शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

ही माणसे आपली नाहीत

By गजानन जानभोर | Updated: August 1, 2017 00:41 IST

दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरु करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस ती अधिक भयावह होत आहे.

दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरु करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस ती अधिक भयावह होत आहे.अशोक पवार यांच्या ‘बिराड’ या आत्मकथनातील एक आठवण. लहानगा अशोक शाळेत जातो. गणवेश नसल्याने शिक्षक त्याला हाकलून लावतात. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत मग गणवेश तरी कुठून आणणार? गणवेशाच्या धाकाने अशोक शाळेत जात नाही. एके दिवशी तो पाटी फोडतो अन् शाळा कायमची सुटते. भूक मात्र पिच्छा सोडत नाही. तो गावात परत येतो, मजुरीला जाऊ लागतो. भुकेल्यापोटी अंगमेहनतीची कामे? कशी झेपणार? तो अंथरुणाला खिळतो. शाळेसारखीच मजुरीही कायमची बुडते. दोन-तीन दिवसांपासून चूल पेटलेली नाही, पोटात अन्नाचा कण नाही. भुकेचा आगडोंब उसळलेला...अशोकला दारात कुत्रा दिसतो. त्याच्या तोंडात भाकर. भूक त्याला ओढत नेते, अशोक कुत्र्याशी झटापट करतो, तोंडातील भाकर हिसकावतो आणि पोटभर खातो... आजही गावकुसाबाहेर भूकेने व्याकूळ असे असंख्य अशोक आहेत. फक्त त्यांच्या कहाण्या आपल्या कानावर येत नाहीत. काल्पनिक कथांनी व्यथित होणाºया सुखवस्तू माणसांना अशा खºया कहाण्या नकोशा वाटतात. राज्यकर्ते नावाची प्रस्थापित जमातही ते कटू वास्तव स्वीकारीत नाही. ते दिसू नये, कायमचे अंधारात राहावे यासाठी मग या सरकारी व्यवस्थेतील भालदार-चोपदारांचा आटापिटा सुरू होतो. विदर्भातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांतील दयनीय अवस्था हे त्याचेच निदर्शक. दलित, शोषित समाजातील मुलांचा पाटी आणि पोळीचा संघर्ष संपावा, यासाठी ही वसतिगृहे सुरू करण्यात आलीत. पण ती होरपळ अजून संपलेली नाही, उलट दिवसेंदिवस अधिक भयावह होत आहे.या वसतिगृहातील मुलांना पुरेसे जेवण मिळत नाही, झोपायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, खोल्यांना गळती लागलेली... कुणी चुकून तक्रार केली तर ‘फुकटात मिळत आहे, खाऊन घ्या’ असे माजोरडे उत्तर मिळते आणि मेस बंद होते. जीएसटीचे नाव सांगून आता या मुलांच्या ताटातील अन्नही कमी करण्यात आले आहे. नागपुरात एकूण २६ वसतिगृहे, त्यापैकी १७ भाड्याच्या घरांत. एकूण क्षमतेच्या केवळ ६० टक्केच मुलांना या वसतीगृहांत प्रवेश दिला जातो. उर्वरित ४० टक्के विद्यार्थी निराश होऊन गावाला परत जातात. त्यातील काही मजुरीवर जातात, काही बापासोबत शेतात राबतात. पुढे आत्महत्या करतात...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय मुलींचे चार वसतिगृहे सुरू करण्यात आलीत खरी पण वर्ष होऊनही इथे सोयी, सुविधांचा दुष्काळ आहे. सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी या मुलांसाठी प्रामाणिकपणे धडपडतात, पण मंत्रालयात बसलेल्यांना पैसे खायचे असतात. सरकार या मुलांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते, मग या सोयी त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? पाटी-पोळीसाठी जीव मेटाकुटीस आलेले ‘बिराड’मधील अशोक इथे पावलोपावली जसे दिसतात तसेच त्यांच्या तोंडातील भाकर हिसकावणाºया भक्षकांच्या झुंडीही जागोजागी ठाण मांडून असतात. सुदैव म्हणा की दुर्दैव या खात्याचे मंत्री राजकुमार बडोले याच अभावग्रस्त समाजातून आलेले. या खात्याचे उच्चपदस्थ अधिकारीही याच वसतिगृहांत शिकलेले. पण या मुलांच्या यातना थांबाव्यात असे कुणालाही वाटत नाही. मंत्री महोदय बडोले नागपुरातच राहतात. पण एखाद्या वसतिगृहात जाऊन मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे त्यांना कधी वाटत नाही. ठेकेदारांना मात्र ते आवर्जून भेटतात आणि काळ्या यादीतल्यांना पायघड्याही घालतात.नागपूर ही क्रांतिभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या मनात स्फुल्लींग चेतविले, ते याच दीक्षाभूमीत. भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुखांचीही हीच कर्मभूमी. पण या मुलांची अवस्था बघून कुणीही आंबेडकरी-बहुजन विचारवंत पेटून उठत नाही. सामाजिक क्रांतीची दिशा बदलली की प्राधान्यक्रम? शोषित-वंचितांमधील काही माणसे सुखवस्तू झालीत की ती प्रस्थापित होतात. मानसन्मानांनी सुखावतात आणि पुरस्कारांनी तृप्तही होतात. विद्रोहाचा हुंकार जागवला की, प्रस्थापितांच्या नजरेत आपण जातीयवादी ठरू, कळपातून बाहेर फेकले जाऊ ही भीती त्यांना असते. त्यामुळे स्वाभाविकच वंचनेशी ते कृतघ्न होतात. काल परवापर्यंत पेटून उठणारे हे क्रांतिवंत आता गेले कुठे? सामाजिक न्यायाचा घोष करणारे राजकुमार बडोले सुद्धा सत्तेचे मांडलिक झाले. ही माणसे आता आपली नाहीत, हा या वसतिगृहांतील मुलांच्या मनातील अव्यक्त आक्रोश आहे. दलित-बहुजन चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांमध्येही तो तसाच खदखदत आहे.