शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मधाचा गोडवा

By admin | Updated: March 10, 2017 05:35 IST

मधमाशा फुलातील मध गोळा करून पोळ्यात आणून साठवतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण हा प्रवास खोलात जाऊन समजून घेणे आनंदाचा बोनस मिळवण्यासारखे आहे.

- प्रल्हाद जाधवमधमाशा फुलातील मध गोळा करून पोळ्यात आणून साठवतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण हा प्रवास खोलात जाऊन समजून घेणे आनंदाचा बोनस मिळवण्यासारखे आहे. काही फुलातील मध गोड असतो, काहीतील आंबट, काहीतील तुरट, काहीतील खारट तर काही फुलांतील चक्क विषारी असतो. हा सर्व मध पोळ्यात एकत्र आल्यानंतर हळूहळू स्वयंप्रक्रि येने तो गोड होत जातो आणि मग खाण्यालायक होतो. पक्षिनिरीक्षक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट ! आपण फुलातील मध असा शब्दप्रयोग करतो; पण भाषेच्या दृष्टीने त्यात थोडी सुधारणाही करायला पाहिजे. फुलात असतो तो मकरंद आणि पोळ्यात असतो तो मध. इंग्रजीत हे शब्द अनुक्रमे नेक्टर आणि हनी म्हणून वापरले जातात. मधमाशांचे जे पोळे असते त्यातील प्रत्येक घर षटकोनी आकाराचे असते. ते का, तर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मध साठवता यावा म्हणून ! षटकोनात स्पेस जास्त मिळतो हे आपल्याला माहीत आहे. मधमाशांच्या जगात कार्पेट आणि बिल्टप असा हिशेब नसतो तिथे फक्त कार्पेट हा शब्द अस्तित्वात असतो. शिवाय षटकोनाचे ज्ञान मिळवण्यासाठी मधमाशांना कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला जावे लागत नाही. आणखी एक विशेष म्हणजे, पोळे बांधण्यासाठी जे मेण लागते ते मधमाशांना बाहेरून आणावे लागत नाही तर त्याचे उत्पादन त्या आपल्या पोटातूनच करत असतात. प्रत्येक फुलातील मकरंद जसा वेगळ्या चवीचा तसेच प्रत्येक माणूस वेगळ्या स्वभावाचा ! कोणी प्रेमळ, कोणी रागीट. कोणी गर्विष्ठ, कोणी नम्र. कोणी मुत्सद्दी, तर कोणी भाबडा ! पण अशी सारी माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. माणसे समूहाने एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकच चेहरा झालेला असतो. सार्वजनिक ठिकाणी माणसांचे वर्तन सभ्य आणि सुसंस्कृत असते. साऱ्यांचे बरे-वाईट स्वभाव एकत्र मिसळून त्यातून एक गोड स्वभाव जन्माला आलेला असतो. माणसाच्या एकजिनसीपणातून आणि एकत्रित कृतीतून सामाजिक विकासाचे नवनवे प्रकल्प उभे रहात असतात, रचनात्मक कार्याच्या नवनव्या दिशा उदयाला येत असतात. मधाचे पोळे हे अशा समाजाचे एक प्रतीक आहे असे मला वाटते. कार्यकर्त्यांचे मोहोळ हा सुंदर शब्दप्रयोगही जाणिवेच्या याच झऱ्यातून उमललेला असणार यात शंका नाही. माणसाला सोशल अ‍ॅनिमल असे का म्हटले जाते आणि त्याने तसे का असावे याचे ते एक सुंदर उदाहरण आहे.