शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विकासाचे ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:51 IST

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या विमानतळाच्या कामाची पायाभरणी झाली. त्यामुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. नवीमुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाबरोबरच मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकआणि प्रस्तावित उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे आता नवी मुंबईहेदेखील खºया अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनणार आहे. नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे मुंबई महानगर क्षेत्रात विमानाने प्रवास करणाºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिवर्ष ४५ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. २०३४ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या प्रतिवर्षी १०० दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य असल्याने मुंबईच्याछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हीकाळाची गरज बनली होती. अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रालाही सुगीचे दिवस येतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक, विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष विमानाच्या उड्डाणाला २०२० साल उजाडण्याची शक्यता आहे. या दोन वर्षांत विमानतळाच्या कामामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपाचे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. पर्यायाने नवी मुंबईसह मुंबई प्रादेशिक क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. त्या दिशेने विकासाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र या प्रक्रियेत राज्याच्या विकासाऐवजी केवळ बांधकाम व्यावसायिक, विकासकांनीच स्व‘विकासा’चे टेकआॅफ घेऊ नये, याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.