शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

राहुल गांधींमध्ये दिसतोय व्यापक बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:36 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

- हरीश गुप्ताकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते. हिवाळी अधिवेशन काळात ते मितभाषी होते पण यावेळी मात्र ते वेगळ्याच रूपात दिसले. त्यांच्या बोलण्यात स्पष्टता आणि मोकळेपणा होता. त्यांची आई थोडे सांभाळून बोलत होती पण राहुल गांधी सडेतोड बोलत होते आणि त्यांचा प्रत्येक शब्द ‘आॅन रेकॉर्ड’ होता. सोनिया गांधींच्या थांबवण्यावरही ते थांबले नाहीत आणि म्हणाले, ‘मी तुम्हाला सांगतोय, ते परतणार नाहीत. २०१९ मधील सरकार हे मोदीमुक्त असेल.’ सोनिया गांधींनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरी राजकीय परिस्थितीवर आपले आकलन मांडताना त्यांनी सांगितले की, लोकसभेत काँग्रेसच्या आणखी ७० जागा वाढतील आणि हा आकडा कमीतकमी आहे. दुसरीकडे भाजपाला २०० पेक्षा कमी जागा मिळणार असून या पक्षाचा कुठलाही सहकारी मोदींना पंतप्रधानांच्या रूपात स्वीकारण्यास राजी होणार नाही. पुढील निवडणुकांनंतर विद्यमान गृहमंत्र्यांच्या (राजनाथसिंग) नेतृत्वातील रालोआ सरकार स्थापन होईल अथवा २००४ प्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येईल, असे त्यांचे म्हणणे होते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्टÑ आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा आपल्या जागा वाढविण्याकडे पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. देशात फूट पाडण्याचे तसेच कर्नाटकातील आगामी निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत पण तिला यश मिळणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.चार राज्यांमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी चढाओढचार राज्यांमधील राज्यसभेच्या चार महत्त्वाच्या जागांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या जागा अधांतरी समजल्या जात आहेत. एकतर या चार जागा सर्वाधिक बोली लावणाºयांच्या पदरात पडतील किंवा राजकीय समीकरणे आपल्या बाजूने करुन घेणाºयास मिळतील. राज्यसभेच्या ज्या ६१ जागांसाठी लवकरच द्विवार्षिक निवडणुका होत आहेत त्यापैकी या चार जागा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील विधानसभांची रचना अशी आहे की कुठलाही पक्ष स्वबळावर या अतिरिक्त जागा ताब्यात घेऊ शकणार नाही आणि उमेदवारांना वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी विशेष कौशल्याची गरज पडेल.बिहारमध्ये शरद यादव विरोधी पक्षांचे उमेदवार?बिहारमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींवरून मिळालेल्या संकेतांनुसार राज्यसभेच्या सहा जागांबद्दल रोचक परिस्थिती आहे. राजद दोन जागा जिंकेल तर भाजपा-जदयू युती तीन जागा सहजपणे ताब्यात घेईल. सहाव्या जागेसाठी मात्र जबरदस्त संघर्ष आहे. कारण २४३सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे फक्त २७ आमदार आहेत. सहाव्या उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या ४० मतांची गरज पडेल. ही १३ अतिरिक्त मतांची जुळवाजुळव कोण करू शकणार? काँग्रेसने आपल्याला तिकीट द्यावे अशी सहा वेळा राज्यसभेवर गेलेले राजा महेंद्र यांची इच्छा आहे आणि या १३ मतांचे गणित आपण सोडवू असा त्यांचा दावा आहे. यापूर्वी त्यांनी सर्व पक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. पण त्यांच्या या खेळीला ज्येष्ठ विरोधी पक्षनेते शरद यादव हे सुद्धा रिंगणात उतरल्याने धक्का बसला आहे. अलीकडेच त्यांनी झारखंड विकास मोर्चाचे बाबूलाल मरांडी यांच्यासोबत लालूप्रसाद यादव यांची कारागृहात भेट घेतली. काँग्रेसही शरद यादवांना समर्थन देऊ शकते आणि त्यांच्यासाठी माकपाची तीन मते तसेच अन्य पक्षांचेही समर्थन मिळविले जाऊ शकते.पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची कोंडीपश्चिम बंगालच्या २९४ सदस्यीय विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस राज्यसभेच्या चार जागा सहजपणे जिंकेल. कारण या पक्षाकडे २१२ आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसजवळ मात्र ४२ आमदार असून एका जागेसाठी तिला पहिल्या पसंतीच्या ५९ मतांची गरज पडेल. म्हणजेच आणखी १७ मते लागतील. ती एकतर माकपाकडून (२६) मिळू शकतात किंवा ११ इतर पक्षांकडून. काँग्रेसने या जागेसाठी सीताराम येचुरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. पण त्यांचा पक्ष यासाठी तयार नाही. थोडक्यात या जागेसाठी काँग्रेस माकपला पाठिंबा मागणार की ममता बॅनर्र्जींसोबत जाणार हा मुद्दा आहे.देवेगौडा कुणाला उपकृत करणार?कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी दोन जागांवर काँग्रेस १२४ संख्याबळासह सहज विजय मिळवेल. ४४ आमदार असलेली भाजपा सुद्धा जोडतोड करून एका जागेवर कब्जा मिळवू शकते. परंतु चौथी जागा अटीतटीची आहे. कारण देवेगौडांच्या जनता दल (एस) कडे ४० आमदार आहेत अन् जिंकण्याकरिता ५६ मतांची गरज पडेल. १६ अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेत अपक्ष खासदार असलेले राजीव चंद्रशेखर यांनी २०१२ मध्ये जद(एस) व भाजपाच्या पाठिंब्याने राज्यसभेचा गड सर केला होता. यावेळी ते पुन्हा आपले भाग्य आजमावू शकतात.उत्तर प्रदेशात नवव्या जागेसाठी चढाओढउत्तर प्रदेशात राज्यसभेच्या ९ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका होतील आणि ३२५ आमदारांच्या पाठिंब्यासह भाजपा ७ जागा सहजपणे ताब्यात घेईल. ४७ सदस्य असलेल्या समाजवादी पार्टीला १ जागा मिळेल. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा नवव्या जागेवर खिळल्या आहेत. यावर कब्जा मिळविण्यास भाजपा इच्छुक आहे. कारण काँग्रेस (७), बसपा (१९) आणि इतर (५) कुंपणावरील मतांची जोडतोड होऊ शकते, अशी आशा या पक्षाला आहे. विरोधी पक्षही एकजूट झाल्यास नववी जागा मिळवू शकतात.वसुंधरा राजेंना हटविणार नाहीराजस्थानात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एक जागेवर भाजपाला दारुण पराभव का पत्करावा लागला. या पराभवामुळे भाजपाची चमक फिकी पडली असून तिच्या काँग्रेसमुक्त भारत मोहिमेला तडा गेला आहे. विशेषत: वसुंधरा राजे यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे आणि त्यांना मदत करणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. हे एक आश्चर्यच होते की बसपा आणि एआयएमआयएमसारखे धर्मनिरपेक्ष पक्ष ज्यांनी गुजरातमध्ये विधानसभेची प्रत्येक जागा आणि पोटनिवडणुका लढविल्या त्यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपात थेट लढत होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार निवडले आणि आमचा सल्ला मानला नाही, असे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे आहे. तरीही पक्षश्रेष्ठींनी राजेंना न हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचे पंख छाटले जातील आणि नवा प्रदेशाध्यक्ष पाठविला जाईल. मोदी-शहा जोडगोळी त्यांना पसंत करीत नाही हे जगजाहीर आहे. अन् या पराभवाने त्यांना बाजूला सारले आहे.या जोडीला पी.के. धुमल आवडत नव्हते. परिणाम असा झाला की हिमाचलमध्ये पक्ष जिंकला पण धुमल हरले. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘आम्ही वसुंधरा राजेंना हटविणार नाही!’(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस