शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

By गजानन जानभोर | Updated: November 7, 2017 03:54 IST

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले.

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले. केशवदास पुन्हा घरी परतले नाहीत. घरचे म्हणाले, ‘परत चल’. केशवदासांनी सांगितले, ‘‘घरी येऊन तरी काय करु? मला इथेच राहायचे आहे, गुरुदेवांच्या सेवेत’’ राष्टÑसंतांचे अनेक सहकारी, अनुयायी नंतर आसक्तीच्या वाटेने गेले. काहींनी गुरुदेवांच्या नामस्मरणातून शिक्षणसंस्था उभारल्या तर काही राजकारणी झालेत अन् भगव्या टोप्या घालून सभा, संमेलनात मिरवू लागले. गुरुदेवभक्तांची निष्ठा आणि राष्टÑसंतांवरील लोकश्रद्धेचे भांडवल करीत ही मंडळी पुढे गडगंजही झाली. केशवदास मात्र गुरुदेवांजवळच अविचल, अनासक्त राहिले. आश्रमातील सकाळच्या ध्यानात, संध्याकाळच्या प्रार्थनेत केशवदास नित्यनेमाने येतात. किरकोळ बांधा, बेताची उंची आणि एक पाय अधू... आपले अस्तित्व जाणवू न देता एका कोपºयात त्यांचे ध्यान लागलेले... गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यक्रमांतही ते मंचावर थांबत नाहीत, मंडपाबाहेर मुलांना पुस्तकं वाटताना दिसतात.केशवदास राष्ट्रसंतांचे सहकारी. महाराजांच्या भाषणाची ते टिपणे काढायचे. त्यातून ३० पुस्तकं प्रसिद्ध झालीत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव हे त्यांचे गाव. वडील लहानपणीच वारले, आई मजुरीला जायची. लहानग्या केशवदासला दारिद्र्यासोबतच अस्पृश्यतेचे चटकेही बसायचे. आपल्या सारख्याच हाडामासाच्या माणसांना ग्लासात पाणी आणि आपल्याला ओंजळीत का? कुणाच्या घरचे लग्न असेल तर आपण शेवटच्या पंक्तीतच का बसावे? केशवदासला हे प्रश्न अस्वस्थ करायचे. भजनांचा छंद होताच. चवथीत असताना अभंगही लिहिले. ते दाखवण्यासाठी केशवदास मित्राजवळ गेला. मित्र म्हणाला, ‘अभंग महापुरुषांनी लिहायचे. आपण लिहिणे पाप आहे’. दुसºया दिवशी त्याने तुळशीसमोर सर्व अभंग जाळून टाकले. ‘हा विटाळ कशासाठी’? केशवदासचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच गावालगत तुकडोजी महाराजांचा एक कार्यक्रम होता. केशवदासने महाराजांना गाठले, ‘मला गुरुमंत्र द्या’ महाराज म्हणाले, ‘सर्वांचे कल्याण कर, हाच गुरुमंत्र तुझ्यासाठी’. ग्रामस्वच्छतेचा मंत्र अंगिकारून केशवदास गावपरिसरात काम करू लागला. केशवदासची सातवीनंतर शाळा सुटली आणि मग पुढचे आयुष्य राष्टÑसंतांच्या कार्याकडे कायमचे प्रवाहित झाले.राष्ट्रसंतांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर हा देश समजून घ्यावा, असे एक दिवस वाटले आणि केशवदास तडक भारत भ्रमणाला निघाले. १९५८ ते ६० असे दोन वर्ष, पदयात्रेचे अंतर ४,६०० किमी. एक अपंग मुलगा एकटाच फिरतो, साºयांनाच आश्चर्य वाटायचे. पदयात्रेच्या काळात एक मूल्य ते आवर्जून जपायचे, भूक लागली की संबंधितांच्या घरी श्रमदान करून त्यानंतरच माधुकरी मागायची. तरुणांसाठी संस्कार शिबिरे, ग्रामस्वराज्याचे प्रयोग राबवून केशवदासांनी शेकडो गावांना आदर्श केले. ‘ग्रामगीता जीवन विकास परीक्षा’ त्यांनीच सुरू केली. राष्ट्रसंतांनी त्यांना ‘प्राचार्य’ ही उपाधी दिली, ती यासाठीच. संतत्वाच्या असंख्य कसोट्यांवर उत्तीर्ण होऊनही या निष्काम कर्मयोग्याने आपल्यातील सामान्यपण कधी ढळू दिले नाही. हा माणूस कोणत्या मातीतून जन्मास आला, ठाऊक नाही, पण त्याच्या लोकसेवेचा प्रपंच अनासक्त आहे आणि जगणे विशुद्ध आहे. म्हणूनच आश्रमात झालेल्या परवाच्या सत्काराचे त्यांना अप्रूपही वाटत नाही.(gajanan.janbhor@lokmat.com)