शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

मनाचिये गुंथी - घामाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:20 IST

गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते.

- डॉ. रामचंद्र देखणेगीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते. आपण नमस्काराची क्रिया करतो. पण त्या नमस्कारात आतून जर मन विनम्र झाले नसेल तर क्रिया व्यर्थ होय. विनोबाजींनी सुरेख दृष्टांत दिला आहे. शंकराच्या पिंडीवर धार धरून अभिषेक चालला आहे. पण चित्त जर अभिषेकामध्ये नसेल, ते जर दुसरीकडेच भरकटत असेल तर अभिषेक घडेल काय? अभिषेकाच्या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार अखंड ओतली जात असेल तरच त्या अभिषेकाला किंमत आहे. म्हणजेच चित्त ओतून केलेला अभिषेक हे नुसते अभिषेकाचे कर्म न राहता ते ‘विकर्म’ ठरेल आणि अशा बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग घडतो.हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याला निष्कामतेची फळे-फुले येणार नाहीत. अशा कर्मात विकर्म ओतले म्हणजे ‘अकर्म’ होते. कर्म सहजपणे बाहेर पडते. मुलावर प्रेम करणे, त्याला वाढविणे, पोसणे हे मातेचे सहजकर्म असते. तेच ‘अकर्म’ होय. माऊली ज्ञानदेव म्हणतात,‘‘अगा करितेन वीण कर्म ।तेचित ते नैष्कर्म्य ।’’ पुढे-पुढे तर या सहज कर्मातही कर्म करणारा मी आहे असा भावही न ठेवता जे कर्म घडते तेच ‘नैष्कर्म्य’ होय. कर्म, कर्मातून विकर्म, विकर्मातून अकर्म आणि पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणे म्हणजे कर्मातील आनंदाची एके क पायी गाठीत कर्मानंदावर आरूढ होणे होय.खरे तर, कर्म आणि श्रम यातून जीवन वेलीला प्रसन्नतेची फुले लागतात आणि ही श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. प्रभूची वाट पाहत प्रभू पूजेसाठी शबरीने आणलेली फुले पाहून रामाने विचारले, ‘ही फुले रात्रीच्या वेळीही एवढी प्रफुल्लित कशी?’ त्यावर शबरीने दिलेले उत्तर फार उद्बोधक आहे.ती म्हणाली, ‘प्रभू, फार वर्षांपूर्वी इथे मतंग ऋषींचा आश्रम होता. या ऋषींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमात सरपण आणण्यासाठी साºया शिष्यांना सांगितले. पण कुणीच ऐकले नाही, शेवटी वयोवृद्ध ऋषी खांद्यावर कुºहाड टाकून सरपण आणायला निघाले. त्यांच्या पाठोपाठ सारे शिष्यही निघाले. दोन दिवस त्या सर्वांनी भरपूर श्रमदान केले. सरपण तोडताना हे अक्षरश: घामाघूम झाले. त्यांच्या श्रमाचे घाम या भूमीवर पडले आणि त्या घामाच्या बिंदूतून ही फुले जन्माला आली. म्हणून ती नित्य प्रफुल्लित राहिली. श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. ती स्वत:ही प्रफुल्लित असतात.