते तिथेच आहे पण त्याचा विचार मात्र कुठेही होताना दिसत नाही व हीच तर खरी शोकांतिका आहे.